Madhukar Ramdas Joshi has been presented the Gyanoba-Tukaram Award of the state government

 1. राज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१८-१९ चा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ संत साहित्याचे अभ्यासक श्री.म.रा.जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे.
 2. रुपये ५ लाख रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप असून, आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली.
 3. मधुकर जोशी हे संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक असून या विषयावर ते लेखन करीत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्राध्यापक म्हणून नागपूर विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले आहेत.
 4. नागपूर विद्यापीठामध्ये मराठी साहित्याच्या ज्ञानकोषाचे ते संपादक आहेत. तुकाराम महाराजांच्या एक हजार पृष्ठांच्या गाथेचे त्यांनी संपादन केले आहे.
 5. प्राचीन मराठी संत वाड.मय आणि साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. पीएच.डी आणि एम.फिलचे परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेले आहे.
 6. मराठी बोर्ड ऑफ स्टडी जबलपूर, नागपूर आणि उज्जैन अभ्यास मंडळावर त्यांनी सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते. श्री जोशी संत साहित्य विषयाचे पीएचडी चे मार्गदर्शक आहेत.
 7. त्यांचे २०० हून अधिक लेख ‘एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइजम’ कडून प्रकाशित करण्यात आले आहेत. ‘सार्थ तुकाराम गाथे’ची ४०० हस्तलिखिते तपासून प्रसिद्ध केली आहेत.
 8. नाथ सांप्रदाय, ज्ञानेश्वरी संशोधन, गुलाबराव महाराज समकालीन साहित्य, दत्त गुरुचे दोन अवतार, मनोहर आम्बानगरी, श्री विठ्ठल आणि पंढरपूर, समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली.
 9. सध्या ते तंजावर येथील ३५०० मराठी हस्तलिखितांचे संशोधन करत आहेत. मधुकर रामदास जोशी यांना हा पुरस्कार लवकरच प्रदान करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.
 10. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
 11. यापूर्वी श्री. रा. चिं. ढेरे, डॉ.दादा महाराज मनमाडकर, श्री जगन्नाथ महाराज नाशिककर, श्री. रामकृष्ण महाराज लवितकर, डॉ. यू. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, श्री मारोती महाराज कुऱ्हेकर आणि डॉ.उषा देशमुख, ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते आणि डॉ.किसन महाराज साखरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 12. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमधील डॉ.प्रशांत सुरु, डॉ.सिसिलिया कार्व्हालो, भास्करराव आव्हाड या सदस्यांनी श्री मधुकर जोशी यांची निवड केली.


Amrita Fadnavis honored as World Peace Ambassador

 1. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना नुकतंच जागतिक शांतीदूत म्हणून सन्मानित करण्यात आलं.
 2. World Peacekeepers Movement चे संस्थापक डॉ. सर ह्यूज (Dr. Sir Hughes) यांच्यां हस्ते अमृता यांना हा सन्मान देण्यात आला. अमृता या मुख्यंत्र्यांच्या पत्नी असल्या तरीही सोशल वर्कर अशी त्यांची स्वतःची वेगळी ओळख देखील आहे.
 3. अमृता फडणवीस मागच्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सक्रिय आहेत.
 4. त्या सध्या जलसंधारण उपक्रमांवर काम करत आहेत. सर डॉ. ह्यूज यांनी जागतिक शांतीराजदूत म्हणून अमृता यांचा सत्कार केला आहे.
 5. The World Peacekeepers Movement (TWPM) ही एक ऑनलाइन चळवळ आहे. फेसबुकच्या माध्यमातून यात जगभरातील 2 लाखांहून जास्त सामाजिक कार्यकर्ते जोडले गेले आहेत.
 6. ही चळवळ कृतज्ञता, क्षमा, प्रेम, नम्रता, देणे, धैर्य आणि सत्य अशा 7 शांती मूल्यांवर आधारित आहे.
 7. अमृता फडणवीस यांना त्यांच्या सामिजिक कार्यासाठी हा सन्मान देण्यात आला.
 8. सामाजिक कार्य, मानवतेची सेवा आणि समाजात शांतता राखण्यासाठी केले गेलेले प्रयत्न याच्या आधारावर अमृता यांना जागतिक शांतीदूत म्हणून सन्मानित करण्यात आलं.
 9. त्यांना एक फ्रेम, सन्मानपत्र, एक पीस हॅपर आणि चांदीचा नाणे देण्यात आलं.


Indian Railways CORAS (Commando for Railway Security) launches

 1. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने भारतीय रेल्वेचे CORAS (कमांडो फॉर रेल्वे सिक्युरिटी) सुरू केले
 2. हे रेल्वे संरक्षण दलाचे ( RPF ) स्वतंत्र कमांडो युनिट आहे.
 3. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स (RPSF) च्या प्रवृत्त आणि इच्छुक तरुण कर्मचार्यांकडून हे तयार केले गेले आहे.
 4. कमांडो फॉर रेल्वे सिक्युरिटी (CORAS)
 5. कोरसचे व्हिजन स्टेटमेंट :-
  1. रेल्वे, रेल्वे / रेल्वेचे कामकाज, हल्ला / अपहरण / ओलीस ठेवणे, आपत्तीच्या घटनांशी संबंधित कोणत्याही परिस्थितीसाठी विशेष प्रतिसाद देणार्याची जागतिक पातळीवरील क्षमता विकसित करणे.
  2. श्रेणीबद्ध प्रतिसाद, कमीतकमी प्रभावी शक्ती या सिद्धांताचे पालन करून भारतीय रेल्वे आणि त्याच्या वापरकर्त्यांना फुल प्रू फ सुरक्षा प्रदान करणे.
 6. कोरस कमांडो :-
  1. कोरस कमांडोचे सरासरी वय - 30 ते 35 वर्षे असेल.
  2. हे कोरस कमांडो डाव्या विंग अतिवाद (एलडब्ल्यूई) / विद्रोह / दहशतवाद प्रभावित रेल्वे भागात पोस्ट केले जातील जिथे प्रवाशांना आणि रेल्वे नेटवर्कला सुरक्षा पुरविणे सर्वात प्राधान्य आहे.


Successful launch of Chandrayaan 2 into the Moon's orbit

 1. चांद्रयान २ हे चंद्राच्या कक्षेत पाठवण्यात मंगळवारी यश आले. या मोहिमेतील हा पहिला अवघड टप्पा असल्याने ही ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे. या महत्त्वाकांक्षी प्रयत्नात काळजाचे ठोके चुकण्याचाच अनुभव आला, असे इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 2. सकाळी ९ वाजून २ मिनिटांनी ही प्रक्रिया पूर्ण झाली. यानावरील द्रव इंधन इंजिने प्रज्वलित करून हे यान कक्षेत प्रस्थापित करण्यात आले, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने स्पष्ट केले.
 3. एकूण १७३८ सेकंदात यान चंद्राच्या कक्षेत नेण्यात यश आले. चांद्रयानाचे अलगद अवतरण करण्यात यश येईल, हा विश्वास के. शिवन यांनी व्यक्त केला.
 4. १४ ऑगस्टला हे यान चंद्राच्या दिशेने कक्षेकडे मार्गस्थ करण्यात यश आले. चांद्रयान २ ही इस्रोची दुसरी चांद्र मोहीम असून त्यात हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.
 5. चंद्राचा जन्म व उत्क्रांती तसेच त्याची स्थान शास्त्रीय व खनिज शास्त्रीय माहिती यात मिळणार असून अनेक प्रयोग अपेक्षित आहेत. चांद्रयान १ च्या मोहिमेत चंद्रावर पाण्याचे रेणू सापडले होते. त्याचा पाठपुरावा आताच्या मोहिमेत केला जाणार आहे.
 6. चांद्रयान २ मध्ये ऑर्बिटर, लँडर (विक्रम) व रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश आहे. या यानाचा कार्यकाल एक वर्ष असून चंद्रावरील एक दिवस हा भारताच्या १४ दिवसांबरोबर असतो.
 7. यानंतरचे सर्वच टप्पे यापेक्षाही महत्त्वाचे आहेत. चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० कि.मी. उंचीच्या कक्षेत हे यान यानंतर प्रस्थापित करण्यात येईल.
 8. त्यानंतर लँडर हे ऑर्बिटरपासून वेगळे होऊन १०० कि.मी. बाय ३० कि. मी. कक्षेत येईल. नंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ते ७ सप्टेंबरला अलगदपणे उतरेल.
 9. यापुढे त्याची कक्षा सुधारण्याचा प्रयत्न बुधवारी दुपारी १२.३० ते १.३० दरम्यान केला जाणार आहे.
 10. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे अनियंत्रित होऊन धडकू नये यासाठी चांद्रयान-२ चा वेग कमी करण्यात आला आहे.


Top