isro has launched two others satellite

 1. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) रविवारी पीएसएलव्ही सी ४२ च्या सहाय्याने दोन ब्रिटीश उपग्रहांना घेऊन झेपावले.
 2. श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून रात्री १० वाजून ८ मिनिटांनी अंतराळात झेपावले. हे पूर्णत: व्यावसायिक प्रक्षेपण असल्याचे इस्त्रोचे प्रमुख के. शिवन यांनी सांगितले. या उपग्रह प्रक्षेपणासोबत एकही भारतीय उपग्रह नव्हता.
 3. या उपग्रहांचे एकत्रित वजन ८८९ कि.ग्रॅम आहे. या उपग्रहामुळे पृथ्वीवर होणारे पर्यावरणीय बदल, नैसर्गिक आपत्तीबाबतही माहिती घेणे शक्य होणार आहे.
 4. वनांचे मॅपिंग, पूर आणि नैसर्गिक आपत्तींवर लक्ष ठेवणे तसेच इतरही काही कामांसाठी यांचा उपयोग होईल.
 5. हे उपग्रह पृथ्वीपासून ५८३ किमी उंचीवर सोडण्यात येणार आहेत. ‘सरे सॅटेलाईट टेक्नॉलॉजीज’ लिमिटेडने हे उपग्रह विकसित केले आहेत.


newsman : tracking india in the era

 1. राजदीप सरदेसाई लिखित “न्यूजमन: ट्रॅकिंग इंडिया इन द मोदी एरा” या पुस्तकाचे अलीकडेच अनावरण करण्यात आले आहे.
 2. रुपा प्रकाशन भारत हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.
 3. मे 2014 मध्ये पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यापासून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतीय राजकारणात घडलेल्या सर्वात रोमांचक आणि विवादास्पद कालखंडाचा यात वृत्तांत आहे.


jaypur festival celebrating at houston

 1. ठिकाण:- एशिया सोसायटी ऑफ टेक्सास, ह्युस्टन (अमेरिका)
 2.  सुरुवात:- 14 सप्टेंबर 2018
 3.  या कार्यक्रमात कॉंग्रेस नेता-लेखक शशी थरूर आणि नामिता गोखले लिखित "व्हाय आय एम ए हिंदू" या पुस्तकावर चर्चा केली गेली.
 4.  जयपूर साहित्य महोत्सव हा 2006 सालापासून आयोजित केला जाणारा एक वार्षिक साहित्यिक महोत्सव आहे.
 5. जयपूरमध्ये दरवर्षी आयोजित केला जातो.
 6. 2018 साली प्रथमच दुसऱ्य देशात हा कार्यक्रम आयोजित केला गेला


saleforce founder has purchased time magazine with $190 crore

 1. अमेरिकेच्या सेल्सफोर्स.कॉम इन्क.चे संस्थापक मार्क बेनीऑफ आणि त्यांची पत्नी लीन यांनी मेरेडिथ कॉरपोरेशन यांच्या ‘टाइम’ नियतकालिकाला $190 दशलक्षने खरेदी केले आहे.
 2. 2013 साली जेफ बेझोस या अब्जाधीशाने $ 250 दशलक्ष एवढ्या रकमेसह ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला खरेदी केले होते, म्हणजेच तंत्रज्ञान क्षेत्रातल्या एखाद्याने प्रतिष्ठित छापील प्रकाशनाची खरेदी केल्यानंतरची ही दुसरी घटना आहे.
 3. या व्यवसायाने मागणी असलेल्या पद्धतीसाठी सॉफ्टवेयरमध्ये बदल करण्यास मदत होणार.


Top