National 'Wind-Solar Hybrid' policy of the Government of India

 1. भारत सरकारच्या नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाने आपले राष्ट्रीय ‘पवन-सौर संकरित’ धोरण प्रसिद्ध केले आहे.
 2. धोरणाचे लक्ष्य अक्षय ऊर्जा निर्मितीत असलेली भिन्नता कमी करणे आणि चांगली ग्रिड स्थिरता प्राप्त करणे हे आहे.
 3. हे धोरण ट्रांसमिशन संबंधी पायाभूत सुविधांच्या कार्यक्षम वापरासाठी मोठ्या ग्रिडशी जोडलेल्या पवन-सौर फोटोव्होल्टिक (PV) संकरीत प्रणालीच्या प्रसारासाठी एक आराखडा प्रदान करते.
 4. नवीन संकरीत प्रकल्पांसोबतच सध्या कार्यरत असलेल्या पवन आणि सौर प्रकल्पांच्या संकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी नवे धोरण आहे.
 5. धोरणाबाबत:-
  1. धोरणांतर्गत नवीन संकरीत प्रकल्पांची एक योजना तयार केली जाणार.
  2. धोरण AC आणि DC पातळीवर ऊर्जा स्रोतांचे (पवन व सौर) एकात्मिकरणासाठी प्रदान करते.
  3. संकरीत प्रकल्पामध्ये पवन आणि सौर घटकांच्या हिस्स्यात लवचिकपणा देखील प्रदान करते.
  4. हे धोरण यासाठी बंधित आहे की एक स्त्रोतांची वीज क्षमता उच्च दर्जाच्या संकरीत (Rated Hybrid) प्रकल्पाला मान्यता प्राप्त करण्यासाठी अन्य स्त्रोतांच्या उच्च दर्जाच्या वीज क्षमतेच्या कमीतकमी 25% असायला पाहिजे.
  5. धोरण दरावर आधारित पारदर्शक बोली प्रक्रियेवर एका संकरीत प्रकल्पापासून विजेच्या खरेदीसाठी देखील प्रदान करते, ज्यासाठी शासकीय संस्था बोली आमंत्रित करू शकते.
  6. धोरण आऊटपुटला अनुकूल करणे आणि भिन्नतेला कमी करण्यासाठी संकरीत प्रकल्पांमध्ये बॅटरी स्टोरेजच्या उपयोगाची परवानगी देते.
  7. हे नियामक प्राधिकरणांना पवन-सौर संकरीत प्रणालींसाठी आवश्यक मानदंड आणि विनियमांना तयार करण्यासाठी अनिवार्य आहे.


 Allot of DRDO Awards for the year 2016 and 2017

 1. 11 मे 2018 रोजी झालेल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते DRDO मधील शास्त्रज्ञांना DRDO पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
 2. शास्त्रज्ञांच्या उल्लेखनीय योगदानासाठी सन 2016 आणि सन 2017 साठी हे पुरस्कार दिले गेलेत.
 3. पुरस्कार प्राप्तकर्त्यांमध्ये पुढील व्यक्तीचा समावेश आहे –
  1. डॉ. व्ही. के. सारस्वत - DRDO जीवनगौरव पुरस्कार 2017
  2. डॉ. वासुदेव कळकुंटे अत्रे - DRDO जीवनगौरव पुरस्कार 2016
  3. डॉ. जी. सतीश रेड्डी – टेक्नॉलॉजी लीडरशीप पुरस्कार 2016
 4. शिवाय याप्रसंगी 'नवरचना' नावाच्या इलेक्ट्रॉनिक अंमलबजावणी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे.


 RBI refuses new loans to Allahabad Bank

 1. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सार्वजनिक क्षेत्रातल्या अलाहाबाद बँकेवर उच्च जोखिम असणार्‍या क्षेत्रांना कर्ज देणे आणि उच्च मूल्याच्या ठेवी स्वीकारण्यावर निर्बंध लादले आहे.
 2. RBI ने जानेवारीपासून अलाहाबाद बँकेसाठी तात्काळ सुधारात्मक कार्यवाही (PCA) चालवलेली आहे.
 3. बँकेची कॅपिटल अॅडेक्वसी रेशियो आणि डेट रेशियो याच्या स्थितीला पाहता हे पाऊल उचलले आहे.
 4. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते.
 5. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम, 1934 च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले.
 6. मूळ भागभांडवलाची प्रत्येकी 100 समभागामध्ये विभागणी झालेली आहे, जे की सुरुवातीला खाजगी भागधारकांच्या पूर्णपणे मालकीचे होते.
 7. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.


Top