chalu ghadamodi, current affairs

1. संयुक्त राष्ट्रांनी 15 जुलैला जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला. संयुक्त राष्ट्राने नोव्हेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे हा दिवस मांडला होता
2. युवा कौशल्य विकासाच्या महत्त्वबद्दल जागरुकता वाढवण्याचा दिवस आहे. दिवसासाठी 2019 ची
थीम म्हणजे जीवन आणि कामाबद्दल शिकणे. आजीवन शिक्षण घेण्याकरिता आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे ही या दिवशी संयुक्त राष्ट्राची आहे.
3. जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे 16% तरुण आहेत म्हणजेच 1.2 अब्ज, 15 ते 24 वर्षे वयोगटातील आहेत. शाश्वत, समावेशी आणि स्थिर समाज प्राप्त करण्यासाठी आणि कायमस्वरूपी विकासासाठी आव्हाने आणि धोके टाळण्यासाठी, युवकांचे सक्रिय सहभाग आवश्यक आहे, ज्यात हवामानातील बदल, बेरोजगारी, गरीबी, लैंगिक असमानता, संघर्ष आणि स्थलांतर यांचा प्रभाव समाविष्ट आहे.


chalu ghadamodi, current affairs

1. संगीत नाटक अकादमी २०१८चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारांच्या यादीत सुगम संगीतासाठी गायक सुरेश वाडकर, राजीव नाईक यांना मराठी नाट्यलेखनासा‍ठी तर ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या दिग्गजांचा समावेश आहे. 

2. त्याचबरोबर, विविध कलांमध्ये तबला वादनासाठी झाकिर हुसेन, नृत्यासाठी सोनल मानसिंग हेदेखील मानकरी ठरले आहेत. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांच्या यादीत डान्स कोरिओग्राफर जतिन गोस्वामी, भरतनाट्यमसाठी के. कल्याणसुंदरम पिल्लई यांचाही समावेश आहे. 


chalu ghadamodi, current affairs

1. येत्या काळात नौदलाची ताकद अधिक वाढणार आहे. 100 हेवीवॅट टॉरपॅडो मिसाईल खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 2 हजार रूपयांचे टेंडर जारी केले आहे. तसेच मुंबईतील माझगाव डॉकमध्ये तयार करण्यात येत असलेल्या
स्कॉर्पिअन क्षेणीच्या सहा पाणबुड्यांमध्ये हे टॉरपॅडो मिसाईल तैनात करण्यात येणार आहेत.

2. 100 हेवीवॅट टॉरपॅडो मिसाईल खरेदी करण्यासाठी 10 दिवसांपूर्वीच एक टेंडर जारी करण्यात आले आहे. स्कॉर्पिअन क्षेणीच्या पाणबुड्यांची निर्मिती मुंबईतील माझगाव डॉकमध्ये सुरू असून त्यांना कलवरी क्लास हे नाव देण्यात आले आहे.

3. तसेच या क्षेणीमधील पहिली पाणबुडी यापूर्वीच नौदलात दाखल करण्यात आली आहे. तसेच सध्या ती पाणबुडी ऑपरेशनल मोडमध्ये आहे. सध्या परदेशी विक्रेत्यांकडून नौदलाची मागणी पूर्ण करण्यात येणार असली, तरी त्यानंतरची मागणी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे.

4. तर डीआरडीओ पाणबुड्यांसाठी तसेच लढाऊ युद्धनौकांसाठी हेवीवेट टॉरपॅडो मिसाईलचा वापर करण्याच्या तयारीत आहे. फ्रान्स, स्वीडन, रशिया आणि जर्मनीच्या जागतिक उत्पादकांना हेवीवॅट टॉरपॅडोसाठी टेंडर जारी करण्यात आले आहे.

5. यापूर्वी इटालियन फर्म ‘ब्लॅक शार्क टॉरपॅडो’ या कंपनीची यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु हेलिकॉप्टर घोटाळ्यातील नमेक्केनिका समुहाच्या गुंतवणुकीमुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता.


chalu ghadamodi, current affairs

1. अंधांना चलनी नोटा सहज ओळखता याव्यात, यासाठी एक अनुप्रयोग (अ‍ॅप्लिकेशन) रिझर्व बँक ऑफ इंडियानेविकसित करण्याचे ठरवले असून सध्यातरी रोखीच्या व्यवहारांना महत्त्व असल्याने त्याचा वापर करता येणार आहे.

2. सध्या 10, 20, 50, 100, 200, 500, 2000 या नोटा चलनात असून एक रुपयाची नोट केंद्राने जारी केली आहे.

3. तर रिझर्व बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे, की नोटा ओळखणे अंधांना सोपे नसते. त्यामुळे या नोटांमधील खुणांच्या माध्यमातून त्या ओळखणे आवश्यक असते त्यासाठी 100 व त्यावरील चलनाच्या नोटात अंधांसाठी खास ओळख
पटवणाऱ्या सुविधा आहेत पण त्या त्यांना माहिती नाहीत.

4. अंधांना या नोटा ओळखता याव्यात यासाठी रिझर्व बँक प्रयत्नशील आहे. महात्मा गांधी मालिका व महात्मा गांधी नवी मालिका यातील नोटांच्या प्रतिमा घेऊन प्रस्तावित मोबाइल अनुप्रयोगासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.


chalu ghadamodi, current affairs

1. राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकार्‍यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येईल आणि सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. येत्या 31 डिसेंबरपर्यंत हा निर्णय लागू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

2. केंद्राप्रमाणे राज्यातही पाच दिवसांचा आठवडा लागू करणे, वेतन त्रुटींबाबत बक्षी समितीचा दुसरा अहवाल तत्काळ सादर करणे, केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोगातील वाहतूक भत्त्यासह इतर भत्ते मिळणे, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे, महिला कर्मचार्‍यांसाठी दोन वर्षांची बालसंगोपन रजा देणे, प्रशंसनीय कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ देणे, अधिकार्‍यांच्या पाल्यांनाही अनुकंपा भरती सुविधा लागू करणे अशा विविध 18 मागण्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. 


chalu ghadamodi, current affairs

1. सन 622 मध्ये प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली.

2. अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी 16 जुलै 1945 मध्ये केली.

3. सन 1965 मध्ये ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले.

4. गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय 16 जुलै 1998 रोजी घेण्यात आला.


Top

Whoops, looks like something went wrong.