UN-IMO's 'World Migration Report (2018)' famous

 1. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतरण संघटना (IMO) द्वारा प्रसिद्ध केल्या गेलेल्या 'वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट (2018)' अनुसार, जगभरात सर्वाधिक संख्येने स्थलांतरण करण्यामध्ये भारतीय पुढे आहेत.
 2. 15.6 दशलक्षहून अधिक (जवळपास 6%) भारतीय परदेशात वास्तव्य करीत आहेत.
 3. 7.3 अब्ज जागतिक लोकसंख्येपैकी आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांमध्ये 2015 साली अंदाजे 244 दशलक्ष लोकांचा समावेश आहे.
 4. म्हणजेच प्रत्येक 30 व्यक्तींमध्ये 1 व्यक्ती स्थलांतरित होता. ही संख्या जागतिक लोकसंख्येच्या 2010 साली 3.2% आणि 2015 साली 3.3% स्थलांतरित होते.
 5. त्यामध्ये 52% पुरुष आहेत, 48% महिला आहेत.
 6. जगभरात प्राथमिक अवस्थेत अर्ध्याअधिक आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांचा जन्म आशिया आणि मुख्य रूपात भारत, चीन आणि अन्य दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये झाला.

ठळक बाबी:-

 1. जागतिक अंदाजानुसार आंतरिक स्थलांतर अधिक प्रचलित आहे आणि 2015 साली अंदाजे 740 दशलक्षहून अधिक लोकांनी आपल्या मूळ देशातच स्थलांतर केलेले आहे.
 2. गेल्या साडेचार दशकाच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांची संख्या वाढली आहे. 1990 दशकाच्या प्रारंभी मूळ देशातच जन्मलेल्या स्थलांतरितांची संख्या जवळपास 100 दशलक्ष होती तर हीच संख्या 2015 साली एकूण 244 दशलक्ष इतकी अंदाजित होती.
 3. 2015 साली बहुतेक आंतरराष्ट्रीय स्थलांतरित (सुमारे 72%) कामकरी (20 ते 64 वर्षे) वयोगटातील होते.
 4. 20 पेक्षा कमी वय असलेल्यांच्या बाबतीत सन 2000 आणि सन 2015 या काळात किंचित घट (17% ते 15%) झालेली आहे.
 5. 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटात ही संख्या स्थिर (जवळपास 12%) होती.
 6. 2015 साली युरोप आणि आशियामध्ये प्रत्येकी 75 दशलक्ष (62%) स्थलांतरित होते.
 7. त्यानंतर उत्तर अमेरिका (54 दशलक्ष, 22%), आफ्रिका (9%), लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन (4%) आणि ओशोनिया (3%) यांचा क्रमांक लागतो.
 8. प्रत्येक क्षेत्रातल्या लोकसंख्येच्या आकाराच्या तुलनेत 2015 साली आंतरराष्ट्रीय स्थलांतरित लोकांच्या बाबतीत ओशोनिया (एकूण लोकसंख्येच्या 21%), उत्तर अमेरिका (15%) आणि युरोप (10%) यामध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय स्थलांतरित होते.
 9. आशिया आणि आफ्रिका (प्रत्येकी 1.7%) आणि लॅटिन अमेरिका (1.5%) यामध्ये तुलनेने कमी होते.
 10. आशियात सन 2000 आणि सन 2015 या दरम्यानच्या काळात निवासी स्थलांतरित लोकसंख्येत 50% पेक्षा जास्त (जवळपास 25 दशलक्ष) वाढ होती.
 11. अमेरिका 1970 सालापासून आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांसाठी मुख्य गंतव्यस्थान आहे. तेव्हापासून देशामध्ये वास्तव्यास असलेली परदेशी जन्मलेल्या लोकांची संख्या ही जवळपास चौपट झाली आहे.
 12. 1970 साली 12 दशलक्ष तर 2015 साली 46.6 दशलक्ष इतकी आहे. त्यानंतर द्वितीय स्थानी 2015 साली 12 दशलक्षासह जर्मनीचा क्रमांक लागतो.
 13. 2015 साली जगभरातील सर्व आंतरराष्ट्रीय स्थलांतरित लोकांच्या जवळजवळ निम्मे लोक आशिया खंडात जन्माला आलेत,
 14. त्यामध्ये मुख्यतः भारतापासून (सर्वाधिक) आलेले आणि त्यानंतर चीन आणि अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तान यासारख्या इतर दक्षिण आशियाई देशातून आलेल्यांचा समावेश आहे.  
 15. मेक्सिको हे मूळचे दुसरे सर्वात मोठे राष्ट्र होते, त्यापाठोपाठ युरोपमधील अनेक देशांचा क्रमांक लागतो.
 16. देशांच्या उत्पन्नाच्या गटानुसार, 2015 साली आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांमध्ये जवळजवळ दोन तृतीयांश (सुमारे 157 दशलक्ष) उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये वास्तव्यास आहेत.
 17. तुलनेने मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये (एक तृतीयांश) 77 दशलक्ष आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांत 9 दशलक्ष होते.
 18. 2016 साली जगभरात 7,927 स्थलांतरित मरण पावलेत किंवा बेपत्ता झालेत, जे की 2015 सालच्या तुलनेत 26% अधिक होते.
 19. स्थलांतरित कामगारांमध्ये, 2013 च्या आकडेवारीवर आधारित स्थलांतरित कामगारांची संख्या अंदाजे 150.3 दशलक्ष होती. 2013 साली उच्च-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सर्वाधिक स्थलांतरित कामगार (अंदाजे 112.3 दशलक्ष / 75%) होते.
 20. 34.4 दशलक्ष (23%) स्थलांतरित कामगार मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आणि फक्त 2% कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होते.
 21. परदेशातून पाठवविलेल्या पैश्याला प्राप्त करणार्‍या देशांच्या बाबतीत 2016 साली  भारत, चीन, फिलीपीन्स, मेक्सिको आणि पाकिस्तान (उतरत्या क्रमाने) हे देश शीर्ष स्थानी होते.
 22. चीन आणि भारत या दोन्ही देशांनी प्रत्येकी USD 60 अब्ज हून अधिक प्राप्ती केली होती.
 23. 2016 साली सलग तिसर्‍या वर्षात टर्की जगात 2.9 दशलक्षसह सर्वाधिक निर्वासितांचे घर बनलेला आहे, प्रामुख्याने सिरियातून (2.8 दशलक्ष) आलेले. त्यानंतर पाकिस्तान आणि इराण यांचा क्रमांक लागतो.


The Bharatiya Janata Party won the assembly elections in Gujarat and Himachal Pradesh

 1. हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप/BJP) बहुमत प्राप्त केले आहे.
 2. हिमाचल प्रदेशामध्ये एकूण 68 जागांपैकी
  1. भाजप- 44 जागा,
  2. काँग्रेस -21
  3. उर्वरित-3  जागा अन्य पक्षांनी जिंकल्या.
 3. गुजरातमध्ये एकूण 182 जागांपैकी
  1. भाजप- 99 जागा,
  2. काँग्रेस - 77
  3. उर्वरित -6 जागा अन्य पक्षांनी जिंकल्या.

 

भारतातली विधानसभा निवडणुक
 1. ती निवडणूक ज्यामध्ये भारतीय मतदाता विधानसभा (किंवा विधिमंडळ / राज्य विधानसभा) मधील सदस्यांची निवड करतो.
 2. ही निवडणुक दर 5 वर्षांनी आयोजित केली जाते.
 3. विधानसभेच्या सदस्यांना आमदार (MLA) म्हणून संबोधले जाते.
 4. विधानसभा निवडणुका सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वर्षी घेतल्या जात नाहीत.
 5. विधानसभा निवडणुका या देशातील 29 राज्यांमध्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी 2 (दिल्ली आणि पुडुचेरी) मध्ये आयोजित केल्या जातात.

 


ZSI created a list of 157 harmful species for the first time

 1. भारतीय वनस्पती सर्वेक्षण (Botanical Survey of India -BSI) आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण (Zoological Survey of India -ZSI) नुकतेच एक सर्वेक्षण केले आहे.
 2. ज्यामध्ये असे आढळून आले आहे की जगभरातील जैवविविधतेस दुसर्‍या क्रमांकाचे मोठे संकट म्हणून उदयास आलेल्या परग्रहीसदृश्य अहितकारक प्रजातींची संख्या वेगाने वाढत आहे, ज्यात भारताचाही समावेश आहे.  
 3. हे लक्ष्य जपानमध्ये झालेल्या AICHI येथे स्वीकारण्यात आलेल्या 20 जैवविविधतेसंबंधी लक्ष्यांपैकी एक आहे. त्यानुसार अश्या प्रजातींचे मूळ आणि त्यांचा प्रवाह ओळख पटविण्यासाठी आणि प्राधान्य दिले जावे.
 4. प्राधान्य असलेल्या प्रजातींचे नियंत्रण व नाश केले पाहिजे, अश्या स्वीकृत बाबीसंबंधी मार्गदर्शके तयार केली जाणार आहेत.
 5. 2020 सालापर्यंत देशामधील या समस्येला हाताळण्यासाठी एक धोरण तयार करण्याच्या दृष्टीने BSI आणि ZSI एकत्र आले आहेत.
 6. शास्त्रज्ञांच्या अभ्यासाप्रमाणे, आतापर्यंत प्राण्यांच्या अहितकारक 157 प्रजाती ओळखल्या गेल्या आहेत, ज्यापैकी 99 प्रजाती पाण्यात आढळतात तर उर्वरित 58 जमिनीवर वास्तव्य करीत आहेत. 
 7. 31 विघातक कीटकांमुळे जल-पर्यावरण आणि शेतीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. 
 8. या यादीत सूक्ष्मजीवी प्रजातींचा समावेश नाही.
 9. जमिनीवर आणि गोड्या पाण्यात आढळणार्‍या 58 अहितकारक प्रजातींपैकी आर्थ्रोपॉड (एक कीटक वर्ग) च्या 31 प्रजाती, माश्यांच्या 19 प्रजाती, मोलूस्क (अंगावर कवच असलेल्या) आणि पक्ष्यांच्या तीन प्रजाती तर सरपटणार्‍या प्राण्याची एक आणि दोन सस्तन प्राणी ओळखल्या गेल्या आहेत.
 10. पार्थेनियम हिस्टेरोफोरस (कापूस गवत) आणि लान्तना कमेरा (लान्ताना) या वनस्पती प्रजाती कृषी आणि जैवविविधतेस हानी पोहचवतात.


Sindhu won the World Super Series title

 1. भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला दुबई वर्ल्ड सुपर सीरिजच्या उपविजेतेपदावर (रौप्यपदक) समाधान मानावे लागले.
 2. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीने सिंधूचा १५-२१, २१-१२, १९-२१ असा पराभव करत दुबई वर्ल्ड सुपर सीरीजचे जेतेपद पटकावले.
 3. या स्पर्धेच्या गट लढतीत सिंधूने यामागुचीवर सरळ गेममध्ये मात केली होती.
 4. त्यामुळे फायनलमध्येही सिंधू वरचढ ठरेल असा अंदाज होता.
 5. ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती सिंधूने यापूर्वी इंडिया ओपन सुपर सीरिज आणि कोरिया ओपन सुपर सीरिजच्या जेतेपदावर नाव कोरले होते.
 6. वर्ल्ड सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत जगातील अव्वल आठ बॅडमिंटनपटू भाग घेतात.
 7. ही स्पर्धा जिंकण्यात सिंधूला यश आले असते, तर ही मानाची व आव्हानात्मक स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली असती.
 8. सायना नेहवालने २०११मध्ये तर ज्वाला गुट्टा-व्ही डिजू या जोडीने २००९मध्ये या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती; पण त्यांनाही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
 9. विजेती :- अकाने यामागुची(जपान)
 10. उपविजेती:- पी वी सिंधू(भारत)


Jharkhand's former Chief Minister Madhu Koda has been sentenced to death for the coal scam 1

 1. कोळसा घोटाळ्यात दोषी ठरलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि २५ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
 2. त्यांच्याशिवाय माजी सचिव एच. सी. गुप्ता यांच्यासह आणखी चौघांनाही यात दोषी ठरवले होते.
 3. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कोळसा घोटाळ्यात अनियमित पद्धतीने खाण वाटप करण्याचा आरोप सिद्ध झाल्याने कोडा यांच्यासह इतर आरोपींना कट रचणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले होते.
मधू कोडा
 1. २००६ मध्ये कोडा यांनी झारखंडचे पाचवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मुख्यमंत्री होईपर्यंत ते अपक्ष आमदार होते.
 2. त्यांनी ऑल झारखंड स्टुडंट युनियनपासून राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही क्रियाशील होते.
 3. बाबुलाल मरांडी यांच्या सरकारमध्ये त्यांनी पंचायत राज मंत्रीपदाची सूत्रे स्विकारली होती.
 4. २००५च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढली होती आणि जिंकलेही होते.
 5. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहूमत मिळाले नसल्याने त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील अर्जुन मुंडा सरकारला समर्थन दिले होते.
 6. सप्टेंबर २००६मध्ये मधू कोडा यांच्यासहित अन्य ३ अपक्ष आमदारांनी मुंडा सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि त्यामुळे अल्पमतात आलेले भाजपा सरकार पडले. यानंतर युपीएने त्यांना मुख्यमंत्रीपद देत आपले सरकार स्थापन केले होते. 
 7. याआधी निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाची योग्य माहिती न दिल्याने मधू कोडा यांच्यावर तीन वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे.


Top