वित्तीय बाजारपेठेच्या वातावरणात अधिक पारदर्शीपणासाठी UN सोबत 11 जागतिक बँकांची भागीदारी

हवामान बदलामुळे होणार्या दुष्परिणामात वित्तीय बाजारपेठेच्या वातावरणात अधिक पारदर्शीपणा आणण्यासाठी UN एनवायरनमेंट फायनॅन्स इनीशीएटिव्ह (UNEP FI) आणि जगातील अग्रगण्य 11 बँका यांच्यात भागीदारी करार झाला आहे.

 1. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड बँकिंग ग्रुप लिमिटेड (ANZ, ऑस्ट्रेलिया),
 2. बार्कलेज (ब्रिटन),
 3. ब्रादेस्को (ब्राजिल),
 4. सिटी,
 5. इटायू (ब्राजिल),
 6. नॅशनल ऑस्ट्रेलिया बँक,
 7. रॉयल बँक ऑफ कॅनडा,
 8. सॅनटॅन्डर (ब्रिटन),
 9. स्टँडर्ड चार्टर्ड (ब्रिटन),
 10. TD बँक ग्रुप (कॅनडा), 
 11. UBS (स्वीत्झर्लंड)

या अकरा बँकांनी भागीदारी केली आहे.

हा करार या बँकांच्या मूल्यांकणाला बळकट करण्यासाठी विश्लेषणात्मक साधने आणि निर्देशक विकसित करण्यासाठी आणि वातावरणविषयक जोखीम आणि संधींचे प्रकटीकरणासाठी वचनबद्धता दर्शवते.

पार्श्वभूमी:-

 1. कार्य करण्यासाठी तयार केला गेलेला कृती आराखडा फायनान्शियल स्टेबिलिटी बोर्डच्या (FSB) टास्क फोर्स ऑन क्लायमेट-रिलेटेड फायनान्शियल डिसक्लोजर्स (TCFD) कडून केल्या गेलेल्या शिफारशींवर आधारित आहे.
 2. कंपन्या, गुंतवणूकदार, कर्जप्रदाता आणि विमा कंपन्यांकडून होणार्या वापरासाठी स्वयंसेवी, सातत्यपूर्ण वातावरणाशी संबंधित वित्तीय जोखमीचे प्रकटन विकसित करण्यासाठी कार्य केले जाईल.
 3. यामुळे हवामान-अनुकूल गुंतवणूक वाढविण्यास मदत होईल.
 4. या प्रकल्पामधून विकसित परिस्थिती, पद्धती आणि दृष्टिकोनांचा अवलंब करण्यास जगभरातील बँका प्रोत्साहित करण्यासाठी त्याचे परिणाम सार्वजनिकरित्या जाहीर केले जातील.
 5. UN एनवायरनमेंट फायनॅन्स इनीशीएटिव्हची निर्मिती 1992 अर्थ समिटच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेली UN पर्यावरण आणि जागतिक वित्तीय क्षेत्रामधील भागीदारी आहे, ज्यामुळे स्थायी वित्तपुरवठ्याची जाहिरात करण्यासाठी अभियान चालवले जाते.
 6. सध्या बँक, विमा आणि गुंतवणुकदारांसहित 200 पेक्षा अधिक आर्थिक संस्था UN पर्यावरण सोबत सहकार्य करतात.


UN ITU चा 'लिव्हरेगिंग टेक टु अचिव्ह द ग्लोबल गोल' अहवाल प्रसिद्ध

माहिती व संपर्क तंत्रज्ञान (ICT) आणि 17 शाश्वत विकास ध्येये यांच्यामधील महत्त्वपूर्ण दुव्याला स्पष्ट करणारा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियन (ITU) ने प्रसिद्ध केला आहे.

या अहवालाचे शीर्षक 'फास्ट-फॉरवर्ड प्रोग्रेस: लिव्हरेगिंग टेक टु अचिव्ह द ग्लोबल गोल' असे आहे.

ठळक बाबी:-

 1. दुर्गम भागात दूरसंचार जाळे आणि ICT चा विस्तार,
 2. नवीन डिजिटल कौशल्य असलेले प्रशिक्षित व सुसज्ज कामगार
 3. शाळा,
 4. रुग्णालये,
 5. आरोग्य केंद्रे आणि संपूर्ण शहरांना स्मार्ट-संरचनेत बदलण्याची खात्री करणे,
 6. अधिक ऊर्जा कार्यक्षम आणि सुरक्षित असल्याची खात्री करणे

अश्या बाबींसाठी प्रयत्न करण्याबाबत विविध मुद्द्यांना स्पष्ट करण्यात आले आहे.

पाच मुख्य विभागात अहवाल सादर:-

 1. कोणीही ‘ऑफलाइन’ राहणार नाही,
 2. अभिनवता व बदलासाठी ICT च्या प्रभावी घटकाला ओळखणे,
 3. लोकांना प्रथम विचारात घेणे,
 4. ICT चा फायदा उठवण्यासाठी त्वरित कारवाईचे महत्त्व,
 5. नवीन अभिनव भागीदारी तयार करणे

इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स यूनियन बद्दल:-

इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियन (ITU) ही संयुक्त राष्ट्रसंघाची माहिती व संपर्क तंत्रज्ञानाविषयक एक विशेष संस्था आहे.

ही संस्था रेडिओ स्पेक्ट्रमच्या सामायिक जागतिक वापरात मदत करते,

उपग्रहांच्या परिभ्रमण कक्षा ठरविण्यात आंतरराष्ट्रीय सहकार्यास प्रोत्साहन देते,

जगात दूरसंचार पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी काम करते.

जगभरातील तांत्रिक मानकांच्या विकासामध्ये आणि समन्वयामध्ये मदत करते.

पॅरिसमध्ये 1865 साली ITU ची स्थापना झाली.

ITU चे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे.

याचे 193 सदस्य राष्ट्रे आहेत.


जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि यूनायटेड यूनियन चिल्ड्रेन्स फंड (UNICEF) यांचा “प्रोग्रेसऑन ड्रिंकिंग वॉटर, सॅनिटेशन अँड हायजिन: 2017 अपडेट अँड सस्टेनेबल डेवलपमेंट गोल बेसलाइन्स” शीर्षक असलेला संयुक्त अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ठळक बाबी जगभरात जवळजवळ 10 पै

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि यूनायटेड यूनियन चिल्ड्रेन्स फंड (UNICEF) यांचा “प्रोग्रेसऑन ड्रिंकिंग वॉटर, सॅनिटेशन अँड हायजिन: 2017 अपडेट अँड सस्टेनेबल डेवलपमेंट गोल बेसलाइन्स” शीर्षक असलेला संयुक्त अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

ठळक बाबी:-

 1. जगभरात जवळजवळ 10 पैकी 3 व्यक्तींना सुरक्षित पेयजल उपलब्ध नाही आणि 10 पैकी 6 व्यक्तींना सुरक्षित अशी स्वच्छता उपलब्ध नाही.
 2. अनेक घर, आरोग्य केंद्र आणि शाळा येथे हात धुण्यासाठी पुरेशे साबण आणि पाणी उपलब्ध नाही, ज्यामुळे विशेषत: लहान मुलांना घातक रोगांपासून धोका आहे.
 3. जगभरात दरवर्षी पाच वर्षाखालील 361,000 मुलं अतिसारचा त्रास होऊन मृत्यूमुखी पडतात.
 4. स्वच्छता राखणे हा अतिसार, हैजा, हगवण, हेपेटाइटिस ए आणि टायफाईड सारख्या रोगास प्रतिबंध करण्याचा सर्वात सोपा आणि सर्वात प्रभावी उपाय आहे.
 5. हात धुण्यासाठी पाणी आणि साबणाची उपलब्धता या बाबतीत 70 देशांमध्ये विभिन्न प्रमाणात या सुविधा आहेत, जसे उप-सहारा आफ्रिकेत 15% लोकसंख्यापासून ते पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेत 76% पर्यंत हे प्रमाण आहे.
 6. 2.1 अब्ज लोकांना सुरक्षित पेयजलाची व्यवस्था नाही, तर 844 दशलक्ष लोकांना अगदी मूलभूत स्वरुपात पेयजल मिळत नाही.
 7. यापैकी 263 दशलक्ष लोकांना पाण्यासाठी 30 मिनिटांपेक्षा जास्तचा प्रवास करावा लागतो.
 8. 159 दशलक्ष लोक अस्वच्छ पाणी किंवा जमिनीवरील स्रोतांकडून पाणी मिळवितात.
 9. 4.5 अब्ज लोकांना सुरक्षित स्वच्छता उपलब्ध नाही, तर 2.3 अब्ज लोकांना स्वच्छतेच्या मूलभूत सुविधाही नाहीत.
 10. यापैकी सुमारे 600 दशलक्ष लोक शौचालय एकत्रितपणे वापरतात आणि बहुतेक ग्रामीण भागात 892 दशलक्ष लोक खुल्यावर शौच करतात.


Top

Whoops, looks like something went wrong.