The central government's decision to hang the culprits under the age of 12 is a major decision

 1. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे.
 2. अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॉक्सो कायद्यात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
 3. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे.
 4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून पॉक्सो कायद्यात बदल करण्याबाबत अध्यादेश मंजूर करण्यात आला आहे.
 5. केंद्र सरकारने 12 वर्षांखालील मुलींवरील बलात्कारातील दोषींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी पॉक्सो कायद्यात बदल करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.
 6. अल्पवयीन मुलींवरील बलात्कारासंदर्भातील याचिका सुनावणीला आली असता, केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, पुढील सुनावणी 27 एप्रिलला होणार आहे.
 7. कथुआतील मुलीवर झालेला बलात्कार व तिची हत्या यामुळे देशात संतापाचे वातावरण असतानाच उत्तर प्रदेश व उत्तराखंडातही तशाच घटना घडल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण आहे.
 8. विरोधी पक्षांनी केंद्रावर टीकेची झोड उठवली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लंडनमध्ये या घटनांचा निषेध केला होता.
 9. अमेरिका व इंग्लंडमध्ये या घटनांच्या विरोधात निदर्शनेही झाली.
 10. महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनीही पॉक्सो कायद्यातील बदलांचे संकेत दिले होते. अशा प्रकरणातील दोषींना फाशीच मिळायला हवी, असे आपले म्हणणे आहे, असे त्या म्हणाल्या होता.


 Google company's AR based microscope for diagnosis of cancer

 1. गूगल कंपनीच्या संशोधकांकडून प्रत्यक्ष वेळेत कर्करोगाच्या निदानासाठी मशीन लर्निंग (ML) आणि ऑगमेंटेड रिअलिटी (AR) तंत्रज्ञानावर आधारित एक सूक्ष्मदर्शकयंत्र विकसित केले गेले आहे.
 2. एका प्रयोगात या उपकरणाचा वापर करून दोन वेगवेगळ्या कर्करोगांचे निदान यशस्वीपणे केले गेले आहे.
 3. उपकरणाचे महत्त्व:-
  1. जगभरातील प्रयोगशाळा तज्ञांसाठी गहन शिक्षण घेण्याकरिता हे एक साधन म्हणून अवलंबता येईल.
  2. नेत्ररोग, त्वचा, किरणोत्सर्गी आणि वैद्यकीय प्रयोगशाळा यांसारख्या वैद्यकीय विषयांमध्ये सखोल शिक्षण घेण्यास हे साधन उपयुक्त ठरणार आहे.
  3. वर्तमानात असे कोणतेही उपकरण नाही, ज्याने सूक्ष्मदर्शी ऊतकांचे डिजिटल स्वरूप दर्शवता येऊ शकते. हा अभ्यासातला एक सर्वात मोठा अडथळा आहे.
  4. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कर्करोगाने ग्रस्त ऊतकांना रेखांकीत केले जाऊ शकते, ज्याने कमी वेळात रोगाचे मूळ समजून घेण्यास आणि त्यावर उपचार चालविण्यास चिकित्सकांना मदत होऊ शकणार आहे.
वैशिष्ट्ये
 1. उपकरणामध्ये सुधारित असे प्रकाशावर आधारित सूक्ष्मदर्शकयंत्र (light microscope) आहे. याच्या माध्यमातून मशीन लर्निंग (ML) अल्गोरिदमच्या मदतीने प्रत्यक्ष वेळेत दृश्यांचे विश्लेषण केले जाऊ शकते आणि लगेच परिणाम मिळते.
 2. तत्त्वतः, हे सूक्ष्मदर्शकयंत्र रेखांकीत आणि दृश्य स्वरुपात विविध प्रकारे  दृकश्राव्य अभिप्राय देऊ शकते आणि शोध, वर्गीकरण आणि प्रमाण अश्या प्रकारच्या विविध अडथळ्यांसाठी विविध प्रकारचे मशीन लर्निंग अल्गोरिदम चालविण्यास सक्षम आहे.
 3. सूक्ष्मदर्शकयंत्रासाठी तयार करण्यात आलेले "टेन्सर फ्लो" सॉफ्टवेअर या व्यासपीठावर चालविण्यासाठी पूर्व-प्रशिक्षित आदर्श यंत्रणेच्या विस्तृत श्रेणीच्या प्रवेशास अनुमती देते.


 RTI law recommends RTI Act

 1. विधी आयोगाने भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) याला त्याच्या घटनात्मक सदस्य क्रिकेट संघांसह महितीचा अधिकार (RTI) या कायद्याच्या कार्यक्षेत्रात आणण्याची शिफारस केंद्र शासनाकडे केली आहे.
 2. विधि आयोगाच्या अहवालानुसार, BCCI ला घटनेच्या कलम 12 अंतर्गत ‘शासन’ संबंधी व्याख्येच्या अंतर्गत आणले पाहिजे, कारण तनावग्रस्त आंतरराष्ट्रीय संबंधांच्या परिस्थितीत BCCI ला केंद्र शासनाकडून परवानगी घ्यावी लागते.
 3. शिवाय केंद्राकडून विविध सुविधा आणि लाभ दिले जातात.
 4. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI):-
  1. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI)ची तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत डिसेंबर 1928 मध्ये स्थापना करण्यात आली.
  2. याचे मुख्यालय महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आहे.
 5. माहितीचा अधिकार (Right to Information -RTI):-
  1. हा भारतीय संसदेचा एक अधिनियम आहे, ज्याचा वापर करून नागरीकांसाठी माहितीच्या अधिकाराच्या व्यावहारिक नियमांची अंमलबजावणी केली जाते.
  2. हा कायदा पूर्वीच्या ‘माहितीचे स्वातंत्र्य (Freedom of information) अधिनियम-2002’ याच्या जागी आणला गेला.
  3. संपूर्ण प्रभावाने 12 ऑक्टोबर 2005 रोजी हा कायदा लागू झाला.


Beed in the country's top crop insurance scheme

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम. डी. सिंह आणि जिल्हा कृषी अधीक्षक एम. एल. चपळे यांचा दिल्लीतील विज्ञान भवनात सन्मान केला जाणार आहे.
 2. शेतकऱ्यांचा पीक विमा भरुन घेण्यात बीड जिल्हा प्रशासनाने देशात अव्वल क्रमांक मिळवला आहे.
 3. याची दखल केंद्र सरकारने घेतली असून 21 एप्रिल रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम. डी. सिंह आणि जिल्हा कृषी अधीक्षक एम. एल. चपळे यांचा दिल्लीतील विज्ञान भवनात सन्मान केला जाणार आहे.
 4. या स्पर्धेमध्ये देशातील तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आली. यामध्ये बीड, नांदेड आणि तमिळनाडू येथील शिवगंगा जिल्ह्यांचा समावेश आहे.
 5. 2016-14 आणि 2017-18 मध्ये सर्वाधिक विमा बीड जिल्ह्याने भरला होता आणि त्याचा लाभही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला.
 6. महसूल कर्मचाऱ्यांसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचं पालन प्रभावीपणे झाल्यानेच ही मोहीम जिल्ह्यात यशस्वी झाली.
 7. 2016-17 मध्ये पीक विमा रक्कम भरून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती.
 8. कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पीक विम्याचं महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगितलं होतं. शिवाय बँकेमार्फत विमा रक्कम भरून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.
 9. पीक विमा भरुन घेण्यासाठी केलेले प्रयत्न पुरस्कारासाठी महत्वाचे ठरले असून यामुळे जिल्ह्याची मान देशात उंचावणार आहे.


 Madhya Pradesh declared the 'Most Film Friendly State' award

 1. मध्यप्रदेश राज्याची निवड ‘मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट’ पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
 2. 3 मे 2018 रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.
 3. शिवाय, चित्रीकरणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने उचललेल्या प्रयत्नांच्या सन्मानार्थ उत्तराखंड राज्याला ‘विशेष उल्लेखणीय प्रमाणपत्र’ देण्यात आले आहे.
 4. ‘मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट’ पुरस्कार ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधली एक श्रेणी आहे.
 5. हा पुरस्कार चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राज्य शासनाकडून अनुकूल अश्या सुविधा प्रदान होणार्‍या राज्याला दिला जातो.
 6. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा भारतीय चित्रपट सृष्टीत भारत सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित असा प्रमुख पुरस्कार आहे.
 7. हे पुरस्कार 1954 सालापासून दिले जात आहेत.
 8. सुवर्ण कमळ आणि रजत कमळ असे दोन पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटाना देण्यासोबतच बाकीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चित्रपटाच्या इतर कलात्मक आणि तांत्रिक अंगांसाठी दिले जातात.


 Former Chief Justice of Delhi High Court Rajinder Sachar died

 1. दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राजिंदर सच्चर यांचं निधन झालं. ते ९४ वर्षाचे होते.
 2. देशातील मुस्लिमांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सच्चर यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली होती. सच्चर समिती म्हणून ही समिती ओळखली जाते. 
 3. सच्चर यांनी १९५२ पासून वकिलीस सुरुवात केली होती.
 4. सुरुवातीला म्हणजे, ८ डिसेंबर १९६० मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयातून वकिली सुरू केली.
 5. १२ फेब्रुवारी १९७० मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश झाले. पुढे ५ जुलै १९७२ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला.
 6. दिल्ली उच्च न्यायालयाशिवाय सिक्कीम आणि राजस्थान उच्च न्यायालयात त्यांनी कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिलं. 
 7. भारतातील मुस्लिमांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती जाणून घेण्यासाठी ९ मार्च २००५ रोजी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती.
 8. सच्चर हे या समितीचे प्रमुख होते. सच्चर यांच्या नावानंच ही समिती ओळखली जाते. 


Top