नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस - 18 जुलै

 1. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात 18 जुलै 2017 रोजी जगभरात ‘नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करण्यात येत आहे.
 2. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाचा आणि गरिबीला तोंड देण्यासाठी आणि सर्वांच्या सामाजिक न्यायासाठी समर्पणाचा सन्मान करत नेल्सन मंडेला फाउंडेशनने ‘अॅक्शन अगेन्स्ट पॉव्हर्टी’ यासाठी 2017 मंडेला दिवस समर्पित केला आहे.

संकल्पना:-

        “टेक अॅक्शन! इन्सपायर चेंज”

 

नेल्सन मंडेला नियम:-

 1. डिसेंबर 2015 मध्ये, कैद्यांच्या मानवी परिस्थितींना सुधारण्यासाठी आणि कैदी देखील समाजाचा एक भाग आहे याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि विशेष महत्त्वाची सामाजिक सेवा म्हणून तुरुंगातील कर्मचार्यांच्या कामाचे महत्व जाणून घेण्यास मदत केली जाऊ शकेल या दृष्टीने UN महासभेकडून (UNGA) नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवसाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला गेला.
 2. UNGA च्या ठरावानुसार कैद्यांना दिल्या जाणार्या वागणुकीसाठी केवळ सुधारित संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानक किमान नियमांना अंगिकारण्यात आले.
 3. शिवाय जीवनसंघर्षात तुरुंगात 27 वर्षे व्यतीत करणार्या दक्षिण आफ्रिकेच्या या दिवंगत राष्ट्राध्यक्षाच्या सन्मानार्थ याला "नेल्सन मंडेला नियम" म्हणून ओळखले जावे यासाठीही मंजुरी दिली गेली.

पार्श्वभूमी:-

 1. नोव्हेंबर 2009 मध्ये, दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या शांती आणि स्वातंत्र्य यामधील योगदानाच्या स्मृतीखातर 18 जुलै या तारखेला "नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस" म्हणून साजरा करण्याचे UNGA कडून घोषित केले गेले.
 2. 18 जुलै 1918 रोजी नेल्सन मंडेला यांचा जन्म झाला.
 3. त्यांनी सन 1994-1999 या काळात दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष पद भूषविले.
 4. ते दक्षिण आफ्रिकेचे प्रथम कृष्णवर्णी व संपूर्णता लोकशाही असलेल्या देशाचे प्रथम राष्ट्राध्यक्ष आहेत.
 5. त्यांना 1993 साली नोबेल शांती पुरस्कार मिळाला.


भारतीय शास्त्रज्ञांकडून दिर्घीकांच्या महासमूहांचा शोध

 1. सुमारे २ कोटी अब्ज सूर्याएवढे वस्तूमान असणाऱ्या ‘सरस्वती’ दिर्घीकांच्या महासमूहांचा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावला आहे.
 2. इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्सतील (आयुका) शास्त्रज्ञ जॉयदीप बागची यांच्या नेतृत्त्वाखाली देशातील शास्त्रज्ञांच्या गटाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे संशोधन जगासमोर मांडले आहे.
 3. त्यामुळे विश्वाच्या निर्मिती विषयी मांडण्यात आलेल्या खगोलीय घटनांचा नव्याने अभ्यास करावा लागणार आहे.

आयुकासह

 1. इंडियन इस्टिट्यूट ऑफ सायन्स अॅण्ड एज्युकेशन रिसर्च (आयसर),
 2. नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) जमशेदपूर व
 3. केरळमधील न्यूमन कॉलेजमधील विद्यार्थी व संशोधक प्राध्यापकांनी

‘सरस्वती’ दिर्घीकांचा शोध लावला आहे.

 1. आयुकाचे शास्त्रज्ञ जॉयदीप बागची यांनी २००२ मध्ये दिर्घीकांच्या समूहाविषयीचे संशोधन सुरू केले होते.
 2. मात्र, पुढील काही वर्षात याबाबतची अधिक माहिती समोर आली होती.
 3. त्यानंतर देशातील विविध संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने त्यांनी सलग २-३ वर्षात हे संशोधन पूर्ण केले.
 4. आकाशगंगेमध्ये एवढ्या मोठ्या दिर्घीकांचा समूह असण्याबाबतची माहिती प्रथमच समोर आली आहे.
 5. या दिर्घीकांची व्याप्ती ६० कोटी प्रकाशवर्ष एवढी असण्याची शक्यता आहे.
 6. तसेच या दिर्घीकांचा समूह मीन राशीमध्ये असल्याचे शोध प्रबंधात स्पष्ट करण्यात आले आहे.
 7. ४३ दिर्घीकांच्या या समूहाला ‘सरस्वती’असे नाव देण्यात आले आहे.


चीनचे नोबेल विजेते लेखक लियू शाबो यांचे तुरुंगवासात निधन

 1. चीनच्या नागरिकांना मुलभूत मानवी व लोकशाही हक्क मिळावेत यासाठी लढा देणारे नोबेल शांतता पुरस्कारविजेते ज्येष्ठ लेखक लियू शाबो यांचे १३ जुलै रोजी वयाच्या ६१व्या वर्षी तुरुंगवासातच निधन झाले.
 2. चीन सरकारने सन २००९मध्ये लियू यांना राष्ट्रद्रोहाबद्दल दोषी ठरवून ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती.
 3. मुलभूत मानवी हक्क मिळावेत व चीनची एकपक्षीय राजकीय व्यवस्था अधिक खुली व लोकाभिमुख करावी यासाठी ‘चार्टर ०८’ नावाची स्वाक्षरी मोहीम चालविल्याबद्दल त्यांना राष्ट्रद्रोही ठरविले गेले.
 4. सन २०१०मध्ये तुरुंगात असतानाच त्यांना शांततेचे नोबेल जाहीर झाले.
 5. मात्र ओस्लो येथे सन २०१०मध्ये झालेल्या नोबेल सोहळ्यात त्यांना सहभागी होता आले नव्हते.
 6. सुमारे महिनाभरापूर्वी लियू शाबो यांना यकृताचा कर्करोग असल्याचे जाहीर करण्यात आले व त्यांची रवानगी रुग्णालयात करण्यात आली. परंतु योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचे निधन झाले.
 7. लियू शाबो यांना सन २००९मध्ये अटक झाल्यानंतर त्यांची पत्नी लिऊ शाबो यांना काही महिन्यांतच त्यांच्या राहत्या घरात स्थानबद्ध करण्यात आले. त्या आजतागायत नजरकैदेतच आहेत.
 8. १९८९मध्ये बीजिंगस्थित तियानानमेन चौकातील ऐतिहासिक लोकशाहवादी आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता.
 9. जगभर गौरव झालेले परंतु स्वदेशातील छळामुळे तुरुंगातच अखेरचा श्वास घ्यावा लागलेले लियो हे दुसरे नोबेल शांतता पुरस्कारविजेते ठरले आहेत.
 10. याआधी जर्मनीचे शांततावादी कार्ल व्हॉन ओस्सिएत्सी यांचे जुलमी नाझी राजवटीच्या तुरुंगात सन १९३८ मध्ये निधन झाले होते.


जगात भारतीय जनतेचा सरकारवर सर्वाधिक विश्वास :फोर्ब्स मासिक

 1. जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने लोकशाही असलेल्या जगातील प्रमुख ३४ देशांमध्ये सरकारविषयी लोकांमध्ये असलेल्या विश्वासाबद्दल सर्वेक्षण केले आहे. यामध्ये भारताने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
 2. देशातील ७३ टक्के जनतेचा सरकारवर विश्वास असल्याची आकडेवारी सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
 3. जगातील इतर देशांमधील लोकांच्या तुलनेत भारतीय जनतेचा देशातील सरकारवर अधिक विश्वास असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
 4. आर्थिक सहकार्य आणि विकास संस्थेत समावेश होणाऱ्या देशांचे फोर्ब्सकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये लोकशाही असलेल्या ३४ देशांचा समावेश आहे.
 5. लोकांच्या मनात सरकारबद्दल असलेल्या विश्वासाची पडताळणी सर्वेक्षणातून करण्यात आली आहे. यामध्ये भारताने पहिला क्रमांक मिळवला आहे.
 6. भारतापाठोपाठ कॅनडाचा दुसरा क्रमांक लागतो तर तुर्कस्तान आणि रशिया संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. यानंतर जर्मनी, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंग्डम, जपान यांचा क्रमांक लागतो.
 7. अमेरिका तसेच स्पेनमधील अवघ्या ३० टक्के जनेतेने सरकारबद्दल विश्वास दाखवला आहे.
 8. अमेरिका स्पेननंतर, फ्रान्स (२८ टक्के), ब्राझील (२६ टक्के), दक्षिण कोरिया (२४ टक्के) आणि ग्रीस (१३टक्के) यांचा क्रमांक लागतो.

देशांचा क्रम:-

 1. भारत, 
 2. कॅनडा,
 3. तुर्कस्तान आणि रशिया, 
 4. जर्मनी,
 5. दक्षिण आफ्रिका,
 6. ऑस्ट्रेलिया,
 7. युनायटेड किंग्डम,
 8. जपान,
 9. अमेरिका,
 10. स्पेन,
 11. फ्रान्स,
 12. ब्राझील,
 13. दक्षिण कोरिया,
 14. ग्रीस. 


Top

Whoops, looks like something went wrong.