1. इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला असून, त्याला विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, असे नाव देण्यात आले आहे. सध्या या विभागाची सूत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडेच ठेवली आहेत.
 2. तसेच या नवीन विभागाकडे सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारितील अनेक विषय हस्तांतरित करण्यात आले असून, त्या संबंधीची अधिसूचनाही काढण्यात आली आहे. त्यानुसार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी कार्यरत यंत्रणा व महामंडळे ही नवीन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत. 
 3. या प्रवर्गांच्या कल्याणकारी योजनांसाठी समन्वय साधण्याचे कामही हा विभाग करेल. इतर मागासवर्गीयांसाठी केंद्र सरकारने मंजूर केलेली अनुदाने या विभागाला मिळतील.


mpsc exam

 1. देशाच्या अणुउर्जा क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विस्तार करताना केंद्रीय मंत्रिमंडळाने १० नव्या अणुभट्ट्यांच्या उभारणीला हिरवा कंदील दाखवला आहे. एकाचवेळी १० अणुभट्ट्यांना मंजुरी मिळण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. सध्या देशात एकूण २२ अणुभट्ट्या कार्यरत आहेत.
 2. नव्या अणुभट्ट्यांची क्षमता जुन्या अणुभट्ट्यांच्या तुलनेत जास्त असणार आहे. जुन्या २० अणुभट्ट्या २२० मेगावॉट इलेक्ट्रिक क्षमतेच्या आहेत. तर २००५ आणि २००६ मध्ये तारापूरमध्ये सुरु करण्यात आलेल्या दोन अणुभट्ट्यांची क्षमता ५४० मेगावॉट इतकी आहे. नव्या अणुभट्ट्यांची क्षमता ७०० मेगावॉट इतकी असणार आहे. दहा नव्या अणुभट्ट्यांची उभारणी राजस्थानातील माही बंसवाडात, हरियाणातील गोरखपूर, कर्नाटकातील कैगा आणि मध्य प्रदेशातील चुटकामध्ये करण्यात येणार आहे.
 3. भारताकडून उर्जा निर्मितीवर भर दिला जातो आहे. एकाचवेळी १० अणुभट्ट्यांना मंजुरी देण्यात आल्याने उर्जा निर्मितीत लक्षणीय वाढ होणार आहे. त्यामुळे देशातील वीजेचे दरदेखील कमी होणार आहेत. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत अणुभट्ट्यांची उभारणी केली जाणार आहे. या अणुभट्ट्यांच्या उभारणीसाठी ७० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
 4. ‘२०२१-२२ मध्ये अणुभट्ट्या पूर्ण क्षमतेने काम करु लागणार आहेत. त्यामुळे उर्जा निर्मितीत मोठी वाढ होणार आहे. १० नव्या अणुभट्ट्यांमुळे देशातील उर्जा उत्पादनात ६,७०० मेगावॉट्सची भर पडणार आहे. सध्या देशातील २२ अणुभट्ट्यांमधून ६,७८० मेगावॉट्स वीजेची निर्मिती केली जाते,’ असे केंद्र सरकारने म्हटले आहे.


Anil Deva

 1. केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल दवे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी अनिल दवे यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या ६ महिन्यांपासून अनिल दवे यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती. त्यांच्यावर उपचारदेखील सुरु होती. भाजपचे वरिष्ठ नेते असलेल्या दवे यांच्यावर सध्या नर्मदा नदीच्या संवर्धनाची प्रमुख जबाबदारी होती.  अनिल दवे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. 
 2. अनिल दवे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्यसभेचे खासदार असलेले अनिल दवे मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करत होते. अनिल दवे यांच्याकडे पर्यावरण, वन आणि हवामान बदल या खात्यांचा स्वतंत्र प्रभार होता.
 3. अनिल दवे यांच्या पर्यावरण मंत्रीपदाच्या कार्यकाळात देशासह राज्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागले होते. कोस्टल रोड, ट्रान्सहार्बर या अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्पांना अनिल दवे यांनी मंजुरी दिली. ‘महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना देणारा साधा आणि निगर्वी पर्यावरणवादी आपण गमावला आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


INDIA PALESTAIN SUMMIT

 1. पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास भारतभेटी दरम्यान नवी दिल्ली येथे भारत आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये पाच विविध विषयांवर करार करण्यात आले आहे.

1) राजदूत पासपोर्ट धारकांना व्हीजापासून मुक्ती,

2) कृषी,

3) माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स,

4) आरोग्य,

5) क्रीडा व युवक कल्याण या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याचे करार करण्यात आले.


DEN DEVID AWARD

 1. भारतीय शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना खगोलशास्त्र क्षेत्रातील त्याच्या योगदानासाठी “फ्युचर” गटात प्रतिष्ठित “डेन डेव्हिड” पुरस्कार जाहीर झाला आहे.
 2. ते हा पुरस्कार खगोलशास्त्रज्ञ आंद्रेज उदालीस्क व नील गेहरेल्स यांसोबत विभागून घेणार आहेत.
 3. डेन डेव्हिड पारितोषिक डेन डेव्हिड फाउंडेशनच्या वतीने 16 वर्षापासून “पास्ट”,”प्रेसेंट”,”फुच्यर” या विभागात दिले जाते.
 4. पुरस्काराची रक्कम: USD10 दक्षलक्ष


Top