Announcing the 17th World Tobacco or Health Council's Declaration

 1. 7-9 मार्च 2018 रोजी दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊन येथे 17 वी जागतिक तंबाखू किंवा आरोग्य परिषद (World Conference on Tobacco or Health) पार पडली.
 2. परिषदेच्या शेवटी ‘केपटाऊन घोषणापत्र’ स्वीकारण्यात आले. याप्रसंगी 11 घोषणा करण्यात आल्या.
 3. 2021 साली डब्लिनमध्ये जागतिक तंबाखू किंवा आरोग्य परिषद आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.
 4. तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी 7 दशलक्षांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात आणि बहुतेक मृत्यू कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. धूम्रपानाशी संबंधित जागतिक आर्थिक उलाढाल $2 लाख कोटीपर्यंत पोहचलेली आहे, जी 2016 साली जागतिक GDP च्या 2% होती.
‘केपटाऊन घोषणापत्र’
 1. तंबाखू उद्योगाचा हस्तक्षेप थांबविण्यासाठी आणि WHO FCTC च्या अंमलबजावणीमध्ये गती वाढविण्यासाठी नागरी समाजांना एकत्र आणणार.
 2. सरकार, शास्त्रज्ञ, संशोधन संस्था, प्रतिष्ठान आणि नागरी संस्था यांना स्मोकफ्री वर्ल्ड साठीच्या फिलिप मॉरिस इंटरनॅशनल समर्थित प्रतिष्ठान आणि तंबाखू उद्योगाच्या अन्य पुढाकारांसोबत संबंध जुडण्यास मनाई करणार किंवा बंदी घालणार.
 3. मानवाधिकार आणि तंबाखूमुक्त विश्व विषयक केप टाउन घोषणापत्राचा स्वीकारला गेला.
 4. आफ्रिकन सरकारला विकासासाठी तंबाखू कर वाढविण्याची शिफारस करणार्‍या वित्तविषयक अदीस अबाबा कार्यपद्धतीला अंमलात आणण्यासाठी सुचविले जात आहे.
 5. WHO FCTC मीडियम टर्म स्ट्रॅटेजिक फ्रेमवर्कच्या विकासामध्ये आणि योजनेत सक्रियपणे सहभागी होण्याबाबत सर्व पक्षांना सुचविले जात आहे.
 6. तंबाखू मुक्त पिढीच्या संकल्पनेला समर्थन देत आहोत आणि त्यासाठी युवा सहभाग आणि अधिकारांचे समर्थन करण्यास प्रतिबद्ध आहोत.
 7. तंबाखू नियंत्रणाकरिता सतत निधीला प्राधान्य देऊन आणि तंबाखू उद्योगातील सार्वजनिक आणि खाजगी गुंतवणुकीस रोखून WCTOH 2018 घोषणापात्राचे सक्रियपणे समर्थन करण्यासाठी अर्थमंत्र्यांना निवेदन करतो.
 8. प्राधान्य म्हणून सरकारांना विनंती करतो की, सतत तंबाखूच्या उत्पादनांना न परवडण्याजोगे आणि उपलब्धततेपासून कमी करण्याकरिता आर्थिक धोरणे आखणे.
 9. WHO FCTC मध्ये लिंग आधारित माहितीचे संकलन एकात्मिक करण्यासाठी पक्षांना आवाहन करतो.
 10. यूएन आर्थिक व सामाजिक परिषदेच्या (ECOSOC) निर्णयासोबत संरेखित करण्यासाठी आणि ताबडतोब तंबाखू उद्योगाशी त्याचा सहयोग समाप्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेकडे (ILO) निवेदन करतो.
 11. तंबाखूच्या उत्पादनांची विक्री बाद करण्यासाठी 2021 सालापर्यंत एक योजना विकसित करण्यासाठी सरकारला आवाहन करतो.


Due to the disaster, the loss of millions of agricultural land reaches poor farmers - United Nations

 1. संयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटना (FAO) ने त्याचा ‘2017: द इंपॅक्ट ऑफ डिझास्टर अँड क्राइसेसऑन अॅग्रिकल्चर अँड फूड सेक्युरिटी’ शीर्षकासह अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 2. अहवालानुसार, दरवर्षी जगभरातील विकसनशील शेतकर्‍यांना दुष्काळ, पूर, पशु-रोगांचा फैलाव आणि रासायनिक प्रभाव अश्या प्रमुख आपत्ती परस्थितीशी झुंजावे लागते, ज्यामुळे कोट्यवधी डॉलरचे नुकसान होते.
 3. या परिस्थितीला पाहता आपत्तीची जोखीम कमी करण्यासाठीची व्यवस्था आणि त्याचे व्यवस्थापन हा आधुनिक शेतीचा एक अविभाज्य भाग असणे आवश्यक आहे, असा सल्ला देण्यात आला आहे.
 4. यूएन अन्न आणि कृषी संघटना (FAO):-
  1. अन्नाच्या मर्यादित साठ्याकडे पाहता उत्पादन वाढविण्याची गरज वाटायला लागली.
  2. या चित्राला पाहता संयुक्त राष्ट्रसंघाने 16 ऑक्टोबर 1945 रोजी रोममध्ये ‘अन्न आणि कृषी संघटना (FAO) ची स्थापना केली. याचे मुख्यालय रोम (इटली) येथे आहे.
  3. उपासमारीला संबोधित करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता फैलावण्यासाठी सन 1980 पासून 16 ऑक्टोबरला 'जागतिक अन्न दिवस' साजरा करण्याचे सुरू केले गेले.
‘2017: द इंपॅक्ट ऑफ डिझास्टर अँड क्राइसेसऑन अॅग्रिकल्चर अँड फूड सेक्युरिटी’
 1. ठळक बाबी:-
 2. सन 2005 आणि सन 2015 या कालखंडात नैसर्गिक आपत्तींमुळे विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांच्या कृषी क्षेत्रांना प्रभावित पीक किंवा नष्ट झालेले पीक यामुळे तसेच पशुधन उत्पादनाच्या क्षेत्रात USD 96 अब्जचे मोठे नुकसान पोहचलेले आहे, ज्यामध्ये आशियाचा वाटा USD 48 अब्ज एवढा आहे.
 3. दुष्काळ हे कृषी उत्पन्नात तुटीचे प्रमुख कारण ठरले आहे. दुष्काळामुळे कृषी अर्थव्यवस्थेचे सर्व आर्थिक नुकसानीपैकी 83% नुकसान झाले, ते जवळपास USD 29 अब्जपर्यंत होते.
 4. आशियात पूर आणि वादळांचा प्रभाव सर्वाधिक होता. भूकंप, त्सुनामी आणि अती-उच्च तापमान यामुळेही त्यांच्या कृषी-व्यवस्थांना देखील मोठे नुकसान झेलावे लागले.
 5. सिरियात संघर्षामुळे पडलेल्या प्रभावांवर केला गेलेला हा पहिलाच अभ्यास आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की सन 2011-2016 या कालखंडात देशाच्या कृषी क्षेत्रात तूट आणि नुकसानी कमीतकमी USD 16 अब्ज होती.
 6. आफ्रिका तसेच लॅटिन अमेरिका व कॅरिबियन येथील देशांसाठी दुष्काळ ही सर्वात महागडी आपत्ती ठरली. त्यामुळे सन 2005-2015 या कालखंडात पिकांचे USD 10.7 तर पशुधनाचे USD 13 अब्ज एवढे नुकसान झाले. आफ्रिकेतील शेतकर्‍यांचे त्या कालावधीत USD 6 अब्जपेक्षा जास्त नुकसान झाले.


RBI announces 80th Industrial Outlook Survey (IOS)

 1. भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर-डिसेंबर 2017 मध्ये केलेल्या इंडस्ट्रियल आउटलुक सर्वे (IOS) च्या 80 व्या फेरीच्या परिणामांना प्रसिद्ध केले आहे.
 2. हा अभ्यास भारतीय निर्माण क्षेत्रात कंपन्यांद्वारे सन 2017-18 च्या तिसर्‍या तिमाहीत व्यापाराच्या स्थितीचे गुणात्मक मूल्यांकन प्राप्त करतो आणि सन 2017-18 च्या चौथ्या तिमाहीसाठी त्यांच्या अपेक्षा दर्शवितो.
 3. परिणामांनुसार, भारतीय निर्माण क्षेत्रातील व्यवसायिक भावनेत सुधारणा झाली, म्हणजेच व्यवसाय अपेक्षा निर्देशांक (BEI) हा सन 2017-18 च्या दुसर्‍या तिमाहीमधील 103.7 वरून तिसर्‍या तिमाहीत 109.8 वर आला.
 4. RBI च्या फेब्रुवारी 2018 च्या द्विमासिक चलनविषयक धोरणानुसार, सन 2018-19 साठी महागाईचा अंदाज हा H1 मध्ये 5.1-5.6% आणि H2 मध्ये 4.5-4.6% असेल.
 5. राष्ट्रीय उत्पन्न 2017-18 याच्या दुसर्‍या आगाऊ अंदाजानुसार, GVA (2011-12 आधारित) दुसर्‍या तिमाहीतल्या 6.2% वरून तिसर्‍या तिमाहीत 6.7% पर्यंत वाढणार. त्याचप्रमाणे याच काळात वास्तविक GDP वृद्धीदर 6.5% वरून 7.2% पर्यंत होणार.
 6. भारतीय औद्योगिक क्षेत्रातील एकूणच व्यावसायिक भावनांचे मूल्यांकन तिसर्‍या तिमाहीत सुधारले आहे. 
 7. GST ची अंमलबजावणी स्थिर होत आहे आणि गुंतवणुकीच्या प्रक्रियेत पुनरुज्जीवन होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. निर्यात वृद्धी अपेक्षित आहे.
 8. GVA वृद्धीदर सन 2017-18 मधील 6.6% वरून सन 2018-19 मध्ये 7.2% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.


NITI commission's 'SATH-E' project

 1. NITI आयोगाने शालेय शिक्षणात प्रशासकीय बदल घडवून आणण्याकरिता 17 मार्च 2018 रोजी ‘मानव संपदा शिक्षणात बदलण्यासाठी शाश्वत कृती' (Sustainable Action for Transforming Human Capital in Education -SATH-E/साथ-ई) नावाने एक नवा उपक्रम प्रस्तुत केला आहे.
 2. हा उपक्रम 2018-2020 या काळात चालविला जाणार आहे.
 3. यामधून शालेय शिक्षणात 'आदर्श राज्य' बनविण्याचे लक्ष्य ठेवलेल्या झारखंड, मध्यप्रदेश आणि ओडिशा या तीन राज्यांसाठी विशेष आराखडा तयार केला जाईल.
 4. हा या प्रकारचा पहिलाच प्रयोगात्मक कृतीशील कार्यक्रम आहे, ज्यामध्ये वैयक्तिक, जिल्हा आणि राज्य पातळीवर हस्तक्षेप होईल.
 5. हा आराखडा NITI आयोग, तिन्ही राज्ये आणि बोस्टन कंसल्टिंग ग्रुप (BCG) आणि पिरामल फाउंडेशन फॉर एज्युकेशन लीडरशिप (PFEL) या ज्ञान भागीदारांनी तयार केला आहे.


The Importance of Today's Day in History 19 march

महत्वाच्या घटना:-

 1. १६७४: शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्‍नी काशीबाई यांचे निधन.
 2. १८४८: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
 3. १९३१: अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.
 4. २००१: वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.

​​​​​​​जन्म:-

जन्म
 1. १८२१: ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १८९०)
 2. १८९७: चित्रपट संगीतकार शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचा जन्म.
 3. १९००: मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट १९५८)
 4. १९३६: स्विस अभिनेत्री ऊर्सुला अँड्रेस यांचा जन्म.
 5. १९३८: बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांचा जन्म.

मृत्यू:-

मृत्यू
 1. १८८४: आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचे निधन. (जन्म: १६ मे १८२५)
 2. १९७८: भारतीय वकील आणि राजकारणी एम. ए. अय्यंगार यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १८९१)
 3. १९८२: स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कॄपलानी यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)
 4. १९९८: केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद यांचे निधन. (जन्म: १३ जून १९०९)
 5. २००२: यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हाणे यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९३१)


Top