cultural activities oditorium developing in future announced by thakre

 1. आपल्या धकाधकीच्या आयुष्यात कलेच्या माध्यमातून आनंदाचे क्षण निर्माण करणाऱ्या मराठी रंगभूमीचा पावणेदोनशे वर्षांचा इतिहास चितारणारे कलादालन मुंबईत महापालिकेतर्फे उभारू, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 98व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केली.
 2. गेले तीन दिवस रसिकांच्या उदंड प्रतिसादात रंगलेल्या या नाटय़संमेलनाचा औपचारिक समारोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला.
 3. 60 तास अखंड चालणाऱ्या या संमेलनातील उर्वरित कार्यक्रम त्यानंतरही सुरूच राहिले.
 4. तसेच संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात बाहेरगावच्या रंगकर्मीना मुंबईत आश्रयस्थान मिळावे अशी जी मागणी केली होती त्याचा संदर्भ घेऊन ठाकरे यांनी अंधेरीतील शहाजीराजे क्रीडासंकुलात ती सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे ठोस आश्वासनही यावेळी दिले.


today Eid celebrated in all over india

 1. महिनाभर रोजे अर्थात उपवास केल्यानंतर शनिवारी म्हणजेच 16 जून रोजी देशभरात रमजान ईद साजरी होते आहे. पहाटेच्या नमाज अदा करण्यापासून रमजान ईदचा उत्साह दिसू लागला आहे.
 2. 16 जून रोजी मुस्लिम बांधव एकमेकांच्या घरी जाऊन गळाभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा देतात. 17 जून रोजी संध्याकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी चंद्र दिसल्याने शाही इमामांनी देशातील सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
 3. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमजान ईद असल्याने देशभरातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. बंधुभाव आणि प्रेम वाढीला लागावे यासाठी प्रार्थनाही केली आहे.
 4. रमजानचा महिना हा जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी पवित्र महिना मानला जातो. रमजान हा इस्लाम दिनदर्शिकेतला नववा महिना आहे. ही दिनदर्शिका चंद्राच्या कला लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.
 5. जेव्हा हजरत मुहम्मद पैगंबर मक्केहून मदिनेला गेले तेव्हापासून इसवी सन पूर्व 622 मध्ये हिजरी दिनदर्शिका सुरु करण्यात आली. शिरकुर्मा हा खास गोड पदार्थ रमजानच्या निमित्ताने तयार केला जातो.
 6. तसेच बिर्याणी, मटण यांसह विविध लज्जतदार पदार्थ तयार केले जातात. अत्यंत आनंदात आणि उत्साहात रमजान ईद साजरी केली जाते.


NLCIL Has started 3 new 100 mw solar energy project with nationalization

 1. केंद्रीय रेल्वे व कोळसा मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते ‘नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड (NLCIL)’ याच्या प्रत्येकी 100 मेगावॅट (MW) क्षमतेच्या तीन सौर ऊर्जा प्रकल्पांचे राष्ट्रार्पण करण्यात आले आहे.
 2. तामिळनाडू राज्याच्या विरुधुनगर जिल्ह्यातील थोप्पलाकराय आणि सेथुपुरम येथे तसेच तिरुनेलवेली जिल्ह्यातील सेलैया सेझियानल्लूर येथे हे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले गेले आहेत.
 3. यासाठी 1300 कोटी रुपयांचा खर्च आला.
 4. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड (NLCIL) ही भारत सरकारची नवरत्न कंपनी आहे, जी लिग्नाइट पदार्थासाठी खनिकर्म चालवते आणि लिग्नाइट आधारित औष्णिक विद्युत प्रकल्प चालवते.
 5. याची स्थापना 1956 साली तामिळनाडूमधील नेवेली येथील लिग्नाईटच्या साठ्याच्या शोधानंतर केली गेली.


fifa world cup 2018 held in russia

 1. वर्ल्डकप २०१८चा शुभारंभ झाला. यंदाच्या वर्ल्डकपसाठी बनवण्यात आलेले 'लिव्ह इट अप' हे गाणे सगळ्यात सुरुवातीला वाजले आणि नंतर अर्धा तास रंगारंग सोहळ्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
 2. ब्रिटनचा रॉकस्टार रॉबी विल्यम्स तसेच रशियन गायिका एडा गरिफुलिना यांच्या सादरीकरणानंतर मॉडेल व्हिक्टोरिया लोपरेया ही फुटबॉल घेऊन मैदानात उतरली.
 3. त्यानंतर ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डोने फुटबॉलला किक मारली आणि वर्ल्डकपच्या महाकुंभाला सुरुवात झाली.
 4. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फांटिनो यांनी वर्ल्डकपचे उद्घाटन झाल्याची अधिकृत घोषणा केली.
 5. FIFA विश्वचषक 2018 रशियात होत आहे. 14 जून ते 15 जुलै 2018 या काळात चालू असलेली ही वर्षातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा आहे. यावर्षीचा FIFA विश्वचषक मालिकेमधील 21 वे संस्करण आहे. ही स्पर्धा FIFA च्या सदस्य संघांच्या राष्ट्रीय पुरुष संघांमध्ये खेळली जात आहे.
 6. ठळक वैशिष्ट्ये:-
  1. रशियात 11 शहरातील 12 ठिकाणी एकूण 64 सामने खेळले जातील. स्पर्धेत 32 राष्ट्रीय संघ खेळणार आहेत. त्यापैकी 20 संघ 2014 सालापासून दरवर्षी खेळताना दिसून आलेले आहेत.
  2. आइसलँड आणि पनामा या देशांमधून दोन संघ या स्पर्धेत प्रथमच सामने खेळतील.
  3. ब्राझीलमध्ये झालेल्या 2014 FIFA विश्वचषक स्पर्धेच्या खर्चाला मागे टाकत यावर्षीची स्पर्धा $ 11.8-14 अब्ज एवढ्या खर्चासह इतिहासातली सर्वात महाग फुटबॉल स्पर्धा ठरण्याची अपेक्षा आहे.
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (International Federation of Football Association -FIFA)
 1. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (International Federation of Football Association -FIFA) हा एक खाजगी महासंघ आहे, जो स्वतःस असोसिएशन फुटबॉल, फुटसल आणि बीच सॉकर या क्रीडाप्रकारांची एक आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था म्हणून संबोधतो.
 2. FIFA फुटबॉलच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संघटनासाठी, विशेषत: विश्वचषक (1930 सालापासून) आणि महिला विश्वचषक (1991 सालापासून) यांसाठी जबाबदार आहे.
 3. 1904 साली FIFA याची स्थापना करण्यात आली.
 4. याचे झुरिच (स्वित्झर्लंड) येथे मुख्यालय आहे आणि त्याच्या सदस्यत्वामध्ये आता 211 राष्ट्रीय संघांचा समावेश आहे.
 5. युरोपमध्ये जर्मनीत 2006 साली पहिल्यांदा विश्वचषक आयोजित केला गेला होता. तेव्हापासून युरोपमध्ये अकरा वेळ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.


indar jit singh appointed as coal secretary

 1. इंदार जीत सिंग हे 1985 च्या बॅचचे केरळ केडरचे आयएएस अधिकारी आहेत 
 2. कोळसा सचिव म्हणून त्यांची नुकतीच नेमणूक करण्यात आली.
 3.  त्यांनी सुशील कुमार यांची जागा घेतली
 4.  यापूर्वी ते कॅबिनेट सचिवालयात सचिव होते
 5.  त्यांनी पंजाब विद्यापीठातून पीएचडी केली आहे.


Top