1. स्पर्धेचे ठिकाण - सान्या (चीन)
 2. जगात सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिस वर्ल्ड २०१७’ चा मुकूट भारताच्या - मानुषी छिल्लरने - पटकावला..
 3. १७ वर्षांनतर भारताच्या सौंदर्यवतीने मिस वर्ल्ड स्पर्धेत बाजी मारली आहे..
 4. जगभरातून आलेल्या १३० सौंदर्यवतींमध्ये भारताच्या मानुषी छिल्लरने ‘मिस वर्ल्ड २०१७’चा मुकूट पटकावला..
 5. ग्लॅमर- फॅशनच्या दुनियेतील तारे आणि गाण्यांचा रंगारंग कार्यक्रम अशा वातावरणात हा सोहळा पार पडला..
 6. अंतिम पाचमध्ये इंग्लंड, फ्रान्स, भारत, केनिया आणि मेक्सिको या देशांच्या सौंदर्यवतींनी स्थान पटकावले..
 7. प्रश्नोत्तराच्या फेरीत मानुषीने आईविषयी दिलेल्या उत्तराला सर्वांनीच दाद दिली.
 8. जगात सर्वात जास्त पगार आणि आदर कोणत्या प्रोफेशनला मिळायला पाहिजे..? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर मानुषी म्हणाली, मी माझ्या आईच्या जवळ आहे.. माझ्यामते आईला आदर आणि प्रेम मिळायलाच पाहिजे.. पगारापेक्षाही तुम्ही तिला जास्त प्रेम दिले पाहिजे.. माझ्यासाठी माझी आई प्रेरणास्थान आहे. जगातील प्रत्येक माता तिच्या मुलांसाठी असंख्य तडजोडी करत असते. त्यामुळे माझ्या मते ‘आई’ हे एक असे प्रोफेशन आहे, जिला सर्वात जास्त आदर आणि पगार असायला हवा, असे तिने सांगितले.
 9. टॉप ३ मध्ये भारतासह इंग्लंड आणि मेक्सिकोच्या सौंदर्यवतींनी स्थान पटकावले.
 10. मेक्सिकोची अँड्रीया मेझा सेकंड रनरअप तर इंग्लंडची स्टेफनी हिल फर्स्ट रनरअप ठरली.
 11. यानंतर मिस वर्ल्डच्या किताब मानुषी छिल्लरला मिळाल्याचे जाहीर करण्यात आले आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
 12. प्रियंका चोप्रानंतर (२०००) भारताच्या सौंदर्यवतीला मिस वर्ल्डचा किताब मिळाला आहे.

मानुषी छिल्लर :

 1. जन्म - ७ मे १९९७
 2. ही २१ वर्षांची असून ती मूळची हरयाणाची आहे. तिचे शालेय शिक्षण दिल्लीतील इंग्रजी शाळेतून झाले.
 3. यानंतर सोनीपतमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून तिने पुढील शिक्षण घेतले.

आजपर्यंतच्या भारताच्या मिस वर्ल्ड :

 1. १९६६ - रिटा फारीया.
 2. १९९४ - ऐश्वर्या राय.
 3. १९९७ - डायना हेडन.
 4. १९९९ - युक्ता मुखी.
 5. २००० - प्रियांका चोप्रा.
 6. २०१७ - मनुषी छिल्लर.


 1. 19 नोव्हेंबर 2017 रोजी इंदिरा गांधी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना 2017 सालचा इंदिरा गांधी शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 2. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सन 2004 ते सन 2014 या काळात त्यांच्या नेतृत्वासाठी आणि देशाच्या शांती आणि विकास यासाठी दिलेल्या योगदानासाठी इंदिरा गांधी पुरस्कार दिला गेला.
 3. पंतप्रधान म्हणून दुसरा कार्यकाळ पूर्ण करणारे मनमोहन सिंग हे देशाचे तिसरे असे पंतप्रधान आहेत. ते भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर देखील होते. पी. वी. नरसिंह राव यांच्या काळात ते देशाचे अर्थमंत्री होते.
 4. इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टतर्फे इंदिरा गांधी शांती पुरस्कार दिला जात आहे. 1986 साली या पुरस्काराची स्थापना झाली. एक ट्रॉफी, रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


Top