देशातील पहिल्या सोलर डीईएमयू ट्रेनचे उद्घाटन

 1. देशातील सौर उर्जेवर चालणाऱ्या पहिल्या डीईएमयू (डिझेल इलेक्ट्रॉनिक मल्टिपल युनिट) ट्रेनला १४ जुलै रोजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला
 2. सध्या दिल्लीच्या सराई रोहिला ते हरयाणाच्या फारुख नगर या मार्गावर ही ट्रेन धावेल. या रेल्वेसाठी अद्याप नवे मार्ग आणि प्रवास भाडे ही ठरवण्यात आलेले नाही.
 3. १६०० हॉर्स पॉवर असलेल्या या ट्रेनमध्ये एकूण १० कोच आहेत.
 4. या रेल्वेतील एका कोचमधून ८९ लोक प्रवास करू शकतात.
 5. १० पैकी ८ कोचच्या छतावर १६ सोलर पॅनल बसवलेले आहेत.
 6. सौरऊर्जेमुळे या सोलर पॅनलमधून ३०० वॅट ऊर्जा निर्मिती होणार आहे.
 7. त्यामुळे कोचमध्ये बसवलेला बॅटरी चार्ज होणार आहे. याद्वारेच या रेल्वेतील सर्व दिवे, पंखे आणि माहिती यंत्रणा चालणार आहे.
 8. या ट्रेनमध्ये पावर बॅकअपची सुविधा असून, एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही रेल्वे ७२ तास बॅटरीवर चालू शकते.
 9. ही रेल्वे चेन्नईतल्या इंटीग्रील कोच फॅक्ट्रीमध्ये तयार करण्यात आली आहे.  
 10. इंडियन रेल्वेज ऑर्गनायजेशन ऑफ अल्टरनेटिव फ्यूअल या संस्थेने यासाठी सोलर पॅनल बनवले आहे.
 11. या सोलर पॅनलची निर्मिती मेक इन इंडिया कार्यक्रमातंर्गत करण्यात आली असून, त्यासाठी ५४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पुढील २५ वर्षांची या सोलर सिस्टीमची वॉरंटी असणार आहे.
 12. या रेल्वेच्या निर्मितीसाठी १३.५४ कोटी रूपये इतका खर्च आला आहे. एका प्रवासी कोचची किंमत सुमारे १ कोटी रूपये आहे.
 13. ही रेल्वे प्रत्येक वर्षी २१ हजार लीटर डीझेलची बचत करणार आहे.
 14. दरवर्षी ९ टन कार्बन उत्सर्जनही कमी होणार आहे. त्यामुळे या ट्रेनमुळे प्रदूषणही थांबवण्यास बऱ्याच अंशी मदत होणार आहे.
 15. या रेल्वेच्या माध्यमातून, जगात प्रथमच रेल्वेमध्ये सोलर पॅनलचा विद्युत ग्रीड म्हणून वापर करण्यात आला आहे.
 16. २०१६-१७ च्या रेल्वे बजेटमध्येच अशा ट्रेनचा उल्लेख करण्यात आला होता. पुढच्या ६ महिन्यांत असे आणखी २४ कोच वाढवण्यात येणार आहेत.


स्वदेशी नवजात श्रवण स्क्रीनिंग उपकरण ‘SOHUM’ चे उद्घाटन

 1. भारतात विकसित केलेल्या नवजात श्रवण स्क्रीनिंग उपकरण ‘SOHUM (सोहम)’ चे नवी दिल्लीत अनावरण करण्यात आले आहे.
 2. स्कूल ऑफ इंटरनॅशनल बायोडिजाइन (SIB) चे स्टार्टअप ‘सोहम इनोवेशन लॅब्स इंडिया प्रायवेट लिमिटेड ने SOHUM विकसित केले आहे.
 3. हे अभिनव वैद्यकीय उपकरण विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने SIB कडून विकसित केले गेले आहे.
 4. SOHUM हे एक स्वस्त असे विशेष उपकरण आहे, जे मेंदूच्या मज्जातंतूंची श्रवण क्षमतेच्या जागृत झालेल्या प्रतिसादासाठी उपयोगात आणले जाते आणि नवजात बालकाच्या ऐकण्याच्या प्रक्रियेची तपासणी करण्याकरिता श्रवणशक्ती तपासणीचे उत्कृष्ट मानक आहे.

SOHUM ची कार्यपद्धती:-

 1. बालकांच्या डोक्यावर श्रवण स्क्रीनिंग यंत्राचे तीन इलेक्ट्रोड लावले जातात, जे ऐकताना मेंदूच्या संवेदना मापतात.
 2. श्रवणशक्तीमुळे बालकाला ऐकू येत असल्यास हे इलेक्ट्रोड मेंदूत उत्पन्न झालेल्या विद्युत प्रतिक्रियांचा तपास करते.
 3. ज्यामुळे त्याला ऐकू येत नाही किंवा आहे ते समजते.
 4. जर कोणतीही विद्युत प्रतिक्रिया मिळाली नाही तर ते मूलं बहिरा असल्याचे समजते.
 5. हे उपकरण बॅटरी संचालित व धोकादायक नाही.
 6. यामध्ये इन-बिल्ट एल्गोरिथम तयार करण्यात आले आहे, जे मिळणार्या संकेतांना बाहेरच्या आवाजापासून वेगळे करतो.

स्कूल ऑफ इंटरनॅशनल बायोडिजाइन (SIB) :- 

 1. SIB हा जैवतंत्रज्ञान विभागाचा एक प्रमुख कार्यक्रम आहे, ज्याचे लक्ष्य भारताची अपूर्ण वैद्यकीय गरजांच्या अनुसार अभिनव व स्वस्त वैद्यकीय उपकरणांना विकसित करणे आहे.
 2. भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) आणि IIT दिल्ली हे संयुक्त रूपाने या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहेत.
 3. बायोटेक कंसोर्टियम इंडिया लिमिटेड हे या कार्यक्रमाच्या तांत्रिकी-कायदेशीर कारवाईचे व्यवस्थापन करीत आहेत.

SOHUM चा फायदा:-

 1. बहिरेपणा घेऊन जन्मलेल्या बालकांच्या अपंगत्वाचे लक्षण वयाचे चार वर्ष पूर्ण केल्यानंतर दिसून येतात.
 2. यामुळे त्यांच्या विकासामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात.
 3. या उपकरणामुळे लवकरात लवकर या समस्येचे निदान होऊन त्यांच्या पुढील मदतीसाठी कार्य करणे सोपे होऊ शकणार.


अमेरिकेत उत्पादन केंद्र सुरु करणारी पहिली भारतीय कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'

 1. देशातील मोठी ऑटोमोबाईल कंपनी असलेली महिंद्रा अँड महिंद्रा वर्षभरात अमेरिकेत पहिले उत्पादन केंद्र सुरु करणार आहे.
 2. अमेरिकेत उत्पादन केंद्र सुरु करणारी महिंद्रा अँड महिंद्रा पहिलीच भारतीय कंपनी ठरणार आहे.
 3. महिंद्रा अँड महिंद्रावर्षभरात डेट्रॉयटमध्ये उत्पादन केंद्र सुरु करणारआहे.
 4. अमेरिकेचा समावेश जगातील महत्त्वाच्या ऑटोमोबाईल बाजारपेठांमध्ये होत असल्याने या देशात विस्तार करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
 5. महिंद्रा अँड महिंद्राने अमेरिकेत 1.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
 6. कंपनीच्या अमेरिकेतील उत्पादन केंद्रामुळे 3 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.
 7. कंपनीकडून अमेरिकेतील उत्पादन केंद्रात ऑफ रोड वाहनांची निर्मिती केली जाणार आहे.
 8. या वाहनांचे डिझाईन कंपनीच्या उत्तर अमेरिकेतील तंत्रज्ञान केंद्रात तयार केले जाणार आहे.


ठाण्यामध्ये उभारणार दुसरे कृषी समृद्धी केंद्र

 1. मुंबई-नागपूर समृद्धी मार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील टाऊनशिपनंतर, आता कल्याण तालुक्यातही एक कृषी समृद्धी केंद्र म्हणजेच टाऊनशिप रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केले आहे.

हे केंद्र कल्याण तालुक्यातील

 1. मौजे नाडगाव,
 2. पितांबरे,
 3. चिंचवली,
 4. उटणे,
 5. आंबिवली तर्फे वासुंद्री

येथे उभारण्यात येणार आहे.

 1. तसेच याबाबत, स्थानिकांकडून नगरविकास विभागाने आता हरकती आणि सूचना मागविल्या आहेत.
 2. राज्यातील 10 जिल्ह्यांना छेदून जाणाऱ्या या समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमीन संपादनास असणारा शेतकऱ्यांचा विरोध डावलून व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हातात हात घेऊन, नगरविकास विभागाने
 3. या मार्गावरील प्रस्तावित २४ समृद्धी केंद्रे अर्थात टाऊनशिप उभारण्याचा निर्णय घेतला आहे.


माझी कन्या 'भाग्यश्री’ नव्या स्वरुपात

 1. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना दीडच वर्षात पूर्णपणे बदलावी लागली आहे.
 2. या योजनेच्या पहिल्या वर्षी एकही लाभार्थी न मिळाल्याने अखेरीस या योजनेच्या अनाकलनीय अटी व नियम बदलण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीस मंजुरी देण्यात आली.
 3. 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सात लाख 50 हजारापर्यंत आहे, अशा समाजातील सर्व घटकांना ही योजना लागू केली जाणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.

दीड वर्षापूर्वी खालील उद्धीष्टांसाठी पंकजा मुंडे यांनी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना जाहीर केली होती.

 1. मुलीचा जन्मदर वाढविणे,
 2. लिंग निवडीस प्रतिबंध करणे,
 3. मुलीच्या शिक्षणास प्रोत्साहन,
 4. मुलीच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे

कारणे:-

 1. मात्र या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षभरात जन्म झालेल्या एकाही कन्येच्या पालकांच्या बॅंकेच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा झालेले नव्हते.
 2. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विविध जिल्ह्यांमधून 200 अर्ज आले.
 3. मात्र अनाकलनीय नियम आणि अटींमुळे एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज मंजूर केले नव्हते.
 4. आता या योजनेतील त्रुटी कमी करून ती अधिक सोपी केली आहे.
 5. नव्या योजनेनुसार एका मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावे 50 हजार रुपये बॅंकेत मुदत ठेव योजनेत गुंतविण्यात येणार आहेत.
 6. 50 हजार रकमेवर सहा वर्षांसाठी होणारे व्याजच मुलीच्या वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल.
 7. मुदलाची 50 हजार रुपयांची गुंतवणूक करून सहा वर्षांसाठी मिळणारे व्याज मुलीच्या वयाच्या 12 व्या वर्षी काढता येईल.
 8. तसेच पुन्हा मुद्दल 50 हजार रुपये गुंतवून सहा वर्षांसाठी मिळणारे व्याज अधिक मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या 18 व्या वर्षी काढता येणार आहे.
 9. माता किंवा पिता यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर रक्कम देण्यात येणार आहे.

दोन मुलींनंतर लाभ :-

 1. दोन मुलींनंतर प्रत्येकी 25 हजार रुपये बॅंकेत मुदत ठेव योजनेत गुंतविण्यात येणार.
 2. मुलींचे वय 6, 12 वर्षे अशा दोन टप्प्यांत 25 हजाराचे व्याज आणि 18 व्या वर्षी 25 हजार आणि व्याज माता किंवा पित्याने शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर दोन्ही मुलींना देण्यात येणार.


Top