'Petition filed in Australia against the perverse policies of the sugar market' to the WTO

 1. भारताने साखरेवर दिलेल्या अनुदानामुळे जागतिक किंमतींमध्ये "लक्षणीय घट" झाली आहे आणि यामुळे ऑस्ट्रेलियाच्या साखर उत्पादकांना तोटा होत आहे, असा आरोप ऑस्ट्रेलियाने केला आहे.
 2. या आरोपाखाली भारताविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने जागतिक व्यापार संघटनेकडे (WTO) याचिका दाखल केली आहे.
 3. भारत हा साखर उत्पादनात जगातला दुसरा तर ऑस्ट्रेलिया तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.
 4. ऑस्ट्रेलियाने आरोप केला आहे की, भारतात यावर्षीच्या साखर हंगामात साखर उत्पादन सरासरी 20 दशलक्ष टनावरून ते 35 दशलक्ष टनापर्यंत पोहोचले आहे.
 5. WTOच्या नियमांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सहाय्य देण्यासाठी परवानगी देण्यात आलेल्या मर्यादेपेक्षा भारतात अधिक अनुदान दिले जात आहे.
 6. जागतिक व्यापार संघटना (WTO) ही संयुक्त राष्ट्रसंघाची आंतरसरकारी संघटना आहे, जी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करते. 
 7. संघटनेचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे आणि याचे 164 देश सभासद आहेत.
 8. 1948 साली लागू झालेल्या दर व व्यापार संदर्भात सर्वसाधारण करार (General Agreement on Tariffs and Trade -GATT) याला बदली करून दिनांक 15 एप्रिल 1994 रोजी 123 राष्ट्रांनी स्वीकारलेल्या मार्राकेश कराराच्या अंतर्गत WTO अधिकृतपणे दिनांक 1 जानेवारी 1995 रोजी कार्यरत झाले.


Establishment of 'eat Right' award by FSSAI

 1. भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) कडून 2018 साली म्हणजे या वर्षाच्या सुरूवातीस ‘इट राइट इंडिया’ चळवळ सुरू केली गेली.
 2. या पुढाकारासाठी व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी सन्मानित करण्यासाठी यावर्षी ‘इट राइट’ पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे.
 3. सुरक्षित आणि पोषक अन्नधान्य पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘इट राइट इंडिया’ चळवळीत सहभागी झालेल्या अन्नधान्य क्षेत्रातल्या कंपन्या, स्टार्टअप आणि व्यक्ती यांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार तयार करण्यात आला आहे.
 4. भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) याची स्थापना 2011 साली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत झाली.
 5. भारतात अन्न सुरक्षा आणि त्याच्या नियमनशी संबंधित कायदेशीर चौकट प्रदान करणार्‍या ‘अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-2006’ याच्या अन्वये FSSAIची स्थापना करण्यात आली. ही एक स्वायत्त संस्था आहे.
 6. याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे.


NITI commissioned the 'Himalaya State Regional Council'

 1. राष्ट्रीय परिवर्तनीय भारत संस्था (NITI) आयोगाने 'हिमालय राज्य प्रादेशिक परिषद' (Himalayan State Regional Council) याची स्थापना केली आहे.
 2. परिषदेच्या अध्यक्षपदी NITI आयोगाचे डॉ. व्ही. के. सारस्वत हे असतील.
 3. अन्य सदस्यांमध्ये हिमालय प्रदेशातील राज्यांचे मुख्य सचिव तसेच प्रमुख केंद्रीय मंत्रालयांचे सचिव, NITI आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आणि काही विशेष व्यक्ती असतील.
 4. भारतीय हिमालयाच्या क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी ही परिषद तयार करण्यात आली आहे.
 5. हिमालयाच्या क्षेत्रात चालवल्या जाऊ शकणार्‍या कार्यांसाठी विषयनिहाय एक आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने 2017 साली स्थापन केलेल्या पाच कार्यगटांच्या अहवालांवर आधारित ओळखल्या गेलेल्या कृतींचे पुनरावलोकन आणि अंमलबजावणी करण्यासाठी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे.
 6. परिषद 12 राज्यांचा आढावा घेणार आहे, ज्यामध्ये जम्मू-काश्मीर, उत्तराखंड , हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मणीपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्किम, त्रिपुरा, आसामचे दोन जिल्हे (दिमा हसाओ आणि कार्बी अंगलोंग) आणि पश्चिम बंगालचे दोन जिल्हे (दार्जिलिंग आणि कलिमपोंग) यांचा समावेश आहे.


Gaikwad Committee recommends reservation for 16% of Maratha community in Maharashtra

 1. मराठा आरक्षणबाबतचा मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाल महाराष्ट्र राज्य सरकारपुढे सादर केला गेला आहे.
 2. हा अहवाल न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) एन. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने तयार केला आहे.
 3. या अहवालात मराठा समाजाला सरकारी नोकर्‍या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये स्वतंत्रपणे 16% आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
 4. यामुळे राज्यात 68% पर्यंत आरक्षण जाईल. परंतु, भारतीय राज्यघटनेनुसार 50% पेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही.
 5. तामिळनाडूने मात्र आरक्षणसंबंधी कायदेशीर बाबीवर आपल्यापुरता उपाय शोधला होता. म्हणूनच तामिळनाडूत 69% आरक्षण आज अस्तित्वात आहे. अशा प्रकारचे आरक्षण देणारे तामिळनाडू हे देशातले एकमेव राज्य आहे.
 6. यासाठी तामिळनाडूने खास घटनेत तशी तरतूद करून घेतली, न्यायालयात लढाई लढली आणि त्यामुळेच तामिळनाडू हे सर्वात जास्त आरक्षण देणारे राज्य ठरले आहे.


Top