1. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी निवडणुकीनंतर आपले नवे मंत्रिमंडळ नेमले असून त्यात मूळ भारतीय वंशाच्या प्रीती पटेल यांचे कॅबिनेट मंत्रिपद कायम राहिले आहे. त्या मंत्रिमंडळातील सर्वात वरिष्ठ सदस्य आहेत. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय विकास हे खाते आहे. हे खाते ब्रेग्झिटची प्रक्रिया सुकर करेल.
  2. नव्या मंत्रिमंडळात गुणवान नेत्यांचा समावेश केला आहे. सर्वासाठी काम करणारा देश आपल्याला हवा आहे. मंत्रिमंडळाचा मुख्य भर ब्रेग्झिटची प्रक्रिया सुरळितपणे पार पाडणे यावर असेल. त्यासाठीच्या वाटाघाटी एका आठवडय़ात सुरू होतील, असे मे यांनी म्हटले.
  3. डॅमियन ग्रीन यांची पहिले मंत्री म्हणून मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यांच्याकडे उपपंतप्रधानपद असेल. ब्रेग्झिटचे खंदे पुरस्कर्ते मायकेल गोव्ह यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन झाले असून त्यांच्याकडे पर्यावरण खात्याची जबाबदारी असेल.
  4. मंत्रिमंडळातील पाच महत्त्वाच्या खात्यांमध्ये काही बदल होणार नाही हे मे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानुसार अर्थमंत्री फिलिप हँमाँड, गृहमंत्री अँबर रुड, परराष्ट्रमंत्री बोरीस जॉन्सन, ब्रेग्झिटचे मंत्री डेव्हिड डेव्हिस आणि संरक्षणमंत्री मायकेल फॅलॉन यांची पदे कायम ठेवली आहेत.


  1. बँकेत खाते उघडण्यासाठी आणि  50 हजार रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेची देवाण घेवाण करण्यासाठी सरकारने आता आधार कार्ड अनिवार्य केले आहे. महसूल विभागाने याचा आदेश काढला आहे. विद्यमान बँक खातेधारकांना आधार कार्ड 31  डिसेंबर 2017 पर्यंत जमा करण्यास सांगण्यात आले.
  2. आधार नंबर न दिल्यास बँक खाते सक्रीय राहणार नाही. 2017-18 च्या अर्थसंकल्पात सरकारने आधारला पॅनशी जोडणे अनिवार्य केलेले आहे.करातून पळवाट काढण्यासाठी लोकांनी एकापेक्षा अधिक पॅनकार्डचा वापर करु नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.
  3. आता व्यक्ती, कंपनी आणि भागीदारीतील कंपनी यांना 50 हजार रुपयांपेक्षा अधिकच्या व्यवहारासाठी आधारसोबत पॅन नंबर, फॉर्म नंबर 60 देणे अनिवार्य करण्यात आले आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.