जागतिक मानवतावादी दिवस : 19 ऑगस्ट

 1. दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक मानवतावादी दिवस (World Humanitarian Day) साजरा केला जातो.
 2. या वर्षी या दिवसानिमित्त ‘नॉट ए टार्गेट” या नावाने मोहीम चालवली जाणार आहे.

"नॉट ए टार्गेट” मोहीम :-

 1. "नॉट ए टार्गेट" ही फेसबुक लाइव्हसह अभिनव भागीदारीतून सकारलेली एक जागतिक ऑनलाइन मोहीम आहे. याच्या माध्यमातून जगभरात कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार.
 2. तसेच युद्धात सापडलेल्या असुरक्षित लोकांच्या मदतीसाठी जागतिक नेत्यांना त्यांच्या अधिकारात शक्य मदत करण्यासाठी मागणी करण्यात येणार आहे.
 3. ही मोहीम संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांच्या नागरिकांच्या संरक्षणावरील अहवालाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आली आहे.

जागतिक मानतावादी दिवस :-

 1. जागतिक मानवतावादी दिवस हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या आपत्कालीन सहाय्यच्या समन्वयाच्या बळकटीकरणासाठी स्वीडिश-प्रायोजित ठरावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा (UNGA) द्वारे साजरा केला जातो. 
 2. 19 ऑगस्ट 2003 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या बगदादमधील मुख्यालयी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 22 लोक ठार झाले होते. यावेळी इराकमधील संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख प्रतिनिधी सर्जिओ व्हिएरा डी मेलो यांनी आपले प्राण गमावले होते.
 3. पाच वर्षांनंतर 19 ऑगस्ट या तारखेला जागतिक मानवतावादी दिवस साजरा करण्यासंदर्भात ठराव UNGA मध्ये संमत करण्यात आला.  
 4. मानवतावादाचे प्रशंसक व्यक्ति आणि ज्यांनी मानवतावादी मोहिमांमध्ये आपले प्राण गमावलेले आहेत अश्या व्यक्तींच्या आठवणीत हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. 
 5. तसेच या दिवसाच्या माध्यमातून जगभरातील मानवतावादी कार्यांना प्रेरणा देण्यात येते.


तटरक्षक दलाच्या आधुनिकीकरणासाठी योजना

 1. केंद्र सरकारने सागरी सीमेच्या संरक्षणासाठी तटरक्षक दलाच्या सामर्थ्यात वाढ करण्यासाठीच्या महत्त्वपूर्ण योजनेला मंजुरी दिली आहे.
 2. सरकारने मंजूर केलेली योजना ५ वर्षे चालणार असून यासाठी ३१ हजार ७४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 3. २००८ मधील मुंबईवरील हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. यासाठीच केंद्राने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
 4. या नव्या योजनेनुसार, तटरक्षक दलाची टेहळणी क्षमता वाढविण्यासाठी नव्या गस्ती नौका, बोटी, हॅलिकॉप्टर, विमाने आणि अन्य महत्त्वाची सामग्री दिली जाणार आहे.
 5. २०२२ पर्यंत तटरक्षक दलामध्ये १७५ बोटी आणि ११० विमानांचा समावेश करण्याचे उद्दिष्ट या योजनेच्या अंतर्गत ठेवण्यात आले आहे.
 6. या योजनेंतर्गत सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी तटरक्षक दलाचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. 
 7. समुद्र संपत्तीचे संरक्षण, समुद्र पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण, तस्करी, समुद्री चाचे यांचा मुकाबला करण्यासाठी तटरक्षक दलाला पूर्णपणे सुसज्ज करण्याची ही योजना आहे.
 8. भारताला ७,५१७ किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला असून यामध्ये १,३८२ बेटे आहेत. मात्र तटरक्षक दलाची सध्याची क्षमता अतिशय कमी आहे.

सध्या तटरक्षक दलाकडे

 1. ६० बोटी,
 2. १८ हॉवरक्राफ्ट,
 3. ५२ लहान इंटरसेप्टर बोटी,
 4. ३९ टेहळणी विमाने,
 5. १९ चेतक हेलिकॉप्टर, 
 6. आणि ४ आधुनिक ध्रुव हेलिकॉप्टर्स आहेत.


बिल गेट्स यांच्याकडून ४.६ अब्ज डॉलरचे दान

 1. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टमधील त्यांच्या मालकीचे शेअर्स दान केले आहेत. या शेअर्सचे मूल्य गेट्स यांच्या एकूण संपत्तीच्या ५ टक्के इतके आहे.
 2. गेट्स यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रातील बलाढ्य कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टचे ६ कोटी ४० लाख शेअर्स दान केले आहेत. या शेअर्सचे मूल्य ४.६ अब्ज डॉलर म्हणजेच २९ हजार ५७१ कोटी रुपये इतके आहे.
 3. यातील बहुतांश दान त्यांनी त्यांच्या बिल आणि मेलिंडा फाऊंडेशनला दिले आहे. गेट्स दाम्पत्याने समाजकार्यासाठी या संस्थेची स्थापना केली होती.
 4. या संस्थेला बिल आणि मेलिंडा गेट्स यांच्याकडून आतापर्यंत ३५ अब्ज डॉलर्स म्हणजेच २.२४ लाख कोटी रुपये इतके दान मिळाले आहे.
 5. याआधी १९९९मध्ये गेट्स यांनी शेअर्सच्या स्वरुपातच १६ अब्ज डॉलरचे (१ लाख कोटी रुपये) दान केले होते.
 6. त्यानंतर २०००साली गेट्स यांनी ५.१ अब्ज डॉलर्सचे म्हणजेच ३२ हजार ७८० कोटी रुपयांचे दान केले होते.
 7. वॉरेन बफेट यांच्यासोबत गेट्स यांनी २०१०मध्ये ‘गिव्हिंग प्लेज’ची स्थापना केली. तेव्हापासून १६८ धनाढ्य लोक या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
 8. या दानशूर व्यक्तींनी स्वत:च्या संपत्तीतील जास्तीत जास्त वाटा समाजकार्यासाठी देण्याची शपथ घेतली आहे.


IFFI 2017 च्या तांत्रिक समितीचे अध्यक्ष: नागेश कुकूनूर

 1. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI)-2017 साठी नेमण्यात आलेल्या 12 सदस्यीय तांत्रिक समितीचे अध्यक्षपद नागेश कुकूनूर यांच्याकडे देण्यात आले आहे.
 2. 20 ते 28 नोव्हेंबर 2017 या दरम्यान गोवा येथे आयोजित IFFI-2017 साठी संचालक समिती आणि तांत्रिक समिती नेमण्यात आलेली आहे.
 3. 13 सदस्यीय संचालक समितीचे संयोजक जाहनू बरुआ हे आहेत.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव:-

 1. 1952 सालापासून IFFI चे आयोजन दरवर्षी गोवा राज्यात होते.
 2. हा आशियातील सर्वात महत्त्वपूर्ण चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे.
 3. महोत्सवाचे आयोजन माहिती व प्रसारण मंत्रालय, चित्रपट महोत्सव संचलनालय आणि गोवा सरकार संयुक्तपणे करतात.


TRIFED कडून जागतिक मधमाशी दिवस साजरा

 1. 19 ऑगस्ट 2017 रोजी भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित (TRIFED) यांच्यातर्फे ‘जागतिक मधमाशी दिवस’ साजरा केल्या जात आहे.
 2. यावर्षी हा दिवस ‘सेव्ह इंडियन हनी बी’ या संकल्पनेखाली साजरा केला गेला. 
 3. मधुमक्षिका पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे तसेच पिकांच्या परागण प्रक्रियेत या मधमाश्यांचे बहुमोल योगदान ठरते.
 4. यामुळे पिकांचे उत्पादन वाढते आणि मध, रॉयल जेली, बी पोलन, प्रॉपोलिस, मेण इत्यादींचे उत्पादन घेतले जाते.

जागतिक मधमाशी दिवस:-

 1. जागतिक मधमाशी दिवस हा दरवर्षी ऑगस्टच्या तिसर्‍या शनिवारला साजरा केला जातो. या दिवशी मधुमक्षिका पालन आणि माश्यांपासून मिळणार्‍या मधासोबतच इतर उत्पादनाचा वापर याबाबत जागरूकता निर्माण करण्याकरिता हा दिवस साजरा केला जातो.
 2. TRIFED ही राष्ट्रीय स्तरावर कार्यरत एक सर्वोच्च संस्था आहे आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणांतर्गत कार्यरत आहे. 


Top