1. कतारची राजधानी दोहामध्ये आयोजित 2017 IBSF जागतिक बिलियर्ड्स विजेतेपद स्पर्धा भारताच्या पंकज अडवाणीने जिंकली.स्पर्धेत पंकज अडवाणीने इंग्लंडच्या माईक रसेल याचा पराभव करत आपल्या कारकीर्दीतील 17 वा विश्व किताब जिंकला.
 2. IBSF जागतिक बिलियर्ड्स विजेतेपद स्पर्धा 1973 सालापासून इंटरनॅशनल बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन (IBSF) कडून आयोजित केली जात आहे.
 3. 1971 साली स्थापित IBSF जगभरातील गैर-व्यावसायिक स्नूकर आणि इंग्लीश बिलियर्ड्स स्पर्धांचे संचालन करते. याचे संयुक्त अरब अमीरातच्या दुबईमध्ये मुख्यालय आहे.


 1. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना या वर्षीच्या गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) 'पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
 2. माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. 20 ते 28 नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव होणार आहे. अमिताभ यांच्या पाच दशकांच्या बॉलीवूडमधील यशस्वी कारकिर्दीसाठी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
 3. 75 वर्षांच्या अमिताभ यांनी आतापर्यंत 190 चित्रपटांत काम केले. अनेक वेळा अपयश येऊनही त्यांनी सगळ्यांवर मात करीत यशाची पायरी गाठली आहे.


 1. 14 नोव्हेंबर 2017 रोजी बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार 2017’ प्रदान करण्यात आले.
 2. राष्‍ट्रीय बाल कल्‍याण पुरस्‍कार आनंद कुमार, महेश जाधव, अच्‍युत सावंत या व्यक्तींना प्रदान करण्यात आला.
 3. इनोव्हेटिव मिड ब्रेन ऑप्‍टीमायजेशन इंस्‍टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेड (दिल्ली), सोसायटी फॉर ट्रायबल एंड रूरल डेव्हलपमेंट (कर्नाटक), अक्षय पात्र फाउंडेशन (कर्नाटक), आरंभ इंडिया इनीशिएटिव्ह (महाराष्ट्र), निर्वाण -एक सामाजिक कल्‍याण संघटना (उत्तरप्रदेश) या संस्थांना देखील पुरस्कार प्रदान केला गेला.
 4. राजीव गांधी मानव सेवा पुरस्‍कार शांतीलाल गुलाबचंद मुत्‍था (महाराष्ट्र), शेजियन रामू (तामिळनाडू), शोभा विद्यार्थी (उत्तराखंड) यांना देण्यात आला.
 5. तामिळनाडूच्या आकाश मनोज याला अभिनव श्रेणीत यावर्षी सुवर्णपदक प्राप्त झाले. तर महाराष्ट्राच्या जैसल शहा याला बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात रौप्यपदक देण्यात आले.
 6. शिक्षण, सांस्कृतिक, कला अश्या विविध क्षेत्रात असाधारण कर्तृत्व दाखविणार्‍या 5-18 वर्ष वयोगटातील बालकांचा राष्‍ट्रीय बाल पुरस्‍कार देऊन तसेच बालकांच्या विकासामध्ये योगदान देणार्‍या व्यक्ती/संस्थांचा गौरव करण्यात येतो. महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे हे पुरस्कार दिले जातात.
 7. असाधारण कामगिरी करणाऱ्या मुलांना तसेच बालकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राष्‍ट्रीय बाल कल्‍याण पुरस्‍कार आणि राजीव गांधी मानव सेवा पुरस्‍कार यांनी गौरवण्यात येते.
 8. 1996 साली या राष्‍ट्रीय बाल पुरस्‍काराची स्थापना करण्यात आली. पुरस्कारांमध्ये एक सुवर्णपदक आणि 15 रौप्यपदकांचे वाटप केले जाते.


 1. चार वेळा FIFA विश्वचषक जिंकणारा इटली यावेळी रशियात होणार्‍या FIFA विश्वचषक 2018 मध्ये खेळण्यास अपात्र ठरला आहे. इटलीच्या गेल्या 60 वर्षांच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय संघाने FIFA विश्वचषकमध्ये जागा मिळविण्यास अयशस्वी ठरले. स्पर्धेच्या क्वालिफायर प्लेऑफ सामन्यात स्वीडनने इटलीचा पराभव केला.
 2. FIFA विश्वचषकमध्ये या वर्षी स्वीडन 2006 सालानंतर प्रथमच खेळताना दिसणार आहे. यापूर्वी सन 1958 मध्ये इटली FIFA विश्वचषकसाठी अपात्र ठरली होती. या अपयशानंतर इटलीचा गोलकीपर जानलुइजी बुफॉन याने आंतरराष्ट्रीय फुटबाल खेळांमधून आपली निवृत्ती जाहीर केली.
 3. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फुटबॉल असोसिएशन (FIFA) हा एक खाजगी संघ आहे, जो स्वतःस असोसिएशन फुटबॉल, फुटसल आणि बीच सॉकर या क्रीडाप्रकारांची एक आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था म्हणून संबोधतो.
 4. FIFA फुटबॉलच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संघटनासाठी, विशेषत: विश्वचषक (1930 सालापासून सुरू झालेले)  आणि महिला विश्वचषक (1991 सालापासून सुरू झालेले) यांसाठी, जबाबदार आहे.
 5. 1904 साली FIFA ची स्थापना करण्यात आली. याचे झुरिच (स्वीत्झर्लंड) येथे मुख्यालय आहे आणि त्याच्या सदस्यत्वामध्ये आता 211 राष्ट्रीय संघटनांचा समावेश आहे.


 1. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलीपिन्सच्या दौर्‍यावर आहेत. या दरम्यान भारत आणि फिलीपिन्स यांच्यात चार करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या आहेत.
 2. संरक्षण सहकार आणि लॉजिस्टिक, कृषी, सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग (MSME) तसेच इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स (ICWA) आणि फिलीपिन्स फॉरेन सर्विस इंस्टीट्यूट (PFSI) यांच्यात संबंध प्रस्थापित करण्यासाठी, असे चार करार झालेत.
 3. याशिवाय, भारतीय पंतप्रधान आणि फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटेरत यांनी व्यापार व गुंतवणूक वाढविणे तसेच दहशतवादविरोधी कार्यात द्विपक्षीय सहकार वाढविण्यास समर्थन दिले.
 4. फिलिपिन्स हा पश्चिमी प्रशांत महासागरातील एक दक्षिणपूर्व आशियाई देश आहे, यात 7000 पेक्षा जास्त बेटे आहेत. त्याची राजधानी मनिला शहर असून देशाचे चलन फिलीपाइन पेसो हे आहे.
 5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिलिपिन्स दौऱ्याच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्रास (आयआरआरआय) भेट देऊन भाताच्या दोन नवीन प्रजातींचे बियाणे संस्थेच्या जनुक पेढीस दिले.
 6. भाताच्या या दोन्ही प्रजाती भारतीय आहेत. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, की दारिद्रय़ व भूक या दोन समस्यांवर मात करण्यासाठी भाताचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे.


Top