West Bengal: The first state to come out of the Life Insurance Scheme

 1. पश्चिम बंगाल हा पहिला राज्य ठरला आहे, जो राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजनेतून बाहेर पडला.
 2. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, प्रस्तावित 'आयुषमान भारत’ कार्यक्रमात योगदान देण्यासाठी पश्चिम बंगाल आपल्या संसाधनांचा अपव्यय करणार नाही. जेव्हा राज्याचा आधीच स्वतःचा कार्यक्रम आहे, तेथे आणखी एका उपक्रमाची आवश्यकता नाही.
  1. आयुष्मान भारत:-
  2. भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत देशामधील 10 कोटी गरीब कुटुंबांना (अंदाजे 50 कोटी लाभार्थी) 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार घेण्यासाठी सुविधा प्रदान करण्याची योजना आहे.
  3. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेविषयी घोषणा सर्वसाधारण अर्थसंकल्प 2018-19 मध्ये केली होती. या योजनेचा आराखडा NITI आयोगाने तयार केला आहे. योजनेच्या काही मुख्य बाबी पुढीलप्रमाणे आहे -
  4. 'आयुष्मान भारत' या राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजनेतून दुसर्‍या आणि तिसर्‍या श्रेणीतील वैद्यकीय उपचार घेण्यासाठी वर्षाला प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपये याप्रमाणे 10 कोटी गरीब व वंचित कुटुंबांसाठी अनुदान देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
  5. केंद्राच्या आरोग्य योजनेसाठी लागणार्‍या निधीपैकी 40% राज्यांमधून येणार आहे.
  6. केंद्र सरकार या आरोग्य योजनेसाठी दरवर्षी 5,500 ते 6,000 कोटी रुपये खर्च करणार आहे.
  7. सर्वसाधारण अर्थसंकल्पात 'आयुष्मान भारत' अंतर्गत 1.5 कोटी आरोग्य केंद्रे उघडण्याची देखील घोषणा करण्यात आली होती, जेणेकरून सामान्य जनतेच्या आसपासच वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावेत. या केंद्रांवर सामान्य आजारांसाठी मोफत औषधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
  8. या केंद्रांवर देशी वैद्यकीय पद्धतींवर भर दिला जाणार आहे. या केंद्रांवर योग संबंधी प्रशिक्षणासोबतच युनानी, आयुर्वेद आणि सिद्ध पद्धती संबंधी उपचार उपलब्ध असतील.


ISRO's Chandrayaan-2 flight in April 2018

 1. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कडून एप्रिल 2018 मध्ये ‘चंद्रयान-2’ मिशन सुरू करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.
 2. यावेळी भारत प्रथमच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एक ‘रोव्हर’ उतरविण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवाय ISRO चे पहिले आंतर-ग्रहीय मिशन आहे, जो एखाद्या खगोलीय घटकावर एक रोव्हर उतरविणार आहे.  
 3. चंद्रयान-2 बाबत:-
  1. ‘GSLV-F10 / चंद्रयान-2’ ही पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह ‘चंद्र’ यावरील भारताचे दुसरे मिशन पुर्णपणे स्वदेशी मोहीम आहे, ज्यामध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर यांचा समावेश आहे.
  2. 100 किलोमीटर चंद्र कक्षेत पोहचल्यानंतर, रोव्हरला वाहून नेणारे लँडर चंद्रभोवती फिरणार्‍या ऑर्बिटरपासून वेगळा होणार. लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवल्यानंतर रोव्हरला तेथे तैनात केले जाणार आहे.
  3. मिशन रोव्हरचे वहन करणार, जो पृथ्वीवरील आदेशानुसार उतरलेल्या ठिकाणच्या आसपास निम-स्वायत्त पद्धतीत फिरणार आहे.
  4. रोव्हरवर बसविण्यात आलेले उपकरण चंद्राच्या पृष्ठभागाचे अवलोकन करणार आणि त्यासंबंधी माहिती पृथ्वीवर पाठवविणार. ही माहिती चंद्रावरील मातीच्या विश्लेषनासाठी उपयोगात येणार आहे.
  5. ‘चंद्रयान-2’ चे वजन सुमारे 3290 किलोग्राम असणार आणि हे चंद्राच्या कक्षेत परिभ्रमण करणार आणि चंद्राच्या सुदूर संवेदनाच्या उद्देश्यांना पूर्ण करणार आहे.
  6. त्यावरील उपकरणे चंद्राची रचना, खनिजशास्त्र, तात्विक मूलभूत विपुलता, चंद्राचा बहिर्मंडल तसेच हायड्रॉक्झिल व पाणी-बर्फ यांची उपस्थिती याबाबत वैज्ञानिक माहिती एकत्रित करणार आहे.
 4. चंद्रयान-1 बाबत:-
  1. चंद्रयान-1 हे ISRO च्या चंद्रयान या चंद्रावरील मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळयान आहे. चंद्रयान-1 चे PSLV-C11 या प्रक्षेपकाद्वारे 22 ऑक्टोबर 2008 रोजी प्रक्षेपण केले गेले होते. 8 नोव्हेंबर रोजी यानास यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत ठेवले गेले आणि चंद्रावर पोहचणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला.
  2. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे.
  3. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले.
  4. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केला.
  5. 1980 साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पाहिल्यादा प्रक्षेपित करण्यात आला. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रायान-1’ मोहीम यशस्वी झाली.
  6. त्यानंतर ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.


The candidate will have to reveal the way for the election to contest the elections: Supreme Court

 1. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, आता निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांबरोबरच त्यांच्या पत्नी/पती आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना मालमत्तेबरोबरच मिळकतीचे मार्ग जाहीर करावे लागणार आहेत.
 2. लोक प्रहारी या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेच्या सुधारणेसंदर्भात हा महत्त्वपूर्ण आदेश दिला.
 3. अन्य निर्णय:-
  1. निवडून आलेले लोकप्रतिनिधी, त्यांच्या पत्नी/पती आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या मालमत्तेची माहिती ठराविक काळाने गोळा करण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्याचा आदेशही न्यायालयाने केंद्र सरकारला दिला.
  2. मालमत्तेत प्रमाणाबाहेर वाढ झाली आहे का याचा तपास घेतला जावा.
  3. अशी वाढ झाली असल्यास त्याची माहिती संबंधित आमदार किंवा खासदाराच्या पात्रतेवर विचार करण्यासाठी विधानसभा किंवा संसदेपुढे मांडली जावी.
  4. मालमत्ता आणि उत्पन्नाचे स्त्रोत जाहीर न करण्याची कृती लोकप्रतिनिधित्व कायद्यांर्गत भ्रष्ट ठरवली जाईल.


Announced 'National Emergency Status' in Ethiopia

 1. इथिओपियाचे पंतप्रधान हायलेमरीयम देसालेग यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर इथिओपिया सरकारने देशात अनिर्णीत कालावधीसाठी ‘राष्ट्रीय आणीबाणी स्थिती’ची घोषणा केली आहे.
 2. हायलेमरीयम देसालेग पंतप्रधान पदावर 2012 सालापासून होते.
 3. त्यांनी पंतप्रधान  पदाचा आणि इथिओपियन पीपल्स रिव्होल्युशनरी डेमोक्रेटिक फ्रंट (EPRDF) युतीच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला.
 4. ऑगस्ट 2017 मध्ये इथिओपियाच्या नागरिकांनी सरकारविरोधी केलेल्या आंदोलनात शेकडो लोक मारले गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय स्वातंत्र्यांची मागणी केल्याच्या घटनेनंतर 10 महिन्यांची आणीबाणी तात्काळ जाहीर केली गेली.
 5. देशातील राजकीय अस्थिरतेमुळे देसालेग यांनी पंतप्रधान पद सोडले.
 6. इथिओपिया हा ईशान्य आफ्रिकेमधील एक स्वतंत्र देश आहे.
 7. अदीस अबाबा हे देशाचे राजधानी शहर आहे. इथिओपियन बीर हे चलन आहे.


Top