Asma Jahangir 'posthumous' prestigious human rights award'

 1. संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानची प्रख्यात कार्यकर्ता असमा जहांगीर यांना मरणोत्तर प्रतिष्ठित मानवाधिकार पुरस्कार देऊन सन्मानित केले. 
 2. संयुक्त राष्ट्र संघाने ऑक्टोबर महिन्यात असमा जहांगीर यांना हा पुरस्कार देण्याची घोषणा केली होती.
 3. मंगळवारी त्यांची मुलगी मुनीजा जहांगीर यांनी एका विशेष समारोहात संयुक्त राष्ट्र महासभाची अध्यक्ष मारिया फर्नेंडा एस्पिनोसाकडून हा पुरस्कार स्विकारला.
 4. मानवाधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात येतो.
 5. हा पुरस्कार आतापर्यंत मार्टिव लूथर किंग, नेल्सन मंडेला आमि जिमी कार्टक सारख्या महान व्यक्तींना देण्यात आला आहे. 
 6. आता या यादीत असमा जहांगीर यांचे नाव देखील जोडले गेले आहे. असमा जहांगीर त्या मोजक्याच कार्यकर्त्यांपैकी आहेत, ज्यांनी हुकूमशाही पाकिस्तानी सरकारच्या अन्यायाविरूध्द आवाज उठवला. त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या हुकूमशाहीचा देखील विरोध केला. 
 7. यावर्षी 11 फेब्रुवारीला त्यांचे निधन झाले.


PETA India nominated actress Sonam Kapoor as the 'Person of the Year' of 2018

 1. सोनम कपूर हिला पीपल्स फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्झ (PETA) इंडियाने 2018 वर्षाची 'पर्सन ऑफ दी ईयर' म्हणून नामांकित केले आहे.
 2. PETA इंडिया असोसिएटचे संचालक सचिन बांगेरा यांनी दिलेल्या व्यक्तव्यात म्हटले आहे की, ती प्राण्यांना दुःखग्रस्त न करता शाकाहारी जेवणांचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या चाहत्यांना प्राण्यांना दुःख देण्यापासून रोखण्यासाठी नेहमी विनंती करते, यात ती कधीही संकोच करत नाही.
 3. अलिकडेच दिल्लीचे मंत्री इमरान हुसैन यांना पेटा 'हीरो टू अॅनिमल' पुरस्कारापे सन्मानित केले आहे.
 4. PETA इंडियाच्या पर्सन ऑफ द ईयर पुरस्काराच्या मागील प्राप्तकर्त्यांमध्ये अनुष्का शर्मा, सनी लियोनी, शशी थरूर, माजी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश के एस पनिकर राधाकृष्णन, कपिल शर्मा, हेमा मालिनी, आर. माधवन आणि जॅकलीन फर्नांडिस यांचा समावेश आहे.


Russia's 'Academic Lomonosov': The world's first water wave floating nuclear reactor

 1. रशियाने प्रथमच एक तरंगते अणुऊर्जा निर्मिती केंद्र एका जहाजावर उभे केले आहे आणि ही जगातली पहिली पाण्यावर तरंगत असलेली अणुभट्टी आहे.
 2. या तरंगत्या अणुभट्टीला ‘अॅकेडेमिक लोमोनोसोव्ह’ हे नाव देण्यात आले आहे. ही अभिनव संकल्पना रशियाच्या ‘रोसेटोम’ या अणुऊर्जा कंपनीने साकारली आहे.
 3. याची उभारणी सेंट पीटर्सबर्गमध्ये केली गेली.
 4. या अणुऊर्जा संयंत्राचा आकार 144 मीटर x 30 मीटर असा असून हा 21,000 टन वजनी आहे.
 5. यामध्ये प्रत्येकी 35 मेगावॉट क्षमतेचे दोन रिएक्टर आहेत, जे 2 लक्ष लोकसंख्या असलेल्या शहराला वीज पुरवठा करण्यास सक्षम आहेत.
 6. यामुळे दुर्गम भागात वायू व तेल उत्खनन मंचांना वीज दिली जाऊ शकणार.
 7. याच्या मदतीने वर्षाला 50 हजार टन कार्बन-डायऑक्साइडचे उत्सर्जन टाळले जाऊ शकते.


Top