on independance day uk has return our budha murti as gift

 1. भारताच्या 72 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ब्रिटीशांनी 12 व्या शतकातील चोरीला गेलेली ब्राँझची बुद्ध मूर्ती समारंभपूर्वक भारताला परत केली आहे.
 2. 1961 साली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या बिहार नालंदा येथील संग्रहालयातून ही ब्राँझची बुद्ध मूर्ती चोरीला गेली होती.
 3. 1961 साली नालंदा येथील संग्रहालयातून एकूण 14 मूर्ती चोरीला गेल्या होत्या. त्यामध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तीचा समावेश होता.


indian former captain ajit vadekar passed away

 1. भारताचे महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे 15 August बुधवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.
 2. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही काळापासून अजित वाडेकर आजारी होते. त्यांच्याच कर्णधारपदाखाली भारताने पहिल्यांदा परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
 3. १९५८ साली मुंबईच्या संघातून त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १९६६ ते १९७४ या काळात त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले.
 4. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणारे वाडेकर एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जायचे. स्लीपमधील उत्तम क्षेत्ररक्षक म्हणूनही त्यांची ओळख होती.
 5. अजित वाडेकर यांच्या क्रिकेटमधील योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना १९६७ साली अर्जून आणि १९७२ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
 6. १ एप्रिल १९४१ रोजी मुंबईत वाडेकर यांचा जन्म झाला. त्यांनी शिकून इंजिनिअर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण वाडेकर क्रिकेटपटू झाले.
 7. १९५८-५९ च्या सुमारास त्यांनी मुंबईकडून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १३ डिसेंबर १९६६ मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
 8. भारताकडून ३७ कसोटी सामने खेळताना त्यांनी ३१.०७ च्या सरासरीने २,११३ धावा केल्या. यात एक शतक आणि १४ अर्धशतकांचा समावेश होता.
 9. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी २३७ सामन्यात १५ हजार ३८० धावा केल्या. यात ३६ शतके आणि ८४ अर्धशतकांचा समावेश होता. अजित वाडेकरांच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने पहिल्यांदा १९७१ साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली. ते भारताचे पहिले वनडे कर्णधार होते.
 10. अजित वाडेकर यांची मुंबईच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर लगेचच १९७१ साली त्यांची भारताच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली.
 11. सुनील गावसकर, गुंडाप्पा विश्वानाथ, फारुख इंजिनिअर, बिशनसिंग बेदी, प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर आणि श्रीनिवास वेंकटराघवन असे एकाहून एक सरस खेळाडूंनी भरलेल्या संघाचे त्यांनी नेतृत्व केले.
 12. १९७१ साली त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा परदेशात कसोटी विजयाची चव चाखली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या बलाढय संघांना त्यांच्या भूमीत पराभूत करण्याची किमया साधली.
 13. १९७० च्या दशकात भारताने वेस्ट इंडिजमध्ये पाच कसोटी सामने जिंकले. १९७२-७३ साली त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडवर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवला.
 14. एकदिवसीय क्रिकेटमधील अजित वाडेकर भारताचे पहिले कर्णधार होते. पहिल्या वनडेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यांनी ६७ धावा केल्या. ते अवघे दोन वनडे खेळले. त्यात ८१.११ च्या स्ट्राईक रेटने त्यांनी ७३ धावा केल्या. १९७४ साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेलेला त्यावेळी वाडेकर कर्णधार होते.
 15. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही वाडेकरांनी भारतीय क्रिकेटला आपले योगदान दिले. १९९० च्या दशकात मोहम्मद अझरुद्दीन कर्णधार असताना ते भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि निवड समितीचे अध्यक्ष अशा वेगवेगळया भूमिका बजावणाऱ्या मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये त्यांचा समावेश होतो.
 16. वाडेकर यांच्या आधी लाला अमरनाथ आणि चंदू बोर्ड या दोन खेळाडूंनीच इतक्या वेगवेगळया जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत.


worldcup shooting will host by india in 2020

 1. भारताला विश्‍वकरंडक नेमबाजी संयोजनाची चौथ्यांदा संधी लाभली आहे. 2020 च्या टोकियो ऑलिंपिक पूर्वीची महत्त्वाची विश्‍वकरंडक स्पर्धा नवी दिल्लीत होणार आहे.
 2. भारतातील ही 2012 पासून सातवी आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा असेल. 
 3. जागतिक नेमबाजी संघटनेच्या व्हिएन्ना येथील बैठकीत 2020 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेचेही यजमानपद भारतास देण्यात आले. यापूर्वीच 2019 च्या फेब्रुवारीत दिल्लीत विश्‍वकरंडक स्पर्धा घेण्याचे ठरले आहे. यापूर्वी 2017 च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये तसेच ऑक्‍टोबरमध्ये विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धा दिल्लीत झाली होती.
 4. या स्पर्धेद्वारे भारतीय नेमबाजीचा दर्जा उंचावण्यास तसेच प्रसार होण्यास नक्कीच मदत होईल.
 5. भारतातील 2020 च्या स्पर्धेद्वारे भारतीय ऑलिंपिकसाठी जास्तीत जास्त कोटा मिळवतील, असा विश्‍वास भारतीय नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांनी व्यक्त केला.
 6. तसेच यापूर्वी आशियाई शॉटगन (नोव्हेंबर-डिसेंबर 2012), आशिया एअरगन (सप्टेंबर-ऑक्‍टोबर 2015) आणि आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धा (जानेवारी-फेब्रुवारी 2016) या स्पर्धाही भारतात झाल्या आहेत.


isro gaganyan will help to astrounauts in to space

 1. तंत्रज्ञानाच्या आधारे अंतराळवीरासह अवकाशात उपग्रह पाठविण्याचे भारताचे उद्दिष्ट 2022 पर्यंत गगनयान मोहिमेद्वारे पूर्ण होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणावेळी जाहीर केले आहे.

 2. या पाश्र्वभूमीवर तसेच अंतराळवीर अवकाशात पाठविण्याबाबत अंतराळवीरांचे वास्तव्य, पर्यावरण नियंत्रण, जीवन रक्षा यंत्रणा, संकटावेळी बाहेर पडण्याची यंत्रणा, जीएसएलव्ही-3 अग्निप्रक्षेपक आदींबाबत बरीच प्रगती केली आहे.

 3. तर गगनयान मोहिमेपूर्वी जीएसएलव्ही-3 च्या आधारे दोन मानवविरहित मोहिमा हाती घेणार आहोत. गगनयान मोहिमेमुळे देशाचे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्र उच्चत्तम पातळीला पोहोचेल. तसेच प्रत्येक भारतीय युवकाला मोठी प्रेरणा मिळेल.

 4. तसेच प्रत्येकाच्या दृष्टीने ही अभिमानास्पद घटना असेल, असेही सिवन यांनी सांगितले.

 5. अवकाशयानातून तीन अंतराळवीर प्रवास करणार असून त्यांची निवड चर्चेद्वारे करण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे तर अवकाशयान चार ते पाच टन वजनाचे असेल व या प्रकल्पासाठी 10 हजार कोटींच्या आसपास खर्च येणार आहे.


Top