Delhi is the richest state, Bihar is the poorest state: NFHS-4 wealth index

 1. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (NFHS-4) च्या निष्कर्षानुसार, संपूर्ण भारतात दिल्ली आणि पंजाबमधील लोक सर्वात श्रीमंत आहेत आणि शीर्ष संपत्तीसंदर्भाच्या पाच गटात या प्रदेशांत 60% हून अधिक श्रीमंत कुटुंब वास्तव्य करतात.
 2. दूरदर्शन आणि दुचाकी यांसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंची मालकी आणि स्वच्छ पेयजलासारख्या मूलभूत सुविधांची उपलब्धता यांसारख्या कौटुंबिक घटकावर आधारित गुणांमधून संपत्ती निर्देशिक तयार केला गेला आहे.
 3. त्यानंतर प्राप्त आकडे सर्व कुटुंबांची संपत्तीसंदर्भात पाच गटात वर्गीकृत करण्यात आले. खालच्या गटात 20% सर्वात गरीब आहेत, तर अग्रगण्य गटात 20% सर्वात श्रीमंत आहेत.
 4. या उपक्रमात वर्ष 2015-2016 मध्ये सहा लाख भारतीय कुटुंबांचे सर्वेक्षण केले गेले. या अहवालानुसार, ग्रामीण भारतातली 29% कुटुंबे आणि शहरी भागातली केवळ 3.3% कुटुंबे खालच्या गटात आहेत. त्यामुळे दारिद्र्य हा ग्रामीण भागातील प्रमुख घटक म्हणून उघडकीस आला आहे.
 5. हे सर्वेक्षण वेगवेगळ्या गटांमधील संपत्तीमधील असमानता दर्शविण्यास मदत करते.
 6. तसेच वेगवेगळ्या राज्यांतील वेगवेगळ्या परिस्थिती असल्याकारणाने एक समान शासकीय धोरण तयार केले जाऊ शकत नाही, जे सर्व राज्यांवर लागू करता येईल, या कारणाने शासनाला धोरणे आखण्यास मदत होणार आहे.
NFHS-4 संपत्ती निर्देशांक
 1. राज्यनिहाय:-
  1. शेवटच्या गटात, बिहारमध्ये निम्म्यापेक्षा अधिक कुटुंब आहेत.
  2. दिल्ली आणि पंजाबमध्ये सुमारे 60% कुटुंब अग्रगण्य श्रीमंतांच्या शीर्ष गटात  आहेत. त्यानंतर गोव्याचा (54.5%) क्रमांक लागतो.
  3. सर्व गटांमधील एकाच कुटुंबाच्या समान संख्येसह, राजस्थानमधील संपत्ती सर्व भारतीय राज्यांमध्ये सर्वसमावेशकपणे वाटली गेली आहे.
 2. समुदाय-आधारित:-
  1. अग्रगण्य श्रीमंतांच्या गटातली 70% लोकसंख्या जैन समाजातली (सर्वात श्रीमंत) आहेत.
  2. जैन समाजातील केवळ 1.5% भाग खालच्या दोन गटात येतात. 
  3. जैननंतर शीख समुदायाच्या (59.6%) लोकांचा क्रमांक लागतो.
  4. हिंदू आणि मुस्लिम समुदायात याबाबतीत फारसा फरक नाही आणि ते संपत्तीच्या राष्ट्रीय वितरणाबाबत जवळ-जवळ आहेत.
  5. अन्य जातींच्या तुलनेत उच्चभ्रू कुटुंबांची संख्या जवळजवळ दुप्पट आहे. अनुसूचित जमातीमधील 45.9% लोक शेवटच्या गरीब गटात आहेत.


Scientists have developed new technologies to find the stars associated with the brain

 1. मेंदूमधील एकमेकांशी जुळलेल्या तारांना शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवीन तंत्र तयार केले आहे. हे तंत्र शरीरातले अवयव कसे कार्य करतात हे समजण्यास शास्त्रज्ञांना मदत करणार.
 2. ड्रोसोफिला फ्रूट्स माशीच्या अध्ययनातून, अमेरिकेमधील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील शास्त्रज्ञांनी एक अशी पद्धत विकसित केली आहे की, ज्याद्वारे जिवंत माशीमध्ये वास्तविक वेळेत संप्रेषणाची जोडणी आणि त्यामधील प्रवाह सहजपणे पाहता येऊ शकतो.
 3. TRACT (ट्रान्सन्युरोनल कंट्रोल ऑफ ट्रान्सस्क्रिप्शन) नामक सिनॅपसेस (दोन मज्जातंतु/न्यूरॉन मिळून तयार होणारे घटक) यामध्ये होणारा माहितीचा प्रवाह शोधण्यासाठी एक पद्धत विकसित केली गेली.
 4. ड्रोसोफिला फ्रूट्स माशी:-
  1. ड्रोसोफिला फ्रूट्स माशीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे माशीच्या मेंदूत प्रवाहीत होणारा रंगीत प्रकाश.
  2. या माशीच्या प्रत्येक हालचालीवर तसेच मेंदूत होणार्‍या माहितीच्या प्रवाहादरम्यान मेंदूच्या मज्जातंतूमधून एक रंगीत प्रकाश बाहेर पडतो, ज्यामुळे या प्रवाहाला शोधण्यास सहजता येते.   
  3. माशीच्या डोक्यावर प्रस्थापित केलेल्या एका पातळ खिडकीमधून बघता येण्यासाठी एक विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मदर्शक यंत्राचा वापर करून संशोधक वाढ होताना, हालचाल करताना आणि वातावरणातील बदल अनुभवतांना वास्तविक वेळेत माशीच्या मेंदूत माहिती प्रवाहीत होत असताना मज्जासंस्थेच्या आत निर्माण होणारा रंगीत प्रकाश पाहू शकतात.
  4. या शोधामुळे माशीच्या संपूर्ण मेंदूमधील अनेक जोडण्यांचा नकाशा बनवण्याच्या दिशेने पुढे एक पाऊल पडले आहे, ज्यामुळे शास्त्रज्ञांना मानवी मेंदूमधील मज्जासंस्थेचे जाळे देखील समजू शकणार आहे.
तुम्हाला हे माहीत आहे का?

पार्श्वभूमी:-

 1. मानवी मेंदूत अब्जावधी मज्जासंस्थेचे (न्यूरॉन्स) एकमेकांशी जुळलेले एक अतिशय किचकट जाळे आहे आणि ते एकमेकांमध्ये विद्युत स्पंदन आणि रासायनिक संकेताद्वारे संपर्क साधतात.
 2. शास्त्रज्ञांनी आज जरीही नानाविध बाबी, जसे की झोपेचे नियमन, स्मृतींचे संचयण आणि निर्णय घेणे, समजून घेण्यास यशस्वी ठरलेला आहे, तरी अजूनही सध्या उपलब्ध असलेल्या पद्धती वापरून मेंदूमधील जाळे संपूर्णता दृश्य स्वरुपात पाहणे शक्य नाही.
 3. हा शोध जर्नल ‘ईलाइफ’ मध्ये प्रकाशित केला गेला आहे.


Haj pilgrimage grants closed

 1. हज यात्रेसाठी दिले जाणारे अनुदान यंदापासून बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे.
 2. हा निर्णय म्हणजे तुष्टीकरणाचे राजकारण न करता अल्पसंख्यांकाना सक्षम करण्याच्या धोरणाचा एक भाग आहे असे सरकारकडून सांगण्यात आले.
 3. सरकार या निर्णयाच्या माध्यमातून हज यात्रा घडवून आणणाऱ्या कंत्राटदारांची प्रक्रियादेखील पारदर्शक बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
 4. सर्वोच्च न्यायालयाने २०२२पर्यंत टप्याटप्याने हज यात्रेचे अनुदान बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारला २०१२साली दिले होते.
 5. सरकारने अफजल अमनुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील ४ सदस्यीय समितीने तयार केलेला हज धोरणाचा मसुदा ऑक्टोंबरमध्ये सादर केला होता.
 6. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा मसुदा तयार करण्यात आला होता. या समितीनेही हज यात्रेसाठी दिले जाणारे अनुदान बंद करण्याची शिफारस केली होती.
 7. जगभरातील मुस्लिमांसाठी हज हे श्रद्धास्थान असून भारतातील हजारो मुस्लीम या यात्रेसाठी जातात. त्यामुळे या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
 8. सरकार हज यात्रेवर दरवर्षी ७०० कोटी रुपयांचे अनुदान देते. यावर्षी देशातील १.७५ लाख मुस्लीम हज यात्रेसाठी जाणार आहेत. पण त्यांना सरकारकडून कुठलेही अनुदान मिळणार नाही.
 9. हज यात्रेच्या अनुदानाची रक्कम यापुढे अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या शैक्षणिक सक्षमीकरण आणि कल्याणासाठी खर्च करण्यात येणार आहे.
 10. यंदा भारतातून सुमारे १३०० महिला मेहरमशिवाय (परिवारातला असा पुरुष ज्याच्याशी लग्न शक्य नाही) हज यात्रा करणार आहेत.
 11. सौदी अरेबियाने आपले नियम थोडे वाकवत ४५ वर्षांहून अधिक वयाच्या कमीत कमी ४ महिलांच्या समूहाला कोणा साथीदाराशिवाय हज यात्रा करण्याची परवानगी दिली आहे.
 12. तसेच सौदी अरेबियाने भारतीय यात्रेकरूंचा कोटा ५ हजारांनी वाढवला आहे. त्यामुळे आता एकूण १.७५ लाख भारतीय नागरिक हज यात्रा करू शकतात.
 13. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री : मुख्तार अब्बास नक्वी


Launch of the third 'Raisina Dialogue' Conference in Delhi

 1. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या भारत दौर्‍यादरम्यान नवी दिल्लीत तिसर्‍या 'रायसीना संवाद’ या भू-राजनैतिक परिषदेला सुरुवात करण्यात आली आहे.
 2. ‘मॅनेजींग डिसरप्टीव्ह ट्रांझिशन्स: आयडियाज, इंस्टिट्यूशन अँड इडियम’ या संकल्पनेखाली ही परिषद भरविण्यात आली आहे.
 3. तीन दिवस चालणारी ही परिषद परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन यांच्याद्वारा संयुक्त रूपात आयोजित केली गेली आहे.
 4. परिषदेत 90 देशांमधून आलेल्या 150 हून अधिक वक्ता आणि 550  प्रतिनिधींनी भाग घेतला आहे.
 5. 'रायसीना संवाद’ ही नवी दिल्लीत दरवर्षी आयोजित होणारी बहुपक्षीय परिषद आहे.
 6. 2016 सालापासून परिषदेचे आयोजन ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन (स्वायत्त वैचारिक संस्था) करते.
 7. "रायसीना" हे नाव नवी दिल्लीमधील ‘रायसीना हिल’ ठिकाणावरून ठेवले गेले आहे.
 8. जे भारत सरकार तसेच राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन यांच्यासाठीचे घर आहे.


Top