chalu ghadamodi, current affairs

1. भारतीय सेनेने राजस्थानातील पोखरण फायरींग रेंजवर स्वदेशी बनावटीच्या तिसऱ्या पिढीतील एंटी – टँक गाइडेड मिसाइल (एटीजीएम) ‘नाग’ चे परीक्षण यशस्वीरित्या पुर्ण केले.

2. तर हे परीक्षण 7 ते 18 जुलै दरम्यान करण्यात आले. नाग ही तिसऱ्या पिढीची रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा आहे.

3. तसेच या क्षेपणास्त्राची निर्मितीचे कार्य या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होईल. आतापर्यंत याची चाचणी सुरू होती. 2018 मध्ये या क्षेपणास्त्राची हिवाळी चाचणी घेण्यात आली होती.

4. भारतीय सेना 8 हजार नाग क्षेपणास्त्रांची खरेदी करू शकते, ज्यापैकी सुरूवातीस 500 क्षेपणास्त्रांची ऑर्डर दिली जाण्याची शक्यता आहे. या क्षेपणास्त्राची निर्मिती भारतात क्षेपणास्त्र तयार करणारी एकमेव सरकारी कंपनी भारत डायनामिक्स लिमिटेड करणार आहे.


chalu ghadamodi, current affairs

1. मध्य प्रदेशमधील खारगाव जिल्ह्यातल्या ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने जर्मनीत सुरू असलेल्या कनिष्ठ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

2. तसेच 18 वर्षीय ऐश्वर्यने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात 459.3 गुणांच्या कमाईसह सुवर्णपदक नावावर केले. या कामगिरी सह त्यानं कनिष्ठ गटातील विश्वविक्रमही नावावर केला.

3. तर या स्पर्धेत भारताचे हे दहावे सुवर्णपदक ठरले. भारतीय संघ 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 4 कांस्यपदक अशा एकूण 23 पदकांसह अव्वल स्थानावर आहे.

4. या स्पर्धेत हंगेरीच्या पेक्लर झलानने 454.8 गुणांसह रौप्य, तर चीनच्या चँगहाँग झँगने 442.8 गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. ऐश्वर्यने यापूर्वी 2019च्याच आशिआई अजिंक्यपद स्पर्धेतील कनिष्ठ गटात कांस्यपदक जिंकले होते.


chalu ghadamodi, current affairs

1. ब्रिटनमधील ‘योगोव्ह’ या अंतरराष्ट्रीय मार्केट रिसर्च आणि डेटा अनलिसीस करणाऱ्या कंपनीने जगभरातील आदर्श घ्यावा अशा व्यक्तींची यादी तयार केली आहे.

2. तर मागील वर्षीप्रमाणे यंदाही या यादीमध्ये मायकोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे पहिल्या स्थानी कायम आहेत.

3. मात्र या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बढती मिळली आहे. मागच्या वर्षी या यादीत आठव्या क्रमांकावर असणारे मोदी यंदा सहाव्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे मोदी यांनी या यादीत पोर्तुगालचा लोकप्रिय फुटबॉलपटू आणि इटलीच्या युवेंटसचा मुख्य खेळाडू असणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही मागे टाकले आहे.

4. तसेच जगभरातील लोक कोणाला आपला आदर्श मानतात यासंदर्भात ‘योगोव्ह’ने यंदा 41 देशांमधील नागरिकांची मते जाणून घेतली. या सर्वेक्षणामध्ये 42 हजारहून अधिक जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर जगातील सर्वात प्रभावशाली 20 पुरुष आणि 20 महिलांची यादी तयार करण्यात आली.


chalu ghadamodi, current affairs

1. लंडन स्थित कन्सल्टन्सी ब्रँड फायनान्सच्या वार्षिक अहवालानुसार "ब्रँड फायनान्स इंडिया १००"
2019 मध्ये दुस-या सरळ वर्षात टाटा "भारताचा सर्वात मौल्यवान ब्रँड बनला आहे. ब्रँड मूल्य 19.6 अब्ज डॉलर्स आहे.
2. त्यानंतर
एलआयसी 7.3 बिलियन डॉलर्ससह (लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन) दुसऱ्या क्रमांकावर आणि इन्फोसिस 6.5 बिलियनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
3. ऑटो, आयटी सेवा, स्टील आणि रसायनांमध्ये टाटा ग्रुपचा ब्रँड उपस्थित आहे. ब्रॅन्ड फायनान्स 'रॉयल्टी रिलीफ अॅक्चिट अंदाजे' रॉयल्टी रेटवर आधारीत ब्रँडला श्रेयस्कर भविष्यातील विक्रीच्या आधारावर ब्रँड्सच्या मूल्याची गणना करते. हे त्याच्या सामर्थ्य आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यांसह कार्यप्रदर्शन यावर आधारित ब्रँड्स देखील क्रमवारी लावते.


chalu ghadamodi, current affairs

1. 2030 च्या जागतिक मुदतीच्या विरोधात क्षय रोग (टीबी) नष्ट करण्यासाठी भारताने 2025 ची अंतिम मुदत निश्चित केली आहे.रोग निर्मूलन करणे ही सरकारची मुख्य उद्दीष्टे आहे.
2. 2025 पर्यंत भारतातून टीबीचे उच्चाटन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संरक्षण, रेल्वे आणि आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक चिकित्सा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी
(आयुष) मंत्रालयांबरोबर एका करारावर स्वाक्षरी केली.
3. क्षयरोग हा गंभीर संक्रामक रोग आहे जो मुख्यत्वे फुफुसावर प्रभाव पाडतो.खोकला आणि शिंकांमुळे वायुमध्ये सोडल्या जाणार्या लहान थेंबांमुळे क्षयरोगाचा त्रास होणारा जीवाणू एका व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीपर्यंत पसरतो.


chalu ghadamodi, current affairs

1. 20 जुलै हा ‘आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन‘ आहे.

2. सन 1828 या वर्षी मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.

3. बडोद्याचे महाराज सर सायाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने सन 1908 मध्ये बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली.

4. सन 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिला मानव ठरले.


Top

Whoops, looks like something went wrong.