ms dhoni 10000 runs in oneday cricket

 1. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला.
 2. जागतिक क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा धोनी चौथा भारतीय तर १२वा जागतिक फलंदाज ठरला आहे. तसेच अशी कामगिरी करणारा तो (श्रीलंकेच्या कुमार संगकारानंतर) केवळ दुसरा यष्टीरक्षक आहे.
 3. धोनीव्यतिरीक्त भारताच्या सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी वन-डे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. १० हजारांचा टप्पा गाठणारा धोनी पहिला भारतीय यष्टीरक्षक आहे.
 4. धोनीने आता ३२० सामन्यांमध्ये १०,००४ धावा केल्या असून, सर्वात कमी डावांत हा टप्पा गाठणाऱ्यांमध्ये तो ५व्या क्रमांकावर आहे. त्याने २७३ डावांमध्ये ही कामगिरी केली.


youngs will get army eduction scheme

 1. शिस्तप्रिय आणि राष्ट्रवादी युवकांची भक्कम फळी उभारण्यासाठी दर वर्षी 10 लाख तरुण महिला-पुरुषांशी संपर्क साधून त्यांना लष्करी प्रशिक्षण देण्याबाबतच्या योजनेवर सरकारने चर्चा केली आहे.
 2. राष्ट्रीय युवक सक्षमीकरण योजना अथवा एन-यस असे या योजनेचे नाव आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे.
 3. तसेच त्यामध्ये 12 महिन्यांच्या प्रशिक्षणसाठी ठरलेले पाठय़वेतन देण्यात येणार असून संरक्षण, निमलष्करी दल आणि पोलीस दल यामध्ये नोकरी मिळण्यासाठी एन-यस आवश्यक पात्रता ठरविण्यात येणार आहे.
 4. पंतप्रधानांच्या कार्यालयाने गेल्या आठवडय़ात प्रस्तावित योजनेबाबत बैठक बोलाविली होती आणि त्याला संरक्षण, युवक व्यवहार आणि मानव संसाधन विकास मंत्रालयातील प्रतिनिधी हजर होते, संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्याने या वेळी या विषयाबाबत सादरीकरण केले.
 5. काही अधिकाऱ्यांनी एन-यसबाबत विशिष्ट मते नोंदविली त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले एनसीसी अधिक सक्षम करण्याची सूचनाही करण्यात आली.


ramesh powar appointed as womens indian team coach

 1. भारताचे माजी ऑफस्पिनर रमेश पोवार यांची राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.
 2. जोपर्यंत तुषार आरोठे यांचा उपयुक्त पर्याय शोधला जात नाही तोपर्यंत रमेश पोवार हे संघासोबत असतील.
 3. सीनिअर खेळाडूंसोबतच्या मतभेदानंतर आरोठे यांना राजीनामा देण्यास भाग पडले होते.
 4. सीनिअर खेळाडू बडोद्याच्या या माजी अष्टपैलू खेळाडूच्या प्रशिक्षण देण्याच्या पद्धतीवर नाराज होते.
 5. 25 जुलैपासून भारतीय महिला संघाच्या शिबिरास सुरुवात होणार असून, या शिबिरात पोवार सहभागी होतील.
 6. बीसीसीआयने याआधीच पूर्णवेळ प्रशिक्षकासाठी अर्ज मागितले आहेत आणि अर्जासाठी अखेरची तारीख 20 जुलै आहे.


Top