NASA's astronaut will remain in the space of 328 days

 1. सलग ३२८ दिवस अंतराळात एकाच अवकाशयानात महिला अंतराळवीराने राहण्याचा विक्रम ‘नासा’ची अंतराळवीर ख्रिस्तिना कोच करणार आहे. ही सर्व मोहीम नासाने तयार केलेल्या पृथ्वीच्या निम्नकक्षेत स्थित इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (आयएसएस) येथून पूर्ण केली जाणार आहे. ही माहिती नासातर्फे देण्यात आली.

 2. आयएसएसवरून नासा एकूण तीन मोहिमा राबवणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक व अंतराळवीर नुकतेच ठरवण्यात आले. या मोहिमांमध्ये जेसिका मेइर या महिला अंतराळवीराचे पहिले अवकाशयान आणि नासाचे अंतराळवीर अँड्रयू मॉर्गन यांचे अंतराळातील वास्तव्य यांचाही समावेश आहे.

 3. ख्रिस्तिना कोच ही महिला अंतराळवीर यावर्षी १४ मार्च रोजी आयएसएसवर दाखल झाली होती. नव्या वेळापत्रकानुसार ख्रिस्तिना पृथ्वीच्या कक्षेत फेब्रुवारी २०२०पर्यंत राहणार आहे. यापूर्वी २०१६-१७मध्ये पेगी व्हिटसन या महिला अंतराळवीराने सलग २८८ दिवस अंतराळात वास्तव्य केले होते. ख्रिस्तिना हा विक्रम मोडणार आहे.

 4. आपल्या अंतराळ वास्तव्यात ख्रिस्तिना नासाच्या ५९, ६० व ६१ या तीन अंतराळ मोहिमांमध्ये सहभागी होईल.

 5. नेपाळचे दोन शास्त्रज्ञ आभास मस्की आणि हरिराम श्रेष्ठ यांनी हा उपग्रह विकसित केला आहे.


Nepal's first satellite

 1. नेपाळने आपला पहिला उपग्रह ‘नेपालीसॅट-१’ अमेरिकेतील व्हर्जिनिया येथून अवकाशात सोडला. १.३ किलो वजनाचा हा उपग्रह निम्नकक्षीय उपग्रह आहे.

 2. श्रीलंकेच्या उपग्रहाचे नाव ‘रावण-१’असे असून, नेपाळच्या उपग्रहाचे नाव ‘नेपालीसॅट-१’ असे आहे. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने या उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे.

 3. श्रीलंका आणि नेपाळ यांच्याबरोबरच जपानचाही एक उपग्रह यावेळी नासाने अवकाशात सोडला. बर्डस-३ नावाचे हे प्रक्षेपण यशस्वी झाल्याचे नासाच्या वतीने सांगण्यात आले. अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांताच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रक्षेपण तळावरून तिन्ही उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.

 4. या उपग्रहांमुळे श्रीलंका आणि नेपाळ या दोन्ही देशांनी जागतिक अंतराळ युगात प्रवेश केला आहे.

 5. श्रीलंकेचा रावण-१ हा उपग्रह १.०५ किलो वजनाचा असून, त्याचे आयुष्य सुमारे दीड वर्षाचे आहे.


Announcing the list of effective people this time by Times

 1. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि लोकचळवळींसाठी कायदेशीर लढा देणाऱ्या अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी यांचा सहभाग जगभरातील प्रभावी व्यक्तींमध्ये करण्यात आला आहे.

 2. ‘टाइम’ या नियतकालिकाने जगभरातील प्रभावी व्यक्तींची 2019 मधील यादी नुकतीच जाहीर केली आहे. त्यात या तिघांचा समावेश आहे. या यादीत भारतीय-अमेरिकन कॉमेडियन हरन मिनाज, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचाही समावेश आहे.

 3. मुकेश अंबानी यांची व्यावसायिक धोरणे ही अधिक व्यापक असून त्यामुळेच जवळपास 280 दशलक्ष लोकांना कमी किमतीत 4जी सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे जगभरात व्यापाराचा विस्तार करून त्यांची ‘कर लो दुनिया मुठ्ठीमे’ हे घोषवाक्य खरे केले आहे.

 4. तर अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी यांनी एलजीबीटीक्यू यांच्यासाठी लढा देऊन कायदेशीर मार्गाने त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत.


Day special:

 1. ख्यातनाम क्रिकेट पंच ‘डिकी बर्ड’ यांचा जन्म 19 एप्रिल 1933 मध्ये झाला होता.

 2. सन 1948 मध्ये ब्रह्मदेशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश झाला.

 3. गीतरामायणातील शेवटचे गाणे सन 1956 मध्ये पुणे आकाशवाणीवरून प्रसारित झाले होते.

 4. भारतीय प्रख्यात उद्योगपती ‘मुकेश अंबानी’ यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी झाला.

 5. सन 1975 मध्ये आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.


Top