SAYNA AND SINDHU

  1. आसाम येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालने पी. व्ही. सिंधूवर विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली आहे.

  2. तसेच स्पर्धेच्या अंतिम फेरीत सायनाने सिंधूला 21-18 21-5 असे पराभूत केले.

  3. या स्पर्धेतील सायनाचा हा जेतेपदाचा चौकार ठरला आहे. यापूर्वी तीन वेळा सायनाने राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.

  4. या स्पर्धेतील सायनाचे हे चौथे जेतेपद आहे. यापूर्वी सायनाने 2006, 2007 आणि 2017 साली जेतेपद पटकावले होते.

  5. तर लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्यपदकाची कमाई केली होती. सिंधूने 2013 साली रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावले होते.

  6. राष्ट्रीय स्पर्धेत 2013 साली सिंधूने राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर सिंधूला एकदाही राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही.


BRITISH DRONE

  1. ब्रिटनची मॅपिंग एजन्सी ऑर्डनन्स सर्व्हेने एकाच उड्डाणात पृथ्वीच्या प्रत्येक भागाचे छायाचित्र घेण्यास सक्षम असेल.

  2. तर सौरऊर्जेच्या साहाय्याने हा ड्रोन 67 हजार फूट उंचीवर सलग 90 दिवस उड्डाण करू शकेल.

  3. तसेच याद्वारे घेतलली छायाचित्रे विज्ञान संस्थेशी संबंधित संस्था व व्यवसायांना विक्री केली जातील.

  4. हा ड्रोन 150 किलोग्रॅम वजनाचे असून त्याचे पंख 40 मीटर लांबीचे आहेत. मॅपिंगसाठी सर्वोत्तम ड्रोन असल्याचे ऑर्डनन्स सर्व्हेचे म्हणणे आहे.


Top