Anna Burns Wins Man Booker Prize for 'Very Powerful' Milkman

 1. इंग्रजी ग्रंथविश्वात सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘मॅन बुकर’ पुरस्काराची लघुयादी २० सप्टेंबर रोजी जाहीर झाली होती.
 2. पुरस्काराच्या विजेत्याचे नाव लंडनमध्ये जाहीर करण्यात आले.
 3. उत्तर आर्यलडच्या ५६ वर्षीय लेखिका अॅना बर्न्स यांना यंदाचा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला आहे.
 4. अनुवादित इंग्रजी पुस्तकांसाठी हा पुरस्कार दिला जातो. अॅना बर्न्स यांच्या ‘मिल्कमन’ या कादंबरीला हा बहुमान मिळाला आहे.
 5. ब्रिटिश कवी रॉबिन रॉबर्टसन, डेझी जॉन्सन, अमेरिकी लेखक निक डनासो, मायकेल ओदान्शी , अमेरिकी लेखिका रेचल कुशनेर आणि कॅनडियन लेखिका इसाय एडुग्यान यांना पिछाडीवर टाकत अॅना बर्न्स यांनी ५० हजार पौंडांचा हा पुरस्कार पटकावला.
 6. अनुवादित इंग्रजी पुस्तकांसाठी २००५ पासून दर दोन वर्षांनी दिला जाणारा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार २०१६ पासून वार्षिक झाला.
 7. ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरी अथवा कथासंग्रहास हा पुरस्कार दिला जातो.
 8. मूळ लेखकाइतकेच अनुवादकालाही महत्त्व देणाऱ्या या पुरस्काराची पन्नास हजार पौंड इतकी घसघशीत रक्कम लेखक-अनुवादकांमध्ये समसमान विभागून दिली जाते .


The leadership of America's largest command is in the hands of the woman

 1. लेफ्टनंट जनरल लॉरा जे रिचर्डसन या अमेरिकन सैन्याची सर्वांत मोठ्या कमांडची धुरा सांभाळणार आहेत.
 2. एका महिला अधिकाऱ्याला इतकी मोठी जबाबदारी देण्याची अमेरिकेच्या सैन्यदलाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.
 3. लॉरा या यूएस आर्मी फोर्सेज कमांडचे (फोर्सकॉम) नेतृत्व करतील. या कमांडमध्ये ७७६००० सैनिक आणि ९६००० सैनिकेतर कर्मचारी आहेत.
 4. सैन्य अधिकारी म्हणून लॉरा यांनी आपल्या कारकीर्दीत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
 5. १९८६ मध्ये त्या अमेरिकेच्या सैन्यदलात सहभागी झाल्या. त्यानंतर २०१२ मध्ये फर्स्ट कॅवलरी डिव्हिजनचे डेप्यूटी कमांडिग जनरल पद सांभाळणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.
 6. कॅवलरी डिव्हिजन ‘अमेरिका फर्स्ट टीम’ या नावानेही ओळखली जाते.
 7. वर्ष २०१७ मध्ये लॉरा जनरल रॉबर्ट बी अब्राम्स यांच्या कमांडमध्ये दुसऱ्या स्थानावर होत्या. त्यावेळी त्या उत्तर कॅरोलिनाच्या फोर्ट ब्रॅग येथील फॉरस्कॉममध्येही डेप्यूटी जनरलपदी होत्या.


marijuana-legal-in-canada

 1. कॅनडामध्ये गांजाचा नशा करणारे आता कोणाच्याही आडकाठीशिवाय या नशेचं सेवन करु शकणार आहेत. कारण येथे गांजा बाळगणे किंवा त्याची विक्री करणे याला कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
 2. वैद्यकीय मारिजुआना म्हणजेच गांजा यापूर्वीच कॅनडामध्ये कायदेशीर असून आता ड्रग म्हणूनही येथे गांजाला परवानगी मिळाली.
 3. उरूग्वेनंतर गांजाला कायदेशील मान्यता देणारा कॅनडा जगातला दुसरा सर्वात मोठा देश ठरला आहे.
 4. 17 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली. गांजाला कायदेशीर मान्यता मिळताच येथे अनेक ठिकाणी गांजाची दुकानंही सुरू झाली.
 5. या दुकानांबाहेर मोठमोठ्या रांगाही पाहायला मिळाल्या. अनेक वर्षांपासून येथे गांजाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी होत होती.
 6. त्यानंतर ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत गांजा कायदेशीर करण्याची घोषणा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केली होती.
 7. गांजा खरेदी करताना काही अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये महत्त्वाची अट म्हणजे एकावेळी केवळ 30 ग्राम गांजा खरेदी करता येणार आहे.
 8. मध्यंतरी लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीतील शोधकर्त्यांनीही केलेल्या अभ्यासानंतर, कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांच्या उपचारात गांजा अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावू शकतो असं म्हटलं होतं.
 9. अभिनेता उदय चोप्रानेही भारतात गांजा कायदेशीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याचा समाचार घेतला होता, तर सोशल मीडियाच्या युजर्सनी त्याच्यावर टीकेचा भडीमार केला होता.


goa-maritime-symposium 2018

 1. सागरी क्षेत्रातल्या शेजाऱ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी दुसऱ्या गोवा नाविक परिसंवाद-2018चे आयोजन करण्यात आले आहे. नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांनी या परिसंवादाचे आज उद्‌घाटन केले.
 2. नाविक दलाची व्युहरचना आणि सुरक्षा याविषयी सर्वसमावेशक नवकल्पना मांडण्याची संधी या परिसंवादाच्या माध्यमातून संबंधित अभ्यासकांना मिळाली आहे, असे सांगून ॲडमिरल लांबा यांनी परिसंवादाला उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधीचे स्वागत केले.
 3. भारतीय सागरी क्षेत्रामध्ये आणखी मजबूत सहभागीदारी निर्माण करणे, असा मुख्य विषय आज दिवसभर होणाऱ्या या परिसंवादासाठी निश्चित करण्यात आला आहे.
 4. नाविक क्षेत्राला असलेले आणि वाढते धोके यांचाही विचार या परिसंवादात करण्यात येणार आहे.
 5. यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तज्ञ, अभ्यासक आपले विचार मांडणार आहेत. तसेच चर्चाही करणार आहेत.
 6. परिसंवादात श्रीलंकेचे निवृत्त ॲडमिरल डॉ. जयंथ कोलंबगे, सिंगापूरच्या जेन यान गिट यिन, भारतातले तज्ञ कॅप्टन वर्गिस मॅथ्यू आणि प्रा. दत्तेश डीपी परुळेकर, डॉ. जबिन जेकब आणि निवृत्त रिअर ॲडमिरल सुदर्शन श्रीखंडे सहभागी होणार आहेत.
 7. परिसंवादासाठी बांगलादेश, म्यानमार, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर, थायलंड अशा विविध देशातून तसेच नाविक दलाशी संबंधित अधिकारी आले आहेत.
 8. गोवा नाविक परिसंवादाच्या वतीने अशा प्रकारे विशिष्ट संकल्पनेचा, विचाराचा, साकल्याने विचार करण्यासाठी पहिल्यांदा नोव्हेंबर 2016 मध्ये परिसंवादाचे आयोजन केले होते.
 9. त्यामध्ये झालेल्या चर्चेमुळे आणि विचारांच्या आदान-प्रदानामुळे नाविक दलाला अनेक प्रश्न सोडवण्यास मदत झाली होती. 


Former SBI chief Arundhati Bhattacharya will be the director of Reliance Industries

 1. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. कंपनीच्या संचालक मंडळाने भट्टाचार्य यांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली. भट्टाचार्य यांचे पद हे स्वतंत्र संचालक म्हणून असणार आहे.
 3. भट्टाचार्य यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी असणार असून भागधारकांनी मान्यता दिल्यानंतर १७ ऑक्टोबर २०१८पासून त्यांचा कार्यकाळ सुरु झाला आहे.
 4. कंपनीने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
 5. अरुंधती भट्टाचार्य यांना फायनान्शिअल क्षेत्रात सुमारे ४० वर्षांच्या कामाचा अनुभव आहे.
 6. त्या एसबीआयच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या.
 7. गेल्याच आठवड्यात क्रिस कॅपीटल या इक्वीटी फर्मने भट्टाचार्या यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.


Top