Inauguration of 'Sardar Vallabhbhai Patel Medical Science and Research Institute' in Ahmedabad

 1. दि. 17 जानेवारी 2019 रोजी अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘सरदार वल्लभभाई पटेल वैद्यकीय शास्त्र व संशोधन संस्था’ या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्जित आरोग्य संस्थेचे उद्घाटन करण्यात आले.
 2. ‘सरदार वल्लभभाई पटेल वैद्यकीय शास्त्र व संशोधन संस्था’ हे एक सुपर-स्पेशलिटी सार्वजनिक रुग्णालय आहे.
 3. अहमदाबाद महानगरपालिकेने बांधलेल्या या रुग्णालयात 1500 खाटांची व्यवस्था आहे.
 4. हे 17 मजली रुग्णालय 750 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे.
 5. येथे हवाई अॅम्ब्युलेन्स सुविधा देखील उपलब्ध आहे.


'UNNATI' - the satellite construction and training program of ISRO

 1. बेंगळुरूमध्ये ‘उन्नती’ (युनिस्पेस नॅनोसॅटेलाईट असेंब्ली अँड ट्रेनिंग - UNNATI) या नावाने एका वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
 2. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.
 3. बेंगळुरूमध्ये मुख्यालय असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (ISRO) या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.
 4. कार्यक्रमाचे स्वरूप
  1. ‘उन्नती’ (युनिस्पेस नॅनोसॅटेलाईट असेंब्ली अँड ट्रेनिंग - UNNATI) हा कार्यक्रम ISROच्या यू. आर. राव उपग्रह केंद्र (बेंगळुरू) या संस्थेकडून 3 तुकड्यांमध्ये तीन वर्ष चालवला जाणार आहे आणि 45 देशांच्या अधिकार्‍यांना लाभ देण्याचे लक्ष्य ठेवते.
  2. 17 जानेवारीपासून पहिल्या तुकडीला सुरूवात झाली आहे, ज्यामध्ये 17 देशांमधून 30 प्रतिनिधींचा सहभाग आहे.
  3. हा कार्यक्रम नॅनो-उपग्रहांच्या विकासासंदर्भात क्षमता निर्मितीसाठीचा एक कार्यक्रम आहे.
  4. “बाह्य अंतराळाचा शोधकार्यासाठी आणि शांततेसाठी वापर विषयक” संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या परिषदेला पूर्ण झालेल्या 50 वर्षांच्या (UNISPACE-50) स्मृतीत ISROने हा पुढाकार घेतला आहे.
  5. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नॅनोउपग्रहांचे बांधणी, एकात्मिकरण आणि चाचणी अश्या क्षेत्रांना बळकटी आणण्यासाठी भाग घेणार्‍या विकसनशील देशांना संधी प्रदान केली गेली आहे.
 5. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 
  1. ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे.
  2. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे दि. 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापन करण्यात आलेल्या ISROने 1962 सालच्या ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च’ (INCOSPAR) याला बरखास्त करीत त्याची जागा घेतली.
  3. ही संस्था भारत सरकारच्या विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. 
  4. ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ दि. 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत संघाने प्रक्षेपित केला.
  5. 1980 साली भारतीय बनावटीच्या SLV-2 या प्रक्षेपकाद्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पहिल्यांदा प्रक्षेपित करण्यात आला. दि. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली आणि चंद्रावर पोहचणारा भारत हा जगातला चौथा देश बनला.
  6. त्यानंतर भारताच्या ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ या मोहिमेने दि. 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.


Submit report of action team to the Ministry regarding border management

 1. सीमा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकणार्‍या क्षेत्रांची ओळख पटविण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने तयार केलेल्या कृती दलाने आपला अहवाल मंत्रालयाकडे सादर केला आहे.
 2. कृती दलाचे नेतृत्व संयुक्त सचिव (सीमा व्यवस्थापन) यांच्याकडे होते आणि त्यात सीमा सुरक्षा दल (BSF), अंतराळ विभाग, ISRO, संरक्षण विभाग आणि मंत्रालयाचे प्रतिनिधी तसेच इतर भागधारकांचा समावेश होता.
 3. अहवालानुसार पुढील क्षेत्रांना अंतराळ तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ओळखले गेले आहे -
  1. बेटांचा विकास  
  2. सीमा सुरक्षा
  3. दळणवळण आणि सुचालन
  4. GIS आणि ऑपरेशन्स प्लॅनिंग सिस्टम
  5. सीमा पायाभूत सुविधांचा विकास
 4. शिवाय लघु, मध्यम आणि दीर्घकालीन योजनांचा आराखडा तयार केला गेला आहे, जे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि संरक्षण विभाग यांच्या सहकार्याने पाच वर्षांच्या कालावधीत पूर्ण केले जातील. जमिनीवरील सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे (BFS) दिली गेली आहे.
 5. योजनेनुसार, लघुकालीन आवश्यकतांना पूर्ण करण्यासाठी सीमा प्रहरी दलांसाठी (BGFs) हाय रिजॉल्यूशन इमेजरी आणि संपर्कासाठी बॅंडविड्थ उपलब्ध करून दिली जाणार.
 6. मध्यमकालीन आवश्यकतांना पूर्ण करण्यासाठी ISRO एक उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, ज्याचा वापर केवळ गृह मंत्रालय करणार.
 7. तर दीर्घकालीन आवश्यकतांना पूर्ण करण्यासाठी गृह मंत्रालय नेटवर्क-संबंधी पायाभूत सुविधा विकसित करणार, जेणेकरून अन्य वापरकर्ता संस्था उपग्रहाशी संबंधित स्त्रोतांना सामायिक करू शकणार.
 8. दुर्गम भागात तैनात असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना उपग्रह-आधारित दळणवळणाची सुविधा प्रदान केली जाणार.


Top