current affairs, loksatta chalu ghadamodi

1. बहुतांश वेळेस ‘एटीएम’मध्ये कॅश नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळतं. पण आता जर 3 तासाहून अधिक काळ एखाद्या एटीएममध्ये कॅश नसेल तर संबंधित बँकांना दंड ठोठाविण्याच्या तयारीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आहे.

2.छोटी शहरे आणि ग्रामीण भागांतील एटीएमम          ध्ये कित्येक दिवस पैसेच उपलब्ध नसतात. विनाकारण नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागतो. तरीही अनेकदा बँका याकडे दुर्लक्ष करतात. पण आता याविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आरबीआय आहे. यानुसार कोणतंही एटीएम तीन तासांपेक्षा अधिक काळ कॅशलेस नसावं, जर कॅश संपली असेल तर तीन तासांच्या आत संबंधित बँकेनी त्या एटीएममध्ये पैशांचा भरणा करावा अन्यथा बँकेवर दंडात्मक कारवाई केली जाईल.          

3. एखाद्या एटीएममध्ये कॅश आहे किंवा नाही याची माहिती बँकांना मिळत असते. किती रक्कम शिल्लक आहे आणि किती वेळात पैसे संपतील म्हणजेच कधीपर्यंत पैशांचा भरणा करावा याबाबत माहिती देखील संबंधित बँकांना मिळत असते. एटीएममध्ये लावलेल्या सेंसरद्वारे बँकेला रियल टाईमवर किती रक्कम उपलब्ध आहे याची माहिती मिळते.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. आर्टिफिशिअल इंटेलिजंसमध्ये जगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटर डीजीएक्स-2 भारतात आला आहे. या कॉम्प्युटरला जोधपूर आयआयटीमध्ये ठेवण्यात आले आहे. या कॉम्प्युटरमुळे देशातील विद्यार्थ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण देण्यास गती मिळणार आहे.

2. आयआयटी जोधपूरचे कॉम्प्युटर सायन्स विभागाचे अध्यक्ष डॉ. गौरव हरित यांनी सांगितले की, हा जगातील सर्वात वेगवान आर्टिफिशिअल इंटेलिजंस अॅप्लिकेशन्स कॉम्प्युटर असून भारतात पहिल्यांदाच आला आहे. हा कॉम्प्युटर विशेष प्रयोगशाळेमध्ये       बसविण्यात आला आहे.

3. तसेच या कॉम्प्युटरची किंमतही खूप आहे. या कॉम्प्युटरसाठी तब्बल 2.5 कोटी रुपये मोजण्यात आले आहेत. यामध्ये 16 खास जीपीयू लावण्यात आले आहेत. या प्रत्येक कार्डची क्षमता  32 जीबी  एवढी आहे. तर रॅम 512 जीबीची देण्यात
आली आहे. साधारण कॉम्प्युटरची क्षमता केवळ 150 ते 200 वॅट असते. मात्र, या सुपरकॉम्प्युटरची क्षमता 10 किलोवॅट आहे.

4. प्रत्येक कॉम्प्युटर प्रोग्रॅम डेटा विश्लेषण आधारावर असते. आणि हे विश्लेषण सुपरकॉम्प्युटर वेगात करणार आहे.

5. यामध्ये लावलेल्या 32 जीबीची 16 जीपीयू कार्ड या कॉम्प्युटरला खास बनवितात. यामुळे कामाचा वेग वाढला आहे.

6. देशात सध्या आयआयएससी बंगळुरुसह काही संस्थांमध्ये डीजीएक्स-1 सुपरकॉम्प्युटर आहेत. मात्र, डीजीएक्स-2 सुपरकॉम्प्युटर पहिल्यांदाच देशात आला आहे. डीजीएक्स-1 पेक्षा हा कॉम्प्युटर दुप्पट क्षमतेने जास्त आहे.

7. डीजीएक्स-1 ला एखादे काम करण्यासाठी 15 दिवस लागत असतील तर डीजीएक्स-2 ला दीड दिवस लागतात. या कॉम्प्युटरचे वजन तब्बल 150 किलो आहे तर साठवण क्षमता 30 टीबी आहे.           

8. डीजीएक्स-2 हा सुपर कॉम्प्युटर अमेरिकेच्या एनव्हिडीया या कंपनीने बनविला आहे. आयआयटी जोधपूर आणि या कंपनीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजंस क्षेत्रासाठी दोन वर्षांचा करार झाला आहे. या करारानुसारच कॉम्प्युटर भारतात
आणण्यात आला आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. सौंदर्यस्पर्धेतील महत्त्वाचा मानला जाणारा ‘फेमिना मिस इंडिया २०१९’चा किताब राजस्थानच्या सुमन रावने पटकावला आहे. मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियममध्ये शनिवारी हा सोहळा पार पडला.

2. या स्पर्धेत उत्तर प्रदेशची शिनता चौहान पहिली रनरअप ठरली तर तेलंगणाची संजना विज दुसरी रनरअप ठरली आहे.

3.गतवर्षी मिस इंडियाचा किताब जिंकलेल्या अनुकृती वासने सुमनला ‘मिस इंडिया २०१९’चा ताज घातला.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वन-डे क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

2.हा पल्ला गाठण्यासाठी विराटला या सामन्याआधी ५७ धावांची गरज होती. या खेळीदरम्यान विराट कोहलीने भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.

3. सर्वात कमी डावांमध्ये ११ हजार धावा करण्याचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर जमा झाला आहे. विराटने २२२ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.

4.११ वर्षांहून कमी कालावधीत हा पल्ला गाठणारा कोहली हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. वन डे क्रिकेटमध्ये ११००० धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी हा पल्ला पार केला आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. 1885 मध्ये  न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे आगमन झाले.

2. आइसलँडने (डेन्मार्कपासून) 1944 मध्ये स्वातंत्र्य  घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.

3. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक      शाळांतून बायबलचे पठण करणे 1963 मध्ये कायदेबाह्य ठरवले.

4. 1967 मध्ये चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.     

5. 1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.

6. 1297 मध्ये ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. 

7. राजमाता जिजाबाई यांचे निधन 1674 मध्ये झा     ले.


Top

Whoops, looks like something went wrong.