1. जुलै 2017 मध्ये जागतिक बँकेने जर्मनीमध्ये झालेल्या जी-20 शिखर परिषदेत महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जागतिक बँकेच्या नेतृत्वात ‘महिला उद्यमी वित्त उपक्रम’ (Women Entrepreneurs Finance Initiative / We-Fi) या नावाने नवीन सुविधा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
 2. या सुविधेतून महिलांच्या उद्योजकतेला प्रगती पथावर आणण्यासाठी आणि महिलांना व्यवसाय सुरू करण्याकरिता आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी  $1 अब्जपेक्षा अधिक रक्कम उभी करण्याचा उद्देश आहे. महिला उद्योजकतेला पाठबळ देण्यासाठी $1 अब्ज इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येणारी ही जागतिक बँकेच्या नेतृत्वात असलेली पहिलीच सुविधा आहे.
 3.   वी-फाय’ वित्तीय व्यवस्थेमधील मध्यस्थ, निधी आणि इतर बाजारपेठेमधील कार्यरत  यांच्यासह काम करून  आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था (IFI) आणि व्यावसायिक वित्तपुरवठा यामध्ये दाता अनुदान वित्तपुरवठा कर्ज म्हणून देण्यासाठी असलेली मर्यादा सध्याच्या  $325 दशलक्षांवरून वाढवून $1 अब्जहून अधिक करण्यासाठीच्या उद्देशाने ही सुविधा आहे.
 4. महिलांना व्यवसायास भांडवल, तांत्रिक साहाय्य प्रदान करणे. महिलांना पाठिंबा देणार्‍या इतर प्रकल्पांमध्ये व कार्यक्रमांमध्ये तसेच  महिलांच्या नेतृत्वाखालील लघु व मध्यम उद्योगांमध्ये गुंतवणूक करणे, या प्रकारची कार्ये या निधीमधून चालवली जाणार.
 5. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, डेन्मार्क, जर्मनी, जपान, नेदरलॅंड, नॉर्वे, रशियन फेडरेशन, सौदी अरेबिया, कोरिया गणराज्य, संयुक्त अरब अमीराती, ब्रिटन आणि अमेरिका या राष्ट्रांच्या  सरकारांच्या भागीदारीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
 6. वर्तमान परिस्थितीत विकासशील देशांमधील महिलांच्या मालकीच्या लघु व मध्यम आकाराच्या  70% व्यवसायांना अजूनही त्यांच्या गरजेनुसार वित्त उपलब्ध होऊ शकत नाही आहे. सध्या जागतिक स्वरुपात महिलांच्या मालकीच्या व्यवसायांना होणार्‍या वित्तीय पुरवठ्यामधील तफावत विविध स्वरुपात जवळपास $300 अब्ज इतकी आहे.  महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी वित्तव्यवस्था, मालकी हक्क आणि व्यवसाय वाढविणे या बाबतीत अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. या निधीमधून महिलांना व्यवसाय करण्यास पूरक असे वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.


 1. अमेरिकेचे जॉर्ज सॉन्डर्स यांना ‘लिंकन इन द बार्डो’ या त्यांच्या पहिल्याच प्रयोगात्मक कादंबरीसाठी या वर्षीचा ‘मॅन बुकर फिक्शन पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.
 2. 18 ऑक्टोबर 2017 रोजी लंडनमध्ये ‘मॅन बुकर फिक्शन पुरस्कार, 2017’ आयोजित पुरस्कार समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लॉस एंजल्स येथे जन्मलेल्या या  54 वर्षीय लेखकाला पुरस्कारासोबत 50,000 पाउंड (सुमारे $64,000) एवढी बक्षिसाची रक्कम दिली गेली.
 3. कादंबरीविषयी - या कादंबरीत अब्राहम लिंकन यांच्या 11 वर्षीय ‘ विली’ या मुलाच्या मृत्यूची कथा आहे. सॉन्डर्स यांचे हे पुस्तक ब्लूम्सबरी या प्रकाशक कंपनीने प्रकाशित केल आहे आणि हे तिसरे वर्ष आहे, जेव्हा या प्रकाशकाच्या पुस्तकाला हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला.
 4. सॉन्डर्स सिराक्यूज विद्यापीठात शिकवितात आणि सन 2013 मध्ये टाइम्स पत्रिकाने त्यांना जगातील  100 सर्वात प्रभावशाली लोकांच्या सूचीत सामिल केले होते.
 5. मॅन बुकर पुरस्कार हा 2004 सालापासून ब्रिटनमध्ये मॅन ग्रुपकडून दिला जाणारा आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार आहे. 2016 सालापासून, हा पुरस्कार इंग्रजी भाषेत एका पुस्तकासाठी दरवर्षी दिला जात आहे आणि पुरस्काराची रक्कम लेखक आणि अनुवादक यांच्यात समप्रमाणात वाटून घेतली जाते.
 6. मॅन बुकर पुरस्कार हा दरवर्षी इंग्रजी भाषेत लिहिलेल्या आणि ब्रिटेनमधून प्रकाशित होणार्‍या मूळ साहित्याला दिला जाणारा साहित्यिक पुरस्कार आहे. या पुरस्काराची  स्थापना 1969 साली झाली, त्यावेळी याचे पहिले मानकरी म्हणून ‘ समथिंग टु आन्सर फॉर’ पुस्तकासाठी  पी. एच. न्यूबी हे ठरले होते.


Top