रेल्वेकडून ‘रेल सारथी’ (Rail Saarthi) मोबाईल अॅप लॉंच

 1. रेल्वे प्रवाशांचा समस्या किंवा अडचणी दूर करण्यासाठी रेल्वेकडून ‘रेल सारथी’ (Rail Saarthi) मोबाईल अॅप रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते  लॉंच करण्यात आले.
 2. याआधी एखाद्या प्रवाशाला रेल्वेसंबंधी तक्रार करायची असल्यास अनेक अडचणी येत होत्या.
 3. तसेच, तक्रार केल्यानंतर काय कारवाई होते, यासंदर्भात प्रश्न उपस्थित होत होते.
 4. मात्र आता रेल सारथी या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांच्या रेल्वे प्रवासासंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकणार आहे.
 5. या मोबाईल अॅपवरुन रेल्वे तिकीट, प्लॅटफॉर्म तिकिट बुकींगही करता येणार आहे. तसेच या अॅपच्या माध्यमातून विमानाचे तिकीटही बुक करता येणार आहे.
 6. प्रवासादरम्यान खाद्यपदार्थांची ऑर्डर, रेल्वेचे टाईम टेबल आणि विशेष म्हणजे रेल्वेचे लोकेशन सुद्धा या अॅपमधून पाहता येणार आहे.
 7. रेल्वेच्या आगमन आणि प्रस्थानाची वेळ, प्लॅटफॉर्म नंबर, ट्रेनला होणारा उशीर, रद्द गाड्या, आसन व्यवस्था यांची माहितीही मिळणार आहे.
 8. त्याचबरोबर या अॅपमध्ये महिला सुरक्षा, तक्रार आणि सूचना नोंदवण्याचीही सोय आहे.
 9. यासोबतच या अॅपवरून टॅक्सी, पोर्टस सर्व्हिस, रिटायरिंग रूम हॉटेल, टूर पॅकेज, ई कॅटरिंग आदींचे बुकिंग करता येणार आहे.
 10. भारतीय रेल्वे या सेवा, संबंधित आस्थापनांशी मिळकत वाटणीच्या मॉडेलच्या आधारावर उपलब्ध करून देईल.
 11. त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून रेल्वेला दरवर्षी किमान १०० कोटी रुपयांची कमाई होण्याची शक्यता आहे.

एसी कोचमध्ये दिव्यांगांना आरक्षण:-

 1. प्रभू यांनी थर्ड एसी कोचमध्ये दिव्यांगांसाठी आरक्षणाचीही सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
 2. आता थर्ड एसी कोचमध्ये दिव्यांगांसाठी लोअर बर्थ आरक्षित राहणार आहे. तर दिव्यांगासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मधली बर्थ आरक्षित राहणार आहे.
 3. मात्र, एका थर्ड एसी कोचमध्ये एकच लोअर बर्थ दिव्यांगांसाठी आरक्षित असणार आहे.
 4. आजवर केवळ स्लिपर क्लासमध्येच दिव्यांगांसाठी दोन बर्थ आरक्षित करण्याची सोय होती.
 5. याशिवाय परदेशी नागरिकांना अॅडव्हांस बुकींगच्या सुविधेला १२० दिवसांवरून वाढवून ३६५ दिवस करण्यात आली आहे.


गडचिरोलीत हिवताप नियंत्रणासाठी कार्यगट स्थापन

गडचिरोली जिल्हय़ातील हिवतापाचा प्रकोप नियंत्रणात आणण्यासाठी सर्च फाऊंडेशनचे संस्थापक महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट (टास्क फोर्स) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 1. राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग,
 2. सर्च फाऊंडेशन,
 3. नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ, जबलपूर
 4. टाटा ट्रस्ट

यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यगट स्थापन करण्यात येणार आहे.

 1. गडचिरोलीत अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा अजूनही पोहोचलेली नाही. त्यामुळे या जिल्ह्यात दरवर्षी हिवतापाने असंख्य आदिवासी मृत्युमुखी पडतात.
 2. शासनाच्या या मंजुरीनुसार एकूण नऊ सदस्यीय कार्यगटाच्या अध्यक्षपदी डॉ. अभय बंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यगटाचे सदस्य:-

 1. अध्यक्ष: डॉ. अभय बंग
 2. सहअध्यक्ष: आरोग्य सेवा संचालनालयचे (मुंबई) संचालक
 3. माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे
 4. राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संस्थेचे (जबलपूर) संचालक
 5. टाटा ट्रस्ट रुग्णालयचे (मुंबई) प्रतिनिधी
 6. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमचे (नवी दिल्ली) तज्ञ प्रतिनिधी
 7. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (पुणे) कीटकशास्त्रज्ञ
 8. महाराष्ट्राचे राष्ट्रीय आरोग्य अभियानचे प्रतिनिधी
 9. पुण्याचे आरोग्य सेवा सहसंचालक

कार्यगटाची कार्य व उद्दिष्टे:-

 1. हिवताप नियंत्रण जिल्ह्यातील हिवताप परिस्थितीचा अभ्यास करणे.
 2. हिवताप परिस्थितीचे विश्लेषण करून वाढीची कारणे शोधणे.
 3. त्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना करणे.
 4. कीटकनाशकांची फवारणी, मच्छरदाणी, आवश्यक मनुष्यबळ या बाबींचे सुयोग्य व्यवस्थापन करणे.
 5. स्थानिक भाषेतून प्रभावी आरोग्य शिक्षण देण्यासाठी कृती योजना आखणे.
 6. औषधांच्या तसेच कीटकनाशकांच्या प्रतिरोधाचा अभ्यास करणे.
 7. शेजारील राज्यातील हिवताप परिस्थितीचा तुलनात्मक अभ्यास करून त्या अनुषंगाने आंतरराज्य सभेचे आयोजन करणे.
 8. गडचिरोली जिल्ह्यातील हिवताप रुग्णांचे प्रमाण तीन वर्षांमध्ये कमीत कमी राहील यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे.


महाराष्ट्र राज्य मुक्त शालेय शिक्षण मंडळ योजना

 1. महाराष्ट्र राज्य मुक्त शालेय शिक्षण मंडळ स्थापन करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता दिली आहे.
 2. शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्यांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
 3. पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीच्या परीक्षांना समकक्ष परीक्षा या मंडळातर्फे घेतल्या जातील. हे प्रस्तावित मंडळ राज्य मंडळाचा भाग राहणार आहे.
 4. शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचे व्यवसायिक कौशल्य, व्यवहारिक ज्ञान, गरजा यांचा वेगळा विचार सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत नाही.
 5. त्यामुळे या योजनेद्वारे मुक्त विद्यालयासाठी प्रवेशाच्या पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीसाठी स्वतंत्र पात्रता ठरविण्यात आल्या आहेत.
 6. यामुळे कला, क्रिडा क्षेत्रात रस असणाऱ्या व करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता केवळ दहावी व बारावीमध्ये अशा विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊन मुक्त विद्यालयाची परीक्षा देता येणार आहे.
 7. या योजनेसाठी राज्य पातळीवर शिक्षण संचालक दर्जाचा अधिकारी प्रमुख राहणार आहे.
 8. इतर अधिकारी व कर्मचारी हे प्रतिनियुक्ती अथवा कंत्राटी तत्वावर नेमण्याचा अधिकार राज्य मंडळास शासन मान्यतेने राहणार आहे.

योजनेची उद्दिष्टे:-

 1. औपचारिक शिक्षणाला पूरक व समांतर शिक्षण पद्धती.
 2. शालेय शिक्षणातील गळती रोखणे.
 3. प्रौढ व्यक्ती, गृहिणी, कामगार आदी सर्वांना शिक्षणाच्या संधी उपल्ब्ध.
 4. व्यवसायाभिमुख शिक्षण देणे,
 5. स्थानिक स्तरावर शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे.
 6. दिव्यांग विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी शिक्षणाची सुविधा.

योजनेची वैशिष्टये:-

 1. सोयीनुसार अध्ययनाची सवलत.
 2. अभ्यासक्रमाची लवचिकता.
 3. व्यवसायिक विषयांची उपलब्धता.
 4. संचित मुल्यांकनाची व्यवस्था.
 5. सर्वांना शिक्षणाची व्यवस्था.
 6. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था.


डॉ. मुरली बनावत यांना ब्रिक्सचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार

 1. सौरऊर्जेच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे तेलंगणचे वैज्ञानिक डॉ. मुरली बनावत यांना ब्रिक्स देशांचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर झाला आहे.
 2. हैदराबाद विद्यापीठात रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी सौरऊर्जेवर संशोधन केले आहे.
 3. मूळचे तेलंगणातील निझामाबाद जिल्ह्यातील असलेल्या बनावत यांनी फोटोव्होल्टॅइक सोलर सेलवर (प्रकाशीय सौर विद्युतघट) संशोधन केले आहे.
 4. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून बीएस्सी तर हैदराबाद विद्यापीठातून एमएस्सी पदवी घेतली.
 5. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेतून फोटोव्होल्टॅइक सेलवर पीएचडी केली.
 6. त्यांचे शोधनिबंध अनेक नामांकित नियतकालिकांत प्रसिद्ध झाले असून फ्रंटियर्स इन ऑप्टिक्स अँड फोटॉनिक्स, फ्रंटिटर इन फिजिक्स या नियतकालिकांचे ते संपादकही आहेत.
 7. त्यांनी काही काळ सौदी अरेबियातील किंग अब्दुल्ला युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत संशोधन करताना सौरऊर्जा साठवण्यासाठी नवीन रासायनिक घटकांचा शोध घेतला आहे.
 8. फोटोव्होल्टॅइक सेलसाठी सेंद्रिय व पेरोव्हस्काइट पदार्थ किफायतशीर ठरतात, ही गोष्ट त्यांनी प्रथम प्रयोगानिशी दाखवून दिली.
 9. सौरऊर्जा हा प्रदूषणविरहित स्रोत असला, तरी त्याच्या साठवणुकीत असलेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
 10. त्यासाठी पेरोव्हस्काइटचा वापर केलेले स्वस्त व वापरण्यास सोपे विद्युत घट त्यांनी तयार केले आहेत.
 11. सौरऊर्जा साठवणीसाठी नवनवीन रासायनिक पदार्थ विकसित करण्यात त्यांच्या संशोधनाचा मोठा वाटा आहे.
 12. सौरघटाच्या निर्मितीत डॉ. मुरली यांनी मोठे काम केले असून त्याचा फायदा केवळ भारतालाच नव्हे तर ब्रिक्स देशांनाही होणार आहे.


भारताच्या सुंदरसिंह गुर्जरला सुवर्णपदक

 1. लंडन येथे सुरु असलेल्या आंतराष्ट्रीय पॅरा-अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सुंदरसिंह गुर्जरने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
 2. भालाफेक प्रकारात सुंदरने ६०.३६ मीटर लांब भाला फेकत श्रीलंकेच्या दिनेश प्रियंथाला मागे टाकत ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
 3. राजस्थानच्या २१ वर्षीय सुंदर सिंगला गेल्यावर्षी रिओ पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत उशिरा पोहचल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले होते.
 4. सुंदरने यापूर्वी फेझा आयपीसी ऍथलेटिक्स ग्रा प्रि स्पर्धेत भालाफेक, गोळाफेक आणि थाळीफेक या प्रकारात तीन सुवर्णपदके मिळविली होती.


Top

Whoops, looks like something went wrong.