JAGTIK MALLKHAMB SPARDHA

  1. पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत महिला गटाचे सांघिक विजेतेपद अपेक्षेप्रमाणे भारताने पटकावले. व्दितीय स्थानी सिंगापूरला आणि तृतीय स्थानी मलेशियाला समाधान मानावे लागले. भारताच्या दीपक शिंदे आणि हिमानी परब यांना सर्वोत्तम मल्लखांबपटू म्हणून गौरवण्यात आले. 

  2. शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या या स्पर्धेत भारताच्या महिला मल्लखांबपटूंनी त्यांच्या कौशल्याचे दर्शन घडवताना 244.73 गुणांसह सांघिक जेतेपदावर नाव कोरले.

  3. पुरुषांमध्ये पुरेसे संघच नसल्याचे कारण देत सांघिक विजेतेपद रद्द करण्यात आले. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी प्रत्येक खेळाडूला दोरी आणि पुरलेला मल्लखांब अशा दोन साधनांवर दोन लहान आणि दोन मोठे असे चार संच करणे अनिवार्य होते. महिला आणि पुरुष वयोगटातून निवडल्या गेलेल्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये चुरस रंगली.


DIN VISHESH

  1. पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 रोजी झाला.

  2. स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 मध्ये झाला होता.

  3. क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1883 मध्ये झाला.

  4. 1979 या वर्षी सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडलेसहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.

  5. सन 1998 मध्ये ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.


Top