India's 'Currency Watch List' includes India

 1. अमेरिकेच्या प्रशासनाने आपल्या ‘करंसी वॉच लिस्ट’मध्ये भारताचा समावेश केला आहे.
 2. भारतासोबतच चीन, जर्मनी, जपान, कोरिया आणि स्वित्झर्लंड या देशांचाही समावेश करण्यात आला.
 3. यादीत त्या प्रमुख व्यापारी भागीदार देशांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांच्या चलनविषयक धोरणांवर लक्ष ठेवल्या जाने आवश्यक आहे.
‘करंसी वॉच लिस्ट’
 1. व्यापार विषयक तत्त्व आणि सुधारणांना मोठ्या प्रमाणात व्यापार असंतुलन उत्पन्न करणार्‍या संशयास्पद आणि अयोग्य चलन विषयक पद्धतींवर लक्ष ठेवण्यासाठी ही यादी तयार केली जाते. तसेच या यादीत त्या देशांना ठेवले जाते, जे कामगिरीत सुधारात्मक मानदंडांना स्थायी राखण्यात सहाय्यक ठरतात.
 2. अमेरि‍केला ज्या देशांच्या परदेशी विनिमय धोरणांवर संशय असतो, अश्या देशांना या यादीत समाविष्ट केले जाते.
 3. असे देश जे व्‍यापारात लाभ मिळविण्याकरिता आपल्या चलन दराला मुद्दाम प्रभावि‍त करतात, अश्यांना या यादीत ठेवले जाते. अश्या कृतींचे एक उदाहरण म्हणजे, विनिमय दरांना कमी ठेवणे, जेणेकरून स्वस्त निर्यातीला प्रोत्साहन मिळू शकणार.
 4. समाविष्ट करण्यामागील कारण:-
 5. भारतात $23 अब्जचा व्यापार अतिरिक्त आहे, ज्यामध्ये 2017 सालच्या पहिल्या तीन तिमाहींमध्ये परदेशी चलनाच्या खरेदीत वाढ झाली आहे, जेव्हा की डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वाढलेले आहे. म्हणजेच भारतासह अमेरि‍केची व्यापार तूट $23 अब्ज एवढी आहे.
 6. अहवालातील ठळक बाबी:-
  1. अहवालानुसार, कोणताही व्‍यापार भागीदार आपल्या चलन दरात मुद्दाम कर घोटाळा करताना आढळून आलेला नाही.
  2. अमेरिकेची एकूण तूट $337 अब्ज एवढी आहे, तर चीनची एकूण वैश्विक व्यापार तूट $566 अब्ज एवढी आहे.
  3. यादीत समाविष्ट पाच देश 3 पैकी दोन मानदंडांमध्ये बरोबर असल्याचे आढळून आले आहे. चीनसोबत अमेरि‍केची व्‍यापार तूट सर्वाधिक जवळजवळ $337 अब्ज एवढी आहे.


 'New York Times' and 'The New Yorker': Pulitzer Prize Winners

 1. ‘न्यू यॉर्क टाइम्स’ आणि ‘द न्यू यॉर्कर’ हे सार्वजनिक सेवेसाठी 2018 सालच्या पुलित्झर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
 2. ऑक्टोबर 2017 मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानंतर 100 पेक्षा जास्त स्त्रियांनी सार्वजनिकरित्या लैंगिक अत्याचारापासून ते बलात्कारापर्यंत होणार्‍या दुर्व्यवहाराबाबत अनेक निर्मात्यांवर आरोप लावले गेले.
 3. त्यानंतर लैंगिक शोषणाच्या विरोधात ‘#मी टू’ आंदोलन चालवले गेले आणि पाहता-पाहता हे आंदोलन जागतिक झाले. आरोपींमध्ये बर्‍याच शक्तिशाली व्यक्तींचा समावेश आहे.
 4. पत्रकारिता क्षेत्रात वृत्तपत्रीय लिखाण, वाङ्मय रचनेसाठी सन 1917 पासून पुलित्झर पुरस्कार दिला जात आहे.
 5. या पुरस्काराची स्थापना अमेरिकेचे प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांनी केली होती.
 6. दरवर्षी 21 प्रकारच्या साहित्य श्रेणीत हा पुरस्कार दिला जातो.
अन्य श्रेणीतले पुरस्कार
 1. तपास कार्यासह पत्रकारिता श्रेणी - द वॉशिंग्टन पोस्ट
 2. आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता श्रेणी - न्यू यॉर्क टाइम्स आणि द वॉशिंग्टन पोस्ट (संयुक्त)
 3. आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता श्रेणी – रूटर्स


 Expect to be "normal" monsoon for the third consecutive year in India: IMD

 1. भारत सरकारच्या भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) याने भारतात सलग तिसर्‍या वर्षी म्हणजेच चालू वर्षात "सामान्य" मान्सून असण्याचा अंदाज वर्तवला आहे.
 2. या वर्षी मे महिन्याच्या शेवटी-शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात दक्षिणी-पश्चिमी मान्सूनचे देशाच्या केरळ किनारपट्टीवर आगमन होण्याची शक्यता आहे.
 3. प्राथमिक अंदाजानुसार सामान्य पाऊस पडण्याची 97% शक्यता आहे.
 4. विभिन्न श्रेणीत जून-सप्टेंबर या कालावधीत पावसाचा स्तर सामान्य (सरासरी पावसाची पातळी 96-104%) राहण्याची शक्यता 42% आणि सामान्यहून अधिक (104-110%) राहण्याची शक्यता 12% असण्याचा अंदाज आहे.
 5. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) भारत सरकारच्या भूशास्त्र मंत्रालयाची एक संस्था आहे.
 6. याची स्थापना सन 1875 मध्ये हेन्री फ्रान्सिस ब्लॅनफोर्ड यांनी केली.
 7. IMD चे मुख्यालय नवी दिल्लीत आहेत.


 Bangalore: India's highest paid city

 1. बेंगळुरू सर्वाधिक वेतन मिळणारे भारतातले शहर ठरले आहे.
 2. या शहरात व्यावसायिकांना सर्वाधिक वेतन दिले जाते.
 3. याबाबतीत औषध निर्माण आणि आरोग्य सेवा क्षेत्र उद्योग अव्वल आहेत.
 4. ‘रँडस्टॅड इंडिया’च्या रँडस्टेड इन्साइट्स विभागाच्या सर्वेक्षणानुसार, बेंगळुरूमध्ये प्रत्येक स्तरावर कर्मचार्‍यांना वार्षिक सरासरी CTC (कॉस्ट टू कंपनी) 10.8 लक्ष रुपये आहे.
 5. त्यानंतर पुणे (रु. 10.3 लक्ष), NCR (रु. 9.9 लक्ष), मुंबई (रु. 9.2 लक्ष), हैदराबाद (रु. 7.9 लक्ष) यांचा क्रम लागतो आहे.
 6. या शहरांमध्ये औषध निर्माण आणि आरोग्य सेवा क्षेत्र (रु. 10.3 लक्ष), व्यावसायिक सेवा (रु. 9.4 लक्ष), FMCG (रु. 9.2 लक्ष), माहिती तंत्रज्ञान (रु. 9.1 लक्ष), इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट व बांधकाम (रु. 9.0 लक्ष) या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक वेतन दिले जाते.


 Prime Minister Gram Sakak Yojna will be completed before the targeted period: Government of India

 1. ग्रामीण संपर्क वाढविण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातले उद्दिष्ट लक्ष्यित कालावधीपूर्वीच साध्य केले जाणार आहे.
 2. पूर्वी निश्चित केलेल्या 2022 सालच्या कालमर्यादेच्या जागी आता लक्ष्य सन 2019 मध्ये पूर्ण करण्याचे केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून ठरविण्यात आले आहे.
 3. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सन 2000 मध्ये सुरु करण्यात आली असून 1,78,184 वसाहतींपैकी 1,52,124 वसाहतींसाठी रस्ते जोडणी पूर्ण झालेली आहे.
 4. 1,66,012 वसाहतींना जोडणीसाठी मंजुरी देण्यात आली आहे.
 5. योजनेंतर्गत होणार्‍या कामांना गती आली आहे.
 6. 2017-18 साली सरासरी प्रति दिन 134 किलोमीटर रस्त्यांची निर्मिती एवढी क्षमता होती, जी 2011-2014 या कालावधीत प्रति दिन 73 किलोमीटर एवढी होती.


 US, France, and Britain's air strike on Syria

 1. सीरियातील डुमा शहरात करण्यात आलेल्या रासायनिक हल्ल्यासाठी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हेच जबाबदार आहेत, असा ठपका ठेवत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर हवाई हल्ला करण्याचे आदेश दिले. त्याला फ्रान्स आणि ब्रिटननेही पाठिंबा दिला.
 2. अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स यांनी सीरियावर केलेल्या तुफान हल्ल्याने संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 3. रशियाने या परिस्थितीत उघड उघड सीरियाची कड घेतल्याने पुन्हा एकदा शीतयुद्धाचे अस्थिर पर्व सुरू होणार का, अशी शंका भेडसावू लागली आहे.
 4. सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्या विरोधात लढणाऱ्या बंडखोरांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या डुमा येथे ७ एप्रिल रोजी रासायनिक हल्ला करण्यात आला. त्यात लहान मुलांसह एकूण ७४ जणांनी जीव गमावला.
 5. क्रौर्य व अमानुषता यावर अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स यांनी हा हल्लाबोल केला आहे.
 6. रासायनिक अस्त्रांची निर्मिती, फैलाव व वापर यांना अटकाव करण्यासाठी हे कठोर पाऊल टाकल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
 7. या हल्ल्यात तिन्ही देशांना बी-१ बॉम्बर्स, टोरनॅडो जेट्ससारख्या काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला गेला.
 8. अमेरिकेकडून आरलीग ब्रूक क्लास आणि टिकोनडर्गो क्लास क्रूझर्ससोबतच अनेक टॉमहॉक क्रूझ मिसाइलचा वापर करण्यात आला.
 9. सीरियाची राजधानी दमास्कस, तसेच होम्स या शहरानजीकची दोन ठिकाणे या हल्ल्याचे मुख्य लक्ष्यहोती.
 10. सीरियातील यादवी, अनन्वित हिंसाचार, रशियाचा त्या देशातील हस्तक्षेप, अध्यक्ष असद यांच्याविषयी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना असलेले ममत्व, असद यांना अमेरिकेचा असलेला विरोध अशा अनेक बाबींमुळे सीरियातील स्थिती अतिशय गुंतागुंतीची झाली आहे.


Top