1. ब्रिटिश कंपनी क्‍वाकरेली सायमंस (QS) द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘QS एशिया यूनिवर्सिटी रॅंकिंग 2018’ मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) बॉम्‍बे याने 34 वे स्थान मिळवून सर्वोत्तम भारतीय विद्यापीठ ठरले आहे.
 2. या वर्षीच्या रँकिंगमध्ये 400 हून जास्त विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे. हे सर्वेक्षण  10 निर्देशकांवर आधारित आहे.
  1. शैक्षणिक प्रतिष्ठा,
  2. नियोक्ता प्रतिष्ठा,
  3. शिक्षक-छात्र गुणोत्तर,
  4. PhD कर्मचारी,
  5. प्रकाशित प्रबंध प्रती शिक्षक,
  6. आंतरराष्ट्रीय शिक्षक,
  7. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी,
  8. आंतरिक संस्थांमधील विद्यार्थ्यांचे आदानप्रदान,
  9. बाह्य संस्थांमधील विद्यार्थ्यांचे आदानप्रदान आणि
  10. प्रत्येक प्रबंधाचे उद्धरण.
 3. नानयांग टेक्नॉलॉजीकल यूनिवर्सिटी, सिंगापुर (NTU सिंगापुर) ही आशियामधील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे. त्यानंतर आशियामधील शीर्ष  5 विद्यापीठांमध्ये नॅशनल यूनिवर्सिटी ऑफ सिंगापुर (2), हाँगकाँग यूनिवर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (3), कोरिया एडवांस्ड इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी-दक्षिण कोरिया (4) आणि यूनिवर्सिटी ऑफ हाँगकाँग (5) यांचा समावेश आहे.
 4. शीर्ष 100 मध्ये IIT बॉम्बे,  IIT दिल्ली (41),  IIT मद्रास (48),  भारतीय विज्ञान संस्था (IISc) बेंगळुरू (51),  IIT कानपुर,  IIT खडगपुर,  दिल्ली विद्यापीठ,  IIT रुडकी (93) आणि IIT गुवाहाटी या नामांकित भारतीय विद्यापीठांचा समावेश झाला आहे.
 5. नियोक्ता प्रतिष्ठा निर्देशकात IIT बॉम्बे जागतिक पातळीवर 21 व्या क्रमांकावर आहे. 


 1. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) ऑफ इंडिया लिमिटेड या सर्वात मोठ्या कमोडिटी एक्सचेंजने धनोत्रयदशीच्या शुभ प्रसंगी 17 ऑक्टोबर 2017 रोजी सोन्यासह देशाचे पहिले कमोडिटी ऑप्शन ट्रेडिंग सुरू केले.
 2. नवी दिल्लीत आयोजित समारंभात  केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या  कमोडिटी ऑप्शन ट्रेडिंगचा शुभारंभ केला.
 3. MCX ने  28 नोव्हेंबर 2017 आणि 29 जानेवारी 2018 च्या कालबाह्यतेसह अंतर्भूत मालमत्ता म्हणून सोने (1 किलो) साठी युरोपिय-शैलीतील गोल्ड ऑप्शन करार सुरू केले आहे.
 4. 14 वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या आधुनिक कमोडिटी डेरिवेटिव ट्रेडिंग नंतर ही सर्वात महत्त्वाच्या सुधारात्मक उपायांपैकी एक आहे.
 5. टप्प्याटप्प्याने कमोडिटी बाजारपेठेला विकसित आणि एकीकृत करण्यासाठी भारत सरकार आणि बाजारपेठ नियामक  सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) प्रयत्न करीत आहे.
 6. सुवर्ण धातूच्या पर्यायानंतर  का पूस, कच्चे पाम तेल, चांदी आणि तांबा यांच्या पर्यायी ट्रेडिंगसाठीही मान्यता घेण्याचे प्रयत्न केले जातील.
 7.  ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे हा स्टॉक एक्सचेंजवर फ्यूचर ट्रेडिंग (प्रत्यक्ष कर्जरोखे, खरेदी न करता, भविष्यात रोखे खरेदी विक्री करण्याची प्रक्रिया) सारखाच डेरिवेटिव प्रॉडक्ट असतो. मात्र यामध्ये खरेदीदाराची जोखिम मर्यादित आणि प्रॉफिट अमर्यादित असतो.  फ्यूचर ट्रेडिंगमध्ये हेजिंग (प्रतिरक्षा) चा पर्याय मिळत नसतो, परंतू यामध्ये ही सुविधा आहे. त्यामुळे यामध्ये काही प्रीमियम भरून नुकसानीचा विमा मिळतो.
 8. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) ऑफ इंडिया लिमिटेड हे भारतामधील अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक कमोडिटी एक्सचेंज आहे. याचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. नोव्हेंबर 2003 मध्ये MCX च्या कार्याला सुरुवात करण्यात आली होती.
 9. हे  फायनॅनष्यल टेक्नोलॉजीज (इंडिया)  लिमिटेड (FTIL) द्वारा स्थापित डिम्युच्युएलाइज्ड एक्सचेंज आहे, जे संपूर्ण भारतात कमोडिटी फ्यूचर ट्रेडिंगसाठी ऑनलाइन ट्रेडिंग, क्लियरिंग व निवाडा या सुविधा प्रदान करणारी भारत सरकारकडून स्थायी रूपात मान्यताप्राप्त आहे.
 10. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) हे भारतामधील सिक्युरिटीज बाजारपेठेचे नियामक आहे. 1988 साली याची स्थापना केली गेली आणि SEBI अधिनियम 1992 अन्वये 30 जानेवारी 1992 रोजी आला वैधानिक दर्जा दिला गेला.


Top