1. तब्बल 56 वर्षे रेंगाळलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे अखेर लोकार्पण झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी या प्रकल्पाचे लोकार्पण झाले असून काँग्रेसच्या काळात सुरु झालेला हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी भाजप सरकारनेही प्रयत्न केले होते. 
 2. सरदार सरोवर प्रकल्प हे  जगातील दुसरे सर्वात मोठे धरण ठरले आहे.
 3. 56 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी सरदार सरोवर प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. मात्र त्यानंतर विस्थापीतांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला. 
 4. प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांचे हक्क व मागण्यांसाठी मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेले ' नर्मदा बचाव आंदोलन' देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. या आंदोलनाची व्याप्ती भारतापुरती मर्यादित राहिली नव्हती. 
 5. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या आंदोलनाची दखल घेतली गेली. शेवटी  जागतिक बँकेने सरदार सरोवर प्रकल्पाचा निधी परत घेतला होता. आता हा प्रकल्प पूर्ण झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रकल्पाचे लोकापर्ण झाले. 
 6. तसेच  गुज रात,  महाराष्ट्र,  राजस्थान आणि  मध्य प्रदेश या राज्यांना सरदार सरोवर प्रकल्पातून फायदा होणार आहे.


 1. ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. 
 2. सिंधूने अंतिम सामन्यात  जपान च्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करत जागतिक स्पर्धेतील पराभवाचा बदला घेतला.
 3. कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदासाठी या दोघींमध्ये लढत झाला. सिंधूने ओकुहाराचा  22-20,  11-21,  21-18 असा तीन गेममध्ये पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
 4. तसेच सोलमधील उपांत्य लढतीत सिंधूने जागतिक क्रमवारीत सातव्या असलेल्या हे बिंगजिओ हिचे आव्हान  21-10,  17-21,  21-16असे परतावून लावत अंतिम फेरी गाठली होती.


 1. अहवालानुसार, जागतिक मनुष्यबळापैकी फक्त, सरासरी,  62% लोक आता जागतिक स्तरावर विकसित केले गेले आहेत.
 2. निर्देशांकामध्ये शीर्ष 5 देशांमध्ये नॉर्वे (1),  फिनलंड (2),  स्वित्झर्लंड (3),  अमेरिका (4) आणि  डेन्मार्क (5) यांचा समावेश आहे. तर शेवटच्या म्हणजेच  130 व्या क्रमांकावर येमेन हा देश आहे.
 3. निर्देशांकात शीर्ष  20 देशांमध्ये पूर्व आशिया आणि प्रशांत महासागर प्रदेशातील चार देश, पूर्व युरोप आणि मध्य आशिया प्रदेशातील तीन देश आणि मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका प्रदेशातील एक देश अश्याप्रमाणे समावेश आहे.
 4. बारा देशांनी आपल्या मनुष्यबळापैकी  70% हून अधिकचा विकास करण्यात यश मिळवले आहे.
 5. दक्षिण आशियात,  श्रीलंका (70) नंतर  नेपाळ (98),   भारत (103),  बांग्लादेश (111) आणि  पाकिस्तान (125) यांचा क्रमांक लागत आहे. एकमेव श्रीलंकेने त्यांच्या मनुष्यबळापैकी 60% हून अधिकचा विकास केला आहे.
 6. प्रादेशिक पातळीवर मनुष्यबळ विकासामधील तफावत उत्तर अमेरिकेत कमी आहे. उत्तर अमेरिकेनंतर पश्चिमी युरोप, पूर्व युरोप आणि मध्य आशिया, पूर्व आशिया आणि पॅसिफिक, लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका यांचा क्रमांक लागतो. दक्षिण आशिया आणि उप-सहारा आफ्रिकेमध्ये ही तफावत सर्वाधिक आहे.
 7. भारताचा  103 वा क्रमांक लागतो आहे, जो की  BRICS अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक कमी आहे. इतर  BRICS राष्ट्रांमध्ये रशिया, चीन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका हे अनुक्रमे  16, 34, 77 आणि  87 या क्रमांकावर आहे.


Top