50 रूपयांच्या नव्या नोटेची घोषणा

 1. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 50 रूपयांच्या नव्या नोटेची घोषणा केली असून लवकरच ती बाजारात येणार आहे.
 2. 50 रूपयांच्या या नव्या नोटेवर महात्मा गांधींचे छायाचित्र असेल. तसेच या नोटेवर बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल.
 3. या नव्या नोटेवर देशाचा सांस्कृतिक वारसा दाखवण्यात आला आहे. नोटेच्या मागील बाजूस विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपीचे छायाचित्र आहे.
 4. गतवर्षी डिसेंबर महिन्यातच आरबीआयने लवकरच 50 आणि 20 रूपयांच्या नव्या नोटा चलनात येणार असल्याचे जाहीर केले होते.
 5. 50 रूपयांच्या नव्या नोटेचा रंग हा फिकट निळा आहे. ही नोट आकाराने 135 मिमी लांब आणि 66 मिमी रूंद आहे. त्याचबरोबर यामध्ये अनेक डिझाइन आणि पॅटर्न आहेत.

नोटेचा समोरील भाग :-

 1. नोटेच्या वरील भागात डाव्याबाजूस 50 असे अंकी लिहिलेले असेल. प्रकाशातही हा अंक आरपार दिसेल.
 2.  देवनागरी भाषेत 50 लिहिलेले आहे.
 3.  मध्यभागी महात्मा गांधी यांचे छायाचित्र
 4.  छोट्या अक्षरात 'RBI', 'INDIA' आणि '50' असे लिहिलेले असेल.
 5.  नोटेत सुरक्षा धागा असेल ज्यावर भारत आणि RBI असले लिहिलेले असेल.
 6.  गॅरंटी क्लॉज, गव्हर्नर यांची स्वाक्षरी त्याचबरोबर प्रॉमिस क्लॉज आणि महात्मा गांधींच्या छायाचित्राच्या उजव्याबाजूस आरबीआयचे चिन्ह.
 7.  उजव्या बाजूस अशोक स्तंभ
 8.  50 रूपयांचा वॉटरमार्क
 9.  नोट क्रमांक पॅनल असेल. यात अंकांचा आकार मोठा होत जाईल.


राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत भारतात 50000 कि.मी.चे रस्ते LED ने प्रकाशमान 

 1. भारत सरकारच्या राष्ट्रीय स्ट्रीट लायटिंग कार्यक्रम (SLNP) अंतर्गत देशभरात 30 लाख LED स्ट्रीट लाइट बसवून 50,000 किलोमीटरचा रस्ता प्रकाशमान करण्यात आलेला आहे.
 2. या यशासोबतच वीज मंत्रालयाअंतर्गत ‘एनर्जी एफिशियन्सी सर्विसेज लिमिटेड (EESL)’ ही कंपनी जगातील सर्वात मोठी स्ट्रीट लाइट व्यवस्थापन कंपनी ठरली आहे.

SLNP मधील प्रगती  

SLNP अंतर्गत, LED दिव्यांच्या प्रस्थापनेत आघाडीवर असलेल्या राज्यांमध्ये

 1. राजस्थान (7.85 लाख),
 2. आंध्रप्रदेश (6.03 लाख)
 3. आणि गुजरात (5.4 लाख) हे आहेत. 
 4. हिमाचल प्रदेश, त्रिपुरा आणि गुजरात या राज्यांतले प्रकल्प जवळजवळ पूर्ण झाले आहेत.
 5. हा कार्यक्रम अलीकडेच चंदीगड आणि पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटे शहरात सुरू करण्यात आला आहे.

EESL ची यशस्वी वाटचाल:-

 1. 30 लाख LED दिवे बसविण्याबाबतचा EESL च्या प्रगतीचा आढावा पुढीलप्रमाणे आहे -
 2. यामुळे वार्षिक 39 कोटी kWh विजेची बचत झालेली आहे.
 3. यामुळे शहरी नगरपालिकांना भासणारी 104.19 MW हून अधिकच्या वीज क्षमतेत बचत झालेली आहे.
 4. याशिवाय वर्षाला 3.29 लाख टन CO2 उत्सर्जनात कमतरता आणण्यास मदत झालेली आहे.  
 5. सध्या, EESL दररोज LED स्ट्रीट लाईटने 15,000 परंपरागत दिवे बदलत आहे. 
 6. EESL उत्तरप्रदेशातील काशी भागात विशेष वारसा लायटिंग प्रकल्प राबवत आहे, जेथे 4000 दिवे बसविण्यात येत आहेत. 
 7. दिव्यांच्या मोठ्या प्रमाणावर खरेदीमुळे LED स्ट्रीट लाइटची खरेदी किंमत रु. 135/वॅट वरून रु. 80/वॅट इतकी कमी करण्यात आली आहे. 
 8. याबदल्यात नगरपालिका EESL ला 7 वर्षासाठी देखभाल आणि वीज बचतीबाबत शुल्क अदा करणार.
 9. EESL ने खरेदीत BIS निर्देशांचे पालन करते आणि तांत्रिक दोषांविरूद्ध 7 वर्षांची वॉरंटी देतात. 

LSNP आणि EESL बाबत:-

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 जानेवारी 2015 रोजी 100 शहरांसाठी ‘राष्ट्रीय स्ट्रीट लाइट कार्यक्रम (SLNP)’ याला सुरूवात केली होती.
 2.  ज्याअंतर्गत, वर्षाला 9,000 दशलक्ष वीज युनिटची बचत करण्याच्या उद्देशाने 3.5 कोटी नगरपालिकांकडून व्यवस्थापित केल्या जाणार्‍या रस्त्यांवरील पारंपरिक दिव्यांना बदलण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले होते.
 3. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एनर्जी एफिशियन्सी सर्विसेज लिमिटेड (EESL) या सरकारी कंपनीला नियुक्त करण्यात आले आहे.
 4. EESL हा NTPC लिमिटेड, पॉवर फायनॅन्स कॉर्पोरेशन, ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ आणि पावरग्रिड यांचा एक संयुक्त उपक्रम आहे. ही कंपनी भारत सरकारच्या वीज मंत्रालय अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे.


डॉ. पंजाबराव देशमुखकृषी विद्यापीठात शहिदांना आदरांजली

 1. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी संघर्ष करताना हौतात्म्य आलेल्या शहिदांना 20 ऑगस्ट रोजी आदरांजली वाहण्यात आली, तसेच माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली.
 2. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना विदर्भातच व्हावी, याकरिता आंदोलन 1968 साली उभारण्यात आले होते.
 3. या आंदोलनातील सहभागी आंदोलकांनी 20 ऑगस्ट रोजी अमरावती येथे उग्र निदर्शने केली होती.

विद्यापीठ आंदोलकांना रोखण्यासाठी झालेल्या गोळीबारात

 1. नरेंद्र देशमुख,
 2. सुरेश भडके,
 3. भिरुमल रिझुमल,
 4. सुरेश कुर्‍हे,
 5. प्रफुल्लचंद्र कोठारी,
 6. गजानन देवघरे,
 7. नेमीचंद गोपाल,
 8. सुरेश वानखडे,
 9. शेख रफिक शहीद झाले, तर असंख्य विदर्भवीर जखमी झाले.

या शहिदांचे बलिदान मात्र व्यर्थ गेले नाही.

कारण विदर्भाच्या शेती क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना अकोला येथे 20 ऑक्टोबर 1969 रोजी झाली.

तसेच विद्यापीठ स्थापनेसाठी बलिदान देणार्‍या शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी विद्यापीठ मुख्यालयी शहीद स्मारक येथे विशेष सभेचे आयोजन 20 ऑगस्ट रोजी करण्यात येते.


दिल्लीला मिळणार वॉशिंग्टन डीसीप्रमाणे सुरक्षा कवच

 1. भारताची राजधानी असलेल्या दिल्लीला लवकरच वॉशिंग्टन डीसीप्रमाणे सुरक्षा कवच मिळणार आहे.
 2. अमेरिकाच हे सुरक्षा कवच आपल्या देशाला उपलब्ध करून देणार आहे.
 3. केंद्र सरकारतर्फे लवकरच 'नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल' चा उपयोग दिल्लीच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 4. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत भारताचे संबंध सध्या तणावाचे आहेत.
 5. चीनने तर वारंवार युद्धाची धमकी दिली आहे आणि पाकिस्तान दहशतवादी कारवाया करण्यात आघाडीवर आहे.
 6. अशात राजधानी दिल्लीला एका सबळ हवाई सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता आहे. 
 7. ही गरज लक्षात घेऊनच 'नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल' चा वापर दिल्लीच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार आहे.


Top