1. आपल्या सूर्यमालेत नववा ग्रह अस्तित्वात आहे, यासंबंधी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था - नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन (NASA) ला त्यांनी चालवलेल्या एका अभ्यासामार्फत पुरावे सापडले आहेत.
  2. बाह्य सौरमंडळाबाबत असलेल्या अंदाजानुसार, अजूनही पहिला न गेलेला मात्र अस्तित्वात असू शकणार्‍या जगासाठी अनोळखी ग्रहाला ‘ प्लॅनेट नाइन’ हे अनौपचारिक टोपणनाव दिले गेले आहे. याला ‘प्लॅनेट एक्स’ देखील म्हटले जाते.
  3. पृथ्वीपेक्षा जवळपास दहापटीने अधिक आकारमान असलेल्या या बर्फाळ ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी मारण्यासाठी दहा हजार ते  20 हजार वर्षे लागत असावे. संशोधकांनी या ग्रहाचे ‘प्लॅनेट नाइन / प्लॅनेट एक्स’ असे नामकरण केले. तो नेपच्यूनच्या तुलनेत सरासरी 20 पट अधिक दूरवरून सूर्याला प्रदक्षिणा घालतो. 
  4. सन 2016 मध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्थेचे कान्स्टेन्टीन बेटीगीन आणि माइक ब्राऊन यांनी गणिती मॉडेलिंग आणि  कॉम्प्युटर सिम्युलेशनच्या माध्यमातून या नव्या ग्रहाच्या अस्तित्वाचा अनुमान केला होता.


  1. 17 ऑक्टोबरला जगभरात ‘आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिवस’ (International Day for The Eradication of Poverty) आयोजित केला जातो. 2017 ची संकल्पना – ‘ गरीबी मिटविण्यासाठी 17 ऑक्टोबरच्या आवाजाला उत्तर देणे: शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाकडे वाटचाल’ ( Answering the Call of October 17 to end poverty: A path toward peaceful and inclusive societies)
  2. उद्देश्य – जगभरातील समुदायांमध्ये गरीबी हटविण्यासाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नांच्या बाबतीत जागरूकता वाढवणे.  महत्त्व – दारिद्र्य हा मनुष्यासाठी लाभलेला एक अभिशाप आहे. दारिद्र्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, जसे की शिक्षण न घेणे, खालच्या स्तराचे जीवनमान, उपासमार आणि सामाजिक अवहेलना आदी.
  3. वाढत्या मागणीमुळे आणि महागाईने ही समस्या अधिकाधिक वाढत चाललेली आहे. या समस्येला हाताळण्यासाठी आणि एक सामाजिक वातावरण तयार करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून या दिवसाचे आयोजन केले जाते. केंद्र शासनाने  एप्रिल 1999 पासून दारिद्र्य निर्मूलनासाठी ‘ स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना’ सुरू केली. या योजनेमधील कमतरता दूर करण्यासाठी आणि नवीन धोरण निश्चित करण्यासाठी प्रा. आर. राधाकृष्ण समितीची स्थापना केली गेली. या समितीच्या शिफारशीवरून 18 जुलै 2011 रोजी ‘ राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM)’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  4. NRLM अभियानात गरिबांच्या बचत गटांच्या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  5. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने  22 डिसेंबर 1992 रोजी दरवर्षी 17 ऑक्टोबरला ‘ आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिवस’ आयोजित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. या दिवशी दारिद्र्य निर्मूलनासाठी विविध राष्ट्रांकडून केले जाणारे प्रयत्न, विविध विकास कार्ये व योजना यांच्यासंबंधी माहिती जाहीर केली जाते.
  6. अत्यंत गरीबी, हिंसा आणि उपासमारीचे बळी पडलेल्यांच्या सन्मानार्थ  1948 साली 17 ऑक्टोबर रोजी पॅरिसमध्ये 1 लाखांहून अधिक लोक एकत्र आले होते, जेथे ‘मानवाधिकार सार्वत्रिक घोषणापत्र ( Universal Declaration of Human Rights)’ यावर स्वाक्षर्‍या करण्यात झाल्या. या दिवसाला चिन्हांकित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने या तारखेची निवड केली.


Top

Whoops, looks like something went wrong.