NCDC's new scheme to promote young entrepreneurs in the cooperative sector

 1. सहकार क्षेत्रात तरुणाईच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (NCDC) याने एक योजना तयार केली आहे.
 2. 'युवा सहकार - कोऑपरेटीव्ह एंटरप्राइज सपोर्ट अँड इनोव्हेशन स्कीम' या योजनेच्या माध्यमातून तरुणाईला सहकार क्षेत्रात चालवल्या जाणार्‍या व्यवसायिक उपक्रमांकडे आकर्षित करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
 3. योजनेचे स्वरूप -
  1. NCDCने तयार केलेली ही योजना 1000 कोटी रुपयांच्या सहकार स्टार्टअप आणि अभिनवता कोष (Cooperative Start-up and Innovation Fund -CSIF) याच्याशी जोडली जाणार आहे.
  2. ईशान्य भारत, NITI आयोगाने ओळखलेली 28 राज्यांमधील विकास आकांक्षित जिल्हे तसेच महिला/अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग सदस्य असलेल्या सहकार उपक्रमांना अधिक अनुदान (प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी 80%) मिळणार, तर इतरांसाठी 70% अनुदान मिळणार. कर्जावरील व्याज दर देखील कमी असेल.
  3. या योजनेसाठी सर्व प्रकारचे सहकार उपक्रम किमान एक वर्षासाठी कार्यरत असावेत असा निकष ठरविण्यात आला आहे.
 4. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ -
  1. 1963 साली राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (National Cooperative Development Corporation -NCDC) याची स्थापना करण्यात आली आहे.
  2. नवी दिल्लीत याचे मुख्यालय आहे.
  3. हे मंडळ कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.


Launch of the India International Cherry Blossom Festival in Meghalaya

 1. दिनांक 14 नोव्हेंबर 2018 रोजी मेघालय राज्याच्या शिलांग शहरामध्ये ‘भारत आंतरराष्ट्रीय चेरी ब्लॉसम महोत्सव 2018’ या कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला आहे.
 2. ही या महोत्सवाची तिसरी आवृत्ती आहे.
 3. जपान सरकारच्या भागीदारीने हा महोत्सव साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रोत्साहन दिले जात आहे.  
 4. चार दिवसांच्या या महोत्सवाचे आयोजन भारत सरकारचे वन व पर्यावरण विभाग, मेघालय राज्य सरकार, जैव-स्त्रोत व शाश्वत विकास संस्था तसेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांच्या संयुक्त सहकार्याने केले गेले आहे.
 5. शरद ऋतूत (उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतुंमधील काळ) हिमालयाच्या प्रदेशात चेरी ब्लॉसम या झाडाला बहर येतो.
 6. या विशेष बहारदार झाडांच्या निमित्ताने फुलांचा उत्सव साजरा केला जात आहे. 


APIX: New banking technology for non-bank accounts in 23 countries

 1. 10 ASEAN सदस्य देशांसह 23 देशांमध्ये बँक खात्याशिवाय असलेल्या लोकांपर्यंत पोहचण्यासाठी विशेषतः लहान बँका, टीयर-3 आणि 4 साठी बोस्टन येथील ‘वर्च्युसा’द्वारे ‘अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस एक्सचेंज (APIX)’ नावाचे एक नवीन बँकिंग तंत्रज्ञान तयार करण्यात आले आहे.
 2. सिंगापूरमध्ये दिनांक 14 नोव्हेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या बँकिंग तंत्रज्ञानाचे अनावरण करण्यात आले आहे.
 3. या तंत्राच्या माध्यमातून ठरविलेल्या क्षेत्रातल्या जवळजवळ दोन अब्ज लोकांपर्यंत मदत पोहचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, जे अजूनही बँक खात्याशिवाय आहेत. 
 4. ‘अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस एक्सचेंज (APIX)’ हा एक वैश्विक फायनॅनष्यल टेक्नॉलॉजी (फिनटेक) मंच आहे.
 5. हे बोस्टन येथे मुख्यालय असलेल्या ‘वर्च्युसा (Virtusa)’ या कंपनीने विकसित केलेले एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे.
 6. हे तंत्रज्ञान दुर्गम प्रांतात लोकांपर्यंत पोहचण्यासाठी विशेषतः लहान बँकांसाठी (टियर 3 आणि टियर 4) हैदराबाद, कोलंबो आणि लंडन येथील सॉफ्टवेअर तंत्रज्ञांद्वारे तयार केलेले आहे.


International Tolerance Day: November 16

 1. संयुक्त राष्ट्रसंघाकडून दरवर्षी 16 नोव्हेंबर या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन’ (International Day for Tolerance) पाळला जातो.
 2. या दिनानिमित्त आयोजित एका समारंभात मॅनोन बार्बेऊ (कॅनडाचे चित्रपट निर्माता) आणि कोएक्जिस्ट इनिशिएटिव्ह (केनियाची सामाजिक संस्था) यांना यावर्षीचा ‘सहिष्णुता आणि अहिंसा याला प्रोत्साहन देण्यासाठीचा UNESCO-मदनजीत सिंग पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
 3. यावेळी संयुक्त राष्ट्रसंघ सार्वजनिक माहिती (United Nations Department of Public Information) कडून ‘2018 यूट्यूब क्रिएटर्स फॉर चेंज’ या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले, ज्यामध्ये यूट्यूबचा वापर करणार्‍या निर्मात्यांकडून निर्मित निवडक आंतरराष्ट्रीय लघुपटांना प्रदर्शित करण्यात आले.
 4. जगभरात संस्कृती आणि लोक यांच्यात परस्पर समंजस्यता वाढवून सहिष्णुतेला बळ देण्याच्या उद्देशाने, दिनांक 16 नोव्हेंबर 1995 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (UNESCO) याच्या सदस्य राष्ट्रांनी ‘सहिष्णुतेसंबंधी तत्त्वांचे घोषणापत्र’ (Declaration of Principles on Tolerance) अंगिकारले होते.
 5. या घटनेच्या स्मृतीत, 1996 साली संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने 16 नोव्हेंबर या दिवशी पहिला ‘आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन’ पाळला.
 6. 1995 हा साल ‘संयुक्त राष्ट्रसंघ सहिष्णुता वर्ष’ (United Nations Year for Tolerance) म्हणून पाळला गेला होता.
 7. संयुक्त राष्ट्रसंघाने जगात सहिष्णुता, सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘टुगेदर’ नावाची मोहीम सुरू केली आहे.
 8. ज्यामधून स्थलांतरित आणि शरणार्थी यांच्याबाबत असलेला नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी कार्य केले जात आहे.


National Papers Day: November 16

 1. भारतीय पत्र परिषद (Press Council of India) कडून दरवर्षी 16 नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय पत्र दिन’ म्हणून पाळला जातो.
 2. यावर्षी या दिनानिमित्त वित्तमंत्री   अरुण जेटली यांच्या हस्ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
 3. या कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वाटप करण्यात आले आहे, ते म्हणजे –
 4. पत्रकारीतेमध्ये उत्कृष्टतेसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार – सी. के. प्रसाद (भारतीय पत्र परिषदेचे (PCI) अध्यक्ष)
 5. राजा राम मोहन रॉय पुरस्कार – एन. राम (हिंदू पब्लिशिंग ग्रुपचे अध्यक्ष)
 6. ग्रामीण पत्रकारीतेसाठीचा पुरस्कार - रुबी सरकार (देशबंधू, भोपाळ) आणि राजेश जोश (दैनिक पुढारी, रत्नागिरी).  
 7. रीपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स (RSF)च्या क्रमवारीतेनुसार, पत्रकारीतेच्या स्वातंत्र्याबाबतीत भारताचा 180 देशांमध्ये 138 हा क्रमांक आहे.
 8. याबाबतीत नॉर्वे हा सलग दुसऱ्या वर्षीही अग्रस्थानी आहे.
 9. भारतात ‘पत्र परिषद’ याची स्थापना सन 1956 मध्ये झाली, जे की देशातील पहिले पत्र आयोग होते.
 10. त्यानंतर दिनांक 16 नोव्हेंबर 1966 रोजी भारतीय पत्र परिषद (PCI) याची स्थापना करण्यात आली.
 11. स्थापना दिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रीय पत्र दिन’ (किंवा राष्ट्रीय प्रेस दिन किंवा राष्ट्रीय वृत्तसंस्था दिन किंवा राष्ट्रीय वृत्त दिन) पाळला जातो.


Top