The importance of water in smart energy options

 1. वातावरणातील बदलामुळे पृथ्वीसाठी धोका निर्माण झाला आहे. याबाबत घेतले जाणारे सर्व पुढाकार कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासंबंधी केंद्रित आहे. परंतु, या समस्येशी परिणामकारकपणे लढण्यास पाण्याचाही विचार होणे आवश्यक ठरते.
 2. ऊर्जा क्षेत्राकडून जलस्रोतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि त्यामुळे धोरण तयार करताना धोरण निर्मात्यांना जलस्त्रोतांना पुनर्संचयित करण्याबाबत विचार करणे अत्यावश्यक आहे.
 3. अमेरिकेच्या नॅशनल रिसोर्स कौन्सिलने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, पाणी हे दोन्ही हवामानातील बदलांची कारक आणि परिणाम असे दोन्ही आहे. ज्याप्रमाणे वातावरणातील कार्बन साठल्याने वातावरणातील बदल घडतात, तसंच जलस्रोतांची हानीही होते. या प्रक्रियेमध्ये ते एकमेकांना वाढवतात.
 4. जगभरात पाण्याचा होणारा वापर:-
  1. विकसित देशांमध्ये ऊर्जा क्षेत्र ताज्या पाण्याचे सर्वात मोठे ग्राहक आहे, तर ऑस्ट्रेलिया आणि विकसनशील देशांमध्ये कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो.
  2. युरोपीय संघामध्ये दरवर्षी वीज निर्मिती करण्यास सर्वाधिक ताजे पाणी वापरले जाते. त्यानंतर अमेरिकेत याबाबत असलेले प्रमाण 41% आहे.
  3. भुजलस्रोतांचा वापर करण्यासाठी ऊर्जा कंपन्या खोलवर खोदत आहेत. जरी जैव-इंधनपासून स्वच्छ ऊर्जेची निर्मिती केली जाते तरीही पाण्यावर प्रचंड ताण निर्माण होणारच.
ही समस्या कशी हाताळावी?
 1. देशांनी स्मार्ट ऊर्जा पर्यायाची निवड करणे आवश्यक आहे, जी केवळ कमी कार्बन केंद्रीत नसेल तर पाण्याच्या बाबतीत संवेदनशील असणार आहे.
 2. पूर्वीच्या धारणेनुसार, स्वच्छ ऊर्जेचे स्रोत, जसे की क्लिन कोल तसेच अणुप्रकल्प, पाण्याबाबत संवेदनशील अश्या प्राथमिकतेमध्ये अग्रभागी असावेत.
 3. संभवत: सौर आणि पवन ऊर्जा या अश्या दोन ऊर्जा निर्मिती यंत्रणा आहेत जेथे पाण्याची आवश्यकता नाही.
 4. वीज प्रकल्प गोड्या पाण्याच्या स्त्रोतांच्या ठिकाणी नसावेत. ते खारेपाणी, क्षारयुक्त पाणी आणि निकृष्ट पाणी यावर अवलंबून असावेत.
 5. सागरी किनारपट्टीच्या भागात असलेले अणुऊर्जा प्रकल्प हा एक स्वागतार्ह पुढाकार आहे, कारण ते समुद्राच्या पाण्यावर अधिक अवलंबून असणार आहे.
 6. पाणी आणि ऊर्जा धोरण असण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे दोन्हीमध्ये समतोल साधू शकता येणार आहे.


 "The Nigelated Solutions to TB Crisis": A research paper

 1. जोआन लिऊ आणि पॉल फार्मर यांचा “द निगलेक्टेड सोल्यूशन्स टु TB क्रायसेस” हा शोधनिबंध अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. क्षयरोगाच्या संकटाचा संक्षिप्त आढावा या अहवालात त्यांनी स्पष्ट केला आहे.
 2. ठळक बाबी :-
  1. जरी क्षयरोग कोणत्याही व्यक्तीवर हल्ला करू शकतो, तरी शरणार्थी शिबिरांत, झोपडपट्ट्या आणि तुरुंगांसारख्या ठिकाणी असंतुलितपणे दुर्लक्षित आणि संवेदनशील लोकसंख्येवर त्याचा प्रतिकूल परिणाम आढळून येतो आहे.
  2. 2016 साली 10.4 दशलक्ष लोकांना या रोगाची लागण झाली. यावर्षी क्षयरोगाने जवळजवळ 20 लाख लोकांचा मृत्यू होण्याचा अंदाज आहे, कारण ते गरीब आहेत आणि त्यांना उपचार परवडण्याजोगा नाही.
  3. क्षयरोगशी लढा देण्यासाठी आपल्याकडे उपचार आहे, परंतु बहू-औषधी प्रतिरोधक (MDR) क्षयरोग हा एक गंभीर धोका आहे, ज्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. MDR-क्षयरोग हा हवेनी पसरतो आणि अगदी सहज पसरतो. त्यावर सध्याच्या उपचारामध्ये विषारी औषधांचा एक निश्चित उपचार घ्यावा लागतो.
  4. क्षयरोगासाठी उपचार पर्याय काही दशकांपासून क्वचितच उत्क्रांत झाले आहेत. HIV/एड्स आणि हेपॅटायटीस सी या रोगांमधील वाढत्या संशोधन आणि विकासाने क्षयरोगासाठी संशोधन आणि विकास खूपच मागे पडला आहे.
  5. गेल्या 50 वर्षांनंतरही क्षयरोगासाठी एकही नवीन औषध विकसित केले गेले नाही. मात्र ‘बेडाक्युलाइन’ आणि ‘डेलामनाईड’ या दोन औषधांना तत्काळ मंजूरी देण्यात आली आहे. आतापर्यंत या नव्या औषधांनी लोकांच्या गरजेच्या तुलनेत फक्त 5% रुग्णांना फायदा झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, चार वर्षांनंतरही केवळ 1247 रुग्णांना ‘डेलामनाईड’ औषध दिले गेले.
  6. क्षयरोगाने ग्रसित 17 देशांमध्ये नवीन औषधांचा वापर वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने ‘एंड टीबी’ पुढाकाराचा शुभारंभ केला आहे. या कार्यक्रमामधून 2022 सालापर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाने क्षयरोगाच्या संकटाबाबत पहिली उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार आहे.
  7. आतापर्यंत एकत्रित केलेले पुरावे सूचित करतात की, जेव्हा नवीन औषधे वापरली जातात तेव्हा क्षयरोगाचे उपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये बरे होण्याची शक्यता वाढते आणि ते लवकर बरे होतात.
 3. सल्ला - नव्या उपचार पद्धती विकसित होईपर्यंत, क्षयरोगग्रस्त देशांच्या सरकारांनी त्यांच्याकडे असलेल्या साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अधिकाधिक प्रमाणात ‘बेडाक्युलाइन’ आणि ‘डेलामनाईड’ या दोन नवीन औषधांसाठी प्रवेश वाढवावा.
 4. 24 मार्च 1882 रोजी डॉ. रॉबर्ट कॉच यांना क्षयरोगाचे कारक - ‘TB बॅसीलस’ – या जिवाणूचा शोध लागला. क्षयरोग मायकोबॅक्टेरियम ट्यूबरकुलोसिस जीवाणूमुळे होतो.
 5. क्षयरोग मुख्यत: हवेच्या माध्यमातून पसरणारा रोग आहे. क्षयरूग्णाचे निदान झालेल्या रूग्णास DOTS प्रोव्हायडरमार्फत औषधोपचार दिला जातो.
भारतामधली परिस्थिती आणि उपाययोजना
 1. जगभरात 6-7 कोटी लोक या आजाराने ग्रस्त आहेत आणि क्षयरोगामुळे दरवर्षी जवळजवळ 2.5-3 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. भारतात दर तीन मिनिटाला दोन क्षयरोगींचा मृत्यू होतो, तर दररोज 40 हजार लोकांना याचे संक्रमण होते.
 2. भारतात जवळजवळ 92% इतक्या उच्च प्रमाणात HIV बाधित क्षयरोग रुग्ण आहेत, ज्यांना अॅंटी-रेट्रोव्हायरल थेरपी दिली जात आहे. भारतात वर्षभरात सुमारे 18 लाख लोकांना क्षयरोग (3-4 रूग्णांचा मृत्यू) होतो.
 3. केंद्र शासन क्षयरोगाच्या जलद व गुणवत्तापूर्ण निदानासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक याप्रमाणे एका वर्षात 500 हून अधिक CBNAAT यंत्र रुग्णालयाला देत आहे.
 4. औषध प्रतिरोधक क्षयरोगावरील उपचाराचे परिणाम सुधारण्यासाठी नवीन क्षयरोगाविरोधी औषध “बेडाक्युलाइन” सशर्त प्रवेश कार्यक्रम (CAP) अंतर्गत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रोगासंबंधी खाजगी डॉक्टर शोधण्यासाठी “ई-निक्षय” व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.


 Raj Kapoor Lifetime Achievement award to actor Dharmendra

 1. अभिनेता धर्मेद्र यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे.
 2. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार दिला जाणार आहे.
 3. याव्यतिरिक्त, अभिनेता विजय चव्हाण यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला.
 4. अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला.
 5. महाराष्ट्र राज्य शासनाकडून मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रातल्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा कलाक्षेत्रातल्या ज्येष्ठ व्यक्तीला व्ही. शांताराम जीवनगौरव व व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार तसेच राज कपूर जीवनगौरव व राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.


 The Center increased Nabard's authorized capital to 300 billion

 1. 2022 सालापर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून, केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD/नाबार्ड) याच्या अधिकृत भांडवलाची मर्यादा वाढवली आहे.
 2. नवी मर्यादा सहा पटीने वाढवत 300 अब्ज रुपयांपर्यंत करण्यात आली आहे, या निधीतून ग्रामीण अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी मदत होणार. पूर्वी ही मर्यादा 50 अब्ज रुपये एवढी होती.
 3. भारतात कृषी व ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी ‘NABARD अधिनियम-1981’ अन्वये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) याची स्थापना करण्यात आली.
 4. NABARD कडे कृषी आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये औद्योगिक विकासासाठी कर्ज यासारख्या सुविधा प्रदान करण्यासाठी आणि त्यांच्या नियमनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
 5. सध्या NABARD मध्ये 99.6% भागीदारी केंद्र शासनाची तर उर्वरित भारतीय रिझर्व्ह बँकेची आहे.


NASA will send TESS botanics to discover new planets

 1. अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन (NASA) संस्थेनी अन्य ग्रहावर जीवनाचे संकेत शोधण्यासाठी ‘ट्रांझिटिंग एक्झोपॅनेट सर्व्हे सॅटलाइट’ (TESS) ही शोध मोहीम 16 एप्रिल 2018 रोजी अंतराळात पाठवली आहे.
 2. TESS ही एक अंतराळ दूर्बिण असून या मोहिमेमधून सूर्यमालेच्या बाहेर ग्रहांचा शोध घेतला जाणार आहे.
 3. हे यान स्पेस एक्सच्या ‘फॉल्कन 9’ अग्निबाणाने फ्लोरिडा येथील प्रक्षेपण केंद्रावरून सोडण्यात आले आहे.
 4. TESS मध्ये वाइड-फील्ड कॅमेरे बसविलेले आहेत.
 5. यांचा वापर करून दोन वर्षांच्या कालावधीत आपल्या सूर्याभोवती असलेल्या 200,000 तार्‍यांचा वेध घेतला जाणार आहे.


Top