#HelpUsGreen Honor from United Nations

 1. उत्तर प्रदेशमधील स्टार्ट-अप ‘हेल्प अस ग्रीन’ला (HelpUsGreen) गंगा नदीला स्वच्छ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी संयुक्त राष्ट्रांनी सन्मानित केले आहे.
 2. संयुक्त राष्ट्रांनी भारतासहित 14 इतर देशांनाही संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलाच्या परिषदेदरम्यान सन्मानित केले.
 3. हेल्प अस ग्रीन या स्टार्टअपने फुलांच्या अनेक टन कचऱ्याचे पुनर्नवीनीकरण (रिसायकल) करण्याचे काम केले.
 4. हा स्टार्ट-अप दररोज मंदिरापासून फुले गोळा करतो. या फुलांचे पुनर्नवीनीकरण (रिसायकल) करून त्यापासून चारकोल मुक्त धूप व अगरबत्ती, वर्मीकंपोस्ट आणि बायोडिग्रायबल वेष्टन (पॅकेजिंग) सामग्री तयार केली जाते.
 5. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, या स्टार्टअपने आतापर्यंत 11,060 मेट्रिक टन फुलांच्या कचऱ्याचे पुनर्नवीनीकरण केले आहे.
 6. एका आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशमधील मादिरांमध्ये दररोज 800 दशलक्ष टन फुले वापरली जातात जी नंतर गंगा नदीत टाकली जातात.
 7. यामुळे नदीत प्रदूषण होते आणि रोगराई पसरते.
 8. हेल्प अस ग्रीनची स्थापना फुलांच्या कचऱ्याचा अधिक कार्यक्षमतेने वापर करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.


World Nutrition Report: 2018

 1. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने घोषणा केलेला जागतिक पोषण अहवालानुसार (World Nutrition Report: 2018), भारतात 'अविकसित' मुलांची संख्या जगात सर्वाधिक आहे.
 2. नुकतेच प्रकाशित झालेल्या ‘जागतिक पोषण अहवाल 2018’ यानुसार, भारताला बालकांच्या खुंटीत वाढीसंबंधी संकटाचा सामना करावा लागतो आहे, कारण बालकांमधील खुंटीत वाढीसंबंधी एक तृतीयांश जागतिक भार एकट्या भारतावर असल्याचे चित्र समोर आले आहे.
 3. भारतात 46.6 दशलक्ष बालकांची खुंटीत वाढ आहे आणि याबाबतीत भारताच्या पाठोपाठ नायजेरिया (13.9 दशलक्ष) आणि पाकिस्तान (10.7 दशलक्ष) यांचा क्रम लागतो आहे. 
 4. दीर्घकाळ पोषकतत्वांचे अपुरे सेवन आणि वारंवार होणार्या संक्रमणांमुळे बालकांमध्ये खुंटीत वाढ (Stunting) म्हणजे वयोमानानुसार कमी उंचीची समस्या उद्भवते.
 5. जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने जारी केलेला जागतिक पोषण अहवाल - 2018 नुसार जगभरातील सर्व अविकसित (कमजोर) मुलांपैकी जवळजवळ प्रत्येक तिसऱ्या मुलाचा जन्म भारतात होतो.
 6. पाच वर्षांखालील मुलांच्या वाढीचा दर 6% (2000) 22.2% (2017) खाली आला आहे.


Top