India's performance in Commonwealth Games 2018

 1. 15 एप्रिल 2018 रोजी ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट शहरात ‘राष्ट्रकुल खेळ 2018’ या स्पर्धांचा समारोप झाला.
 2. भारताने या खेळांमध्ये 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्य पदक अश्या एकूण 66 पदकांची कमाई केली आहे.
 3. 2014 सालच्या स्पर्धांमध्ये भारताने 19 सुवर्णपदकांसह एकूण 64 पदकांची कमाई केली होती.
 4. त्यामानाने भारतीय क्रीडापटूंनी उत्तम कामगिरी केली आहे. भारताची ही आतापर्यंतची ऐतिहासिक अशी कामगिरी आहे.
 5. पदकतालिकेत आयोजक ऑस्ट्रेलियाचा 198 (80 सुवर्ण, 59 रौप्य आणि 59 कांस्य) पदकांसह पहिला क्रमांक आहे. त्यानंतर इंग्लंड 136 (45 सुवर्ण, 45 रौप्य आणि 46 कांस्य) पदकांसह द्वितीय क्रमांकावर आहे.
स्पर्धेत झालेले विक्रम:-
 1. नऊ टेबल टेनिस खेळाडुंचा (सहा पुरुष आणि तीन महिला) जगातील अव्वल 100 मध्ये समावेश झाला.
 2. भारतीय टेबल टेनिस संघाने देशाचे पहिले सांघिक सुवर्णपदक जिंकले.
 3. भारतीय मिश्र बॅडमिंटन संघाने देशाचे पहिले सांघिक सुवर्णपदक जिंकले.
 4. भारतीय महिला टेबल टेनिस संघाने आपले पहिले सांघिक सुवर्णपदक जिंकले.
 5. संजीव राजपूत: 454.4 या विक्रमी गुणांसह नेमबाजी पुरुष 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये सुवर्णपदक
 6. जितू राय: नेमबाजीत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 235.1 गुणांसह एक नवीन विक्रम
 7. अनीश भानवाला (15 वर्षीय): राष्ट्रकुल खेळात सुवर्णपदक जिंकणारा भारताचा सर्वांत तरुण खेळाडू
 8. नीरज चोप्रा: भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला आणि एकमेव भारतीय
 9. मणिका बत्रा: राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी एकमेव भारतीय महिला टेबल टेनिसपटू
 10. धावपटू मोहम्मद अनस याहिया: मिल्खा सिंग यांच्यानंतर धाव शर्यतीत 400 मीटर प्रकारात अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला भारतीय खेळाडू
 11. मेहुली घोष: महिला 10 मीटर एअर रायफल प्रकारात 247.2 गुणांसह नवा विक्रम
 12. तेजस्विनी सावंत: महिला 50 मी रायफल थ्री पोझिशन प्रकारात 457.9 गुणांसह नवा विक्रम
 13. मनु भाकेर: महिला 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 240.9 गुणांसह नवीन विक्रम
 14. हिना सिधू: महिला 25 मी एअर पिस्तूल प्रकारात 50 पैकी 38 गुणासह नवा विक्रम
 15. संजीव राजपूत: पुरुष 50 मी थ्री पोझिशन रायफल प्रकारात 454.5 गुणांसह नवा विक्रम
 16. संजीता चानू खुमुकचाम: भारोत्तोलन स्पर्धेत महिला 53 किलो गटात स्नॅच श्रेणीत 84 किलोग्राम उचलून नवा विक्रम
 17. मिराबाई चानू: भारोत्तोलन स्पर्धेत महिला 48 किलो गटात एकूण 196 किलोग्राम उचलून नवा विक्रम

 

भारतीय सुवर्णपदक विजेत्यांची यादी

विजेता

क्रिडा  प्रकार
भारतीय संघ बॅडमिंटन मिश्र सांघिक
जितू राय नेमबाजी पुरुष 10 मी एअर पिस्तूल
मनु भाकेर नेमबाजी महिला 10 मी एअर पिस्तूल
हिना सिधू नेमबाजी महिला 25 मी पिस्तूल
श्रेयसी सिंग नेमबाजी महिला डबल ट्रॅप
अनीश भानवाला नेमबाजी पुरुष 25 मी रॅपिड फायर पिस्तूल
तेजस्विनी सावंत नेमबाजी महिला 50 मी रायफल थ्री पोझिशन
संजीव राजपूत नेमबाजी पुरुष 50 मी रायफल थ्री पोझिशन
भारतीय संघ टेबल टेनिस पुरुष सांघिक
भारतीय संघ टेबल टेनिस महिला सांघिक
मणिका बत्रा टेबल टेनिस महिला एकेरी
सतीश शिवलिंगम भारोत्तोलन पुरुष 77 किलो
आर. व्ही. राहुल भारोत्तोलन पुरुष 85 किलो
मिराबाई चानू भारोत्तोलन महिला 48 किलो
संजीता चानू भारोत्तोलन महिला 53 किलो
पूनम यादव भारोत्तोलन महिला 69 किलो
राहुल आवारे कुस्ती पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो
बजरंग कुस्ती पुरुष फ्रीस्टाइल 65 किलो
सुशील कुमार कुस्ती पुरुष फ्रीस्टाइल 74 किलो
सुमित मलिक कुस्ती पुरुष फ्रीस्टाइल 125 किलो
विनेश फोगाट कुस्ती पुरुष फ्रीस्टाइल 50 किलो
मेरी कोम मुष्टियुद्ध महिला 45-48 किलो
गौरव सोलंकी मुष्टियुद्ध पुरुष 52 किलो
विकास कृष्णन मुष्टियुद्ध पुरुष 75 किलो
नीरज चोप्रा भालाफेक भालाफेक


 United Nations initiative to improve road safety around the world

 1. रस्त्यांवरील अपघातात दरवर्षी सुमारे 1.3 दशलक्ष वाहनचालक, प्रवासी आणि पादचार्‍यांचा मृत्यू होतो, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.
 2. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि जगभरातील रस्त्यावरील सुरक्षितता सुधारण्यासाठी याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाने एक पुढाकार घेतला आहे. त्यांनी ‘UN रोड सेफ्टी ट्रस्ट फंड’ सुरू केला आहे.
 3. उद्घाटना दरम्यान लाखो लोकांच्या जीवनाचे रक्षण करण्याची संधी म्हणून सुरू करण्यात आलेल्या कोषात सर्व भागधारकांना सहकार्य करण्यासाठी आवाहन केले गेले.
 4. हा कोष UN च्या शाश्वत विकास उद्दीष्टांच्या रस्ते सुरक्षा उद्दिष्टांच्या दिशेने अत्यावश्यक प्रगतीसाठी एक उत्प्रेरक म्हणून काम करणार.
 5. SGD लक्ष्य 3.6 आणि 11.2 हे रस्ते अपघातांमुळे होणार्‍या जागतिक मृत्यूंची संख्या आणि जखमांची संख्या कमी करण्याचा हेतू ठेवते.
 6. सुरक्षित, परवडेल, प्रवेशयोग्य आणि टिकाऊ वाहतूक व्यवस्थेमध्ये प्रवेश देण्याचा हेतू ठेवते.
‘UN रोड सेफ्टी ट्रस्ट फंड’
 1. कोषासंबंधी ठळक बाबी:-
 2. UN इकॉनॉमिक कमिशन फॉर युरोप (UNECE) हे कोषाचे सचिवालय आहे.
 3. UNECE अनुसार दर $1,500 रक्कम एक जीवन वाचवू शकते; 10 गंभीर जखमा टाळू शकते; आणि रस्ते सुरक्षेमध्ये गुंतवणुकीसाठी $51,000 एवढी रक्कम उभी करू शकते.
 4. हा कोष ‘डिकेड ऑफ अॅक्शन फॉर रोड सेफ्टी 2011-2020’ याच्यासाठी तयार करण्यात आलेल्या वैश्विक योजनेच्या पाच स्तंभावर आधारित आहे.
 5. हे स्तंभ म्हणजे:-
  1. रस्ते सुरक्षा व्यवस्थापन क्षमतेस बळकट करणे,
  2. रस्त्याच्या पायाभूत सुविधांची आणि सीमावर्ती वाहतूक जाळ्यांची सुधारित सुरक्षा,
  3. वाहनांची वर्धित सुरक्षा,
  4. रस्ता वापरणार्‍यांचे सुधारित वर्तन,
  5. अपघातानंतर घ्यावयाची काळजी सुधारित करणे.


 V. S. Kokje: The new International President of the Vishwa Hindu Parishad

 1. व्ही. एस. कोकजे यांची विश्व हिंदू परिषद (VHP) याचे पुढील आंतरराष्ट्रीय अध्यक्षच्या रूपात निवड करण्यात आली आहे.
 2. कोकजे हे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष (प्रभारी) पदी असलेल्या राघव रेड्डी यांच्या जागी येणार आहेत.
 3. कोकजे हिमाचल प्रदेशाचे माजी राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. 
 4. विश्व हिंदू परिषद (VHP)ची स्थापना 1964 साली एम. एस. गोलवळकर आणि एस. एस. आपटे यांनी स्वामी चिन्मयनंद यांच्या सहकार्याने केली. 
 5. यावर्षी विश्व हिंदू परिषद (VHP) याच्या 54 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली आहे.


 German physicist Peter Grunberg died after Nobel Wisdom

 1. भौतिकशास्त्रातील नोबेल मिळवणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ पीटर ग्रुएनबर्ग यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
 2. डिजिटल डेटाची साठवणूक करण्यासाठीच्या संशोधनामध्ये त्यांचे बहुमोल योगदान होते. 
 3. गिगाबाईट हार्ड डिस्कचा विकासासाठी आवश्यक अशा जीएमआरचा त्यांनी शोध लावलाहोता.
 4. ग्रूएनबर्ग यांना फ्रेंच वैज्ञानिक अल्बर्ट फर्ट यांच्याबरोबर २००७मध्ये जायंट मॅग्नेटोरेझिस्टन्स परिणामाच्या शोधासाठी नोबेल मिळाले.
 5. ग्रुएनबर्ग यांना याआधी २००६मध्ये युरोपीय युनियनचा पुरस्कार मिळाला होता. तसेच इस्रायल, जपान आणि तुर्कस्ताननेही त्यांना पुरस्कार देऊन गौरविले होते. 
 6. १९८९मध्ये त्यांना जर्मन अध्यक्षांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर २००६मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील मानाचा वूल्फ पुरस्कार मिळाला होता.


 Siddharth Varadarajan: Recipient of the 2017 Sennestine Journalism Award

 1. सिध्दार्थ वरदराजन यांना 2017 सालासाठी शॉरेंस्टाइन पत्रकारिता पुरस्कार घोषित झाला आहे.
 2. सिध्दार्थ वरदराजन हे ‘द वायर’चे संस्थापक संपादक आहेत.
 3. त्यांना हा पुरस्कार 16 एप्रिल रोजी स्टॅनफोर्डमध्ये दिला जाणार आहे.
 4. शॉरेंस्टाइन पत्रकारिता पुरस्कार पत्रकारांना दरवर्षी स्टॅनफर्ड विद्यापीठातील वॉल्टर एच. शॉरेंस्टाइन एशिया पॅसिफिक रिसर्च सेंटर कडून दिला जातो.
 5. ज्यांनी आशिया क्षेत्रात उल्लेखनीय अहवाल तयार केला आहे आणि क्षेत्रातील पाश्चिमात्य तत्वांना समजून घेण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे, अश्यांना हा पुरस्कार दिला जातो.


Top