दक्षिण आफ्रिकेत NDB चे पहिले प्रादेशिक केंद्र स्थापन

17 ऑगस्ट 2017 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे नवीन विकास बँक (New Development Bank -NDB) चे पहिले प्रादेशिक केंद्र उघडण्यात आले आहे.

नवीन विकास बँक विषयी:-

 1. नवीन विकास बँक (पूर्वीची BRICS विकास बँक) ही BRICS राष्ट्रांद्वारे (ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) स्थापन करण्यात आलेली बहुपक्षीय बँक आहे.
 2. याची स्थापना 15 जुलै 2014 रोजी करण्यात आली.
 3. या बँकेचे पहिले आणि सध्या कार्यरत प्रेसिडेंट भारताचे के. व्ही. कामत हे आहेत.
 4. बँकेचे मुख्यालय शांघाय, चीन येथे आहे.
 5. हे उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी पुरविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आले आहे.


पर्यावरण मंत्रालयाच्या ‘हरित दिवाली, स्वस्थ दिवाली’ मोहीमेला सुरुवात

 1. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते 17 ऑगस्ट 2017 रोजी ‘हरित दिवाली, स्वस्थ दिवाली’ मोहिमेला सुरुवात करण्यात आले आहे.
 2. मुख्यत: दिल्‍ली आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेशांमधील शालेय मुला-मुलींना हानिकारक फटाके फोडण्यास कमतरता आणून प्रदूषण कमी करण्यासंबंधी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
 3. मोहिमेदरम्यान पर्यावरण मंत्रालय विविध हितकारक आणि नागरिकांमध्ये फटाक्यांमुळे होणार्‍या वायू आणि ध्वनि प्रदूषणासंबंधी जागरूकता निर्माण करणे.
 4. वायू प्रदूषणाचा सामना करणे आणि प्रोत्‍साहित करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार.


आधुनिक सफरचंद मुळताः कझाकस्तानमधील फळ आहे: एक अभ्यास

 1. अमेरिकेतील बॉयस थॉम्पसन इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, आधुनिक ताजे आणि गारेगार असे सफरचंद हे मुळताः  कझाकस्तानच्या डोंगराळ प्रदेशामध्ये आढळून येणारे फळ आहे.
 2. आज आपल्याकडे सफरचंदाच्या 7,500 जाती उपलब्ध आहेत आणि आधुनिक सफरचंद हा जगातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक आहे.
 3. संशोधकांच्या मते, सिल्क रोड मार्गावर पूर्व आणि पश्चिमेला प्रवास करीत असताना पर्यटक वन्य झाडांपासून मिळालेल्या फळांपासून प्राप्त बिया आपल्याबरोबर घेऊन आलेत. याचा परिणाम म्हणजे आज आपल्याकडे सफरचंदाच्या 7,500 जाती आहेत.

अभ्यासाचे मुख्य परिणाम:-

 1. कझाकस्तानमधील पहिला सफरचंद पूर्वेकडे पोहचला, जे त्या मार्गाने स्थानिक जंगली सफरचंदासोबत संकरीत केल्या गेले, जे आज चीनमध्ये लागवड केले जाणारे सफरचंद आहे.
 2. संशोधकांना असेही आढळले की, पश्चिमेकडे पोहचलेले सफरचंद स्थानिक सफरचंदासोबत संकरीत केल्यानंतर, आज तो अतिशय आंबट असा युरोपियन क्रॅबअॅपल (मालुस सिल्व्हस्ट्रिस) म्हणून ओळखला जात आहे.
 3. मालुस सिल्व्हॅस्ट्रिस सफरचंदाने सफरचंदाच्या जातींमध्ये सर्वाधिक योगदान दिले आहे, ज्यामुळे आजचे आधुनिक सफरचंद हे आपल्या कझाकस्तानमधील पूर्वज मालुस सिएव्हरसी समान नसून ते क्रॅबअॅपल समान आहे.
 4. आधुनिक, स्थानिक सफरचंदाच्या सुमारे 46% जनुकीय जाती या कझाकस्तानमधील मालुस सिएव्हरसी सोबत संबंध ठेवतात, तर 21% जाती युरोपियन क्रॅबअॅपलसोबत आणि 33% जाती अनिश्चित स्रोतांशी संबंध ठेवतात.

संशोधकांनी हे निष्कर्ष बांधले कसे?

 1. संशोधकांनी सर्वप्रथम सफरचंदाच्या 117 जाती अनुक्रमित केल्या आणि त्यांच्या जनुकीय संरचनेची तुलना केली, ज्यामध्ये मालुस डोमेस्टिका आणि उत्तर अमेरिका, युरोप आणि पूर्व व मध्य आशियातील 23 वन्य जातींचा समावेश होता.
 2. नंतर, ते सध्याच्या स्थानिक सफरचंदाच्या आधीच्या पूर्वजांचा शोध घेते घेत मध्य आशियातून शेवटी तियान शान पर्वतांच्या पश्चिमेकडील कझाकस्तान भागात पोहचले. परिणामी, संशोधक सफरचंदाच्या कुटुंबाला ओळखू शकलेत आणि फळांच्या उत्क्रांतीचा इतिहास शोधण्यास सक्षम झाले.
 3. हा शोध अभ्यास नेचर कम्युनिकेशन्स जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.


अमेरिका, जपान हे भारत, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर संरक्षण सहकार्य

 1. अमेरिका, जपान हे भारत, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर संरक्षण सहकार्य वाढविणार आहे.
 2. उत्तर कोरियाच्या धोकादायक प्रक्षोभक वर्तनाला दृष्टीकोनात ठेवता, अमेरिका आणि जपान यांचे भारत, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांशी सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात आपले बहुपक्षीय सहकार्य वाढविण्यास एकमत झाले आहे.
 3. उत्तर कोरियाने अलीकडेच बेकायदेशीर आण्विक आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या बहू-प्रक्षेपण चाचण्या घेतल्या आहेत.
 4. अनेक प्रकारच्या प्रयत्नांनीसुद्धा त्यांनी चाचण्या सुरूच ठेवल्या आहेत.
 5. अश्या प्रकारामुळे प्रादेशिक सुरक्षेबाबत आव्हान तयार झाले आहे.  


वादग्रस्त ‘ब्लू व्हेल’ गेमवर बंदी

 1. वादग्रस्त मोबाईल गेम ‘ब्लू व्हेल’च्या सर्व लिंक हटवण्याचे निर्देश केंद्र सरकारने फेसबुक, गूगल, व्हॉट्स अॅप आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सला दिले आहेत.
 2. भारतात ब्लू व्हेल गेममुळे लहान मुलांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने असे निर्देश दिले आहेत.
 3. मुंबईत ब्लू व्हेल चॅलेंज या गेममुळे मनप्रीत सहानी या अल्पवयीन मुलाने ३० जुलैला सात मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती.
 4. मनप्रीत हा ब्लू व्हेलचा भारतातील पहिला बळी होता. यानंतर इतर राज्यातही याप्रकारच्या घटना घडल्याचे समोर आले.
 5. या घटनांच्या पार्श्वभूमीवर या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गेमवर बंदी घालण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.
 6. राज्यातील विधानसभेपासून ते दिल्लीत संसदेपर्यंत या गेमवर बंदीची मागणी करण्यात आली होती.
 7. त्यामुळे माहिती व प्रसारण मंत्रालयाने गूगल, फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, याहू, मायक्रोसॉफ्ट अशा सर्व कंपन्यांना एक पत्रक पाठवले.
 8. त्यानुसार या गेमशी संबंधीत सर्व लिंक तात्काळ हटवाव्यात असे निर्देश या सोशल नेटवर्किंग साईट्सला केंद्र सरकारने दिले आहेत.
 9. ब्लू व्हेल गेम ५० दिवसांच्या आव्हानांचा असून तो रशियात तयार झाला असून या गेममुळे रशियात १३० जणांनी प्राण गमावले.
 10. २०१३साली रशियात फिलिप ब्यूडेइकिन याने या गेमची निर्मिती केली असून त्याला गेल्या नोव्हेंबरमध्ये अटकही करण्यात आली होती.
 11. या गेमचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटर ऑनलाइन मंच वापरून लोकांना वेगवेगळी आव्हाने करायला देतात. ज्यामध्ये सर्वात शेवटी खेळणाऱ्याला आत्महत्या करण्याचे आव्हान दिले जाते.


Top