"Friends Power-6": Combined Military Practice of India and Sri Lanka

 1. भारत आणि श्रीलंका यांचा ‘मित्र शक्ती-6” हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जाणार आहे.
 2. 2018-19 या वर्षासाठी 26 मार्च ते 8 एप्रिल या काळात श्रीलंकेत हा संयुक्त लष्करी सराव होणार आहे.
 3. दोन्ही देशाच्या लष्करांच्या दरम्यान लष्करी संबंध आणि देवाणघेवाण यांचा एक भाग म्हणून दरवर्षी ‘मित्र शक्ती’ लष्करी सराव दरवर्षी आयोजित केला जातो.
 4. दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आहे.
 5. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आदेशानुसार आंतरराष्ट्रीय घुसखोरीला आळा घालण्यासाठी तसेच दहशतवादाचा सामना करण्यासाठी डावपेचात्मक कारवाईचा यात समावेश असेल.
 6. श्रीलंका हा हिंद महासागरातला भारताच्या दक्षिणेकडे असणारा एक बेटराष्ट्र आहे.
 7. कोलंबो ही देशाची राजधानी असून श्रीलंकाई रुपया हे त्याचे राष्ट्रीय चलन आहे.


Steel Ministry's 'Dakshata Council' was concluded in Delhi

 1. दिनांक 20 मार्च 2019 रोजी नवी दिल्लीत भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाने आयोजित केलेली ‘दक्षता परिषद’ पार पडली. 
 2. अधिग्रहण, करार, कर्मचारी आणि वित्त यासह विविध कार्यांच्या संबंधित महत्त्वाचे प्रशासकीय आणि व्यवसायिक निर्णय घेताना अनुसरण केली जाणारी मूलभूत तत्त्वे आणि प्रक्रियांच्या बाबतीत पोलाद निर्मिती क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक उपक्रमांच्या अधिकार्‍यांना संवेदनशील बनविण्याचा या परिषदेचा उद्देश होता.
 3. परिषदेत दक्षतेसंबंधी खालील मुद्द्यांवर चर्चा:-
  1. मूलभूत मुद्दे,
  2. सार्वजनिक खरेदीसंबंधी नियम आणि नियमांचे पालन करणे,
  3. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता,
  4. इलेक्ट्रॉनिक खरेदी,
  5. GeM,
  6. GFR,
  7. इलेक्ट्रॉनिक लिलाव,
  8. शासनातली नैतिकता,
  9. तक्रारीसंबंधी हाताळणी प्रणाली
  10. आणि इतर बाबी अश्या मूलभूत मुद्द्यांवर चर्चा झाली.


"Sara-Arka-ANTIRY TERR 2019": SCO Anti-Terrorism Practice

 1. यावर्षी “सारी-अरका-अॅंटी टेरर 2019” या शीर्षकाखाली शांघाय सहकार संघटना (SCO) याचा दहशतवाद-विरोधी सराव आयोजित केला जाणार आहे.
 2. उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात रशियाच्या नेतृत्वात SCO समुहाच्या ‘रिजनल अॅंटी-टेररीस्ट स्ट्रक्चर’ (RATS) परिषदेच्या 34 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 3. याशिवाय बैठकीत "सॉलिडटरी 2019-2021" या नावाने संयुक्त सीमावर्ती कार्यक्रमाचा प्रथम टप्पा आयोजित करण्याविषयीची योजना जाहीर करण्यात आली.
 4. शांघाय सहकार संघटना (SCO):-
  1. शांघाय सहकार संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याची 2001 साली स्थापना झाली.
  2. त्याचे बिजींग (चीन) येथे मुख्यालय आहे.
  3. चीन SCO चा संस्थापक देश आहे. भारत 2017 साली समुहाचा पूर्ण सदस्य बनला. वर्तमानात रशियाकडे समूहाचे अध्यक्षपद आहे.
  4. समूहामध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे.


Government has a special privilege to plan: Supreme Court

 1. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामध्ये न्यायालयाने स्पष्ट केले की, योजना आखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे विशेषाधिकार आहे आणि न्यायालयांनी देशाच्या प्रशासनात लक्ष घालू नये.
 2. चार धाम यात्रेच्या यात्रेकरूंसाठी रस्त्यांच्या बांधकामांमध्ये सीमा रस्ते संघटना (BRO) याद्वारे कामावर ठेवण्यात आलेल्या शेकडो औपचारिक कामगारांना नियमित करण्यासाठी योजना तयार करण्यासाठी उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर न्यायमूर्ती ए. एम. सप्रे यांच्या नेतृत्वातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने टीका केली.
 3. या प्रकरणाची पार्श्वभूमी:-
  1. संविधानाच्या ‘अनुच्छेद क्र. 226’ याच्या अंतर्गत प्राप्त शक्तीचा वापर करून उच्च न्यायालय योग्य योजना तयार करण्याविषयी सरकारला मार्गदर्शन करू शकते.
  2. या शक्तीचा वापर करून उत्तराखंड उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मार्गदर्शित केले होते.


Japanese space probe Hayabusa 2: Touchdown on asteroid Ryugu

 1. ‘हायाबुसा-2’ हे JAXA या जपानी अंतराळ संस्थेद्वारे संचालित केले जाणारे अंतराळयान आहे.
 2. ‘हायाबुसा-2’ यान 3 डिसेंबर 2014 रोजी अंतराळात पाठविण्यात आले. हे यान दीड वर्षाच्या कालावधीसाठी लघुग्रहाच्या निरीक्षणासाठी पाठवले होते.
 3. या अंतराळयानावर असलेले 'रोव्हर' ‘Ryugu’ या नावाच्या अशनीवर उतरविण्यात आले.
 4. अशनीवर यान उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. लघुग्रहाच्या पृष्ठभागाची तपासणी करण्याच्या उद्देशाने हे यान पाठविण्यात आले आहे.
 5. लघुग्रहावरील माती आणि खडकाचे नमुने गोळा केले. लघुग्रहाच्या पृष्ठभागावरील एका विवरात स्फोट घडवून आणि त्यातून माती आणि खडकाचे नमुने गोळा केले गेले.
 6. अशनी :-
  1. सौरमालेची निर्मिती होत असताना जे काही उरले ते म्हणजे अशनी आणि उल्का होय.
  2. ‘Ryugu’ हा अगदी प्राथमिक अशनी आहे.
  3. या अशनीचा अभ्यास केल्याने ग्रहांच्या निर्मितीबाबत माहिती मिळू शकते. त्याला स्वतःच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी साडेसात तास लागतात.


Top