पेयजल सुरक्षित बनविण्यासाठी IISc च्या संशोधकांनी कॉपर-लेपित पडदा विकसित केला

 1. भारतात परंपरेतून चालत आलेली तांब्याच्या भांड्यात पिण्याचे पाणी साठवून ठेवण्याच्या पद्धतीला अनुसरूनच, भारतीय विज्ञान संस्था (IISc) बेंगळूरू येथील पदार्थशास्त्र अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक सूर्यसारथी बोस यांच्या नेतृत्वात संशोधकांनी पेयजल सुरक्षित करण्यासाठी वॉटर-फिल्टरमध्ये पाणी गाळण्यासाठी तांब्यांच्या विद्युतभारित कणांनी लेपलेला पडदा (water-filter membrane with copper ions) विकसित केला आहे.
 2. शोधाचे परिणाम जर्नल नॅनोस्केल या प्रकाशनात प्रकाशित झाले आहेत.

शोधासंबंधी:-

 1. संशोधकांनी जीवाणू-प्रतिरोध साधण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी सामान्यतः वापरला जाणारा ‘पॉलीव्हीनीलायडिन फ्लोराईड (PVDF)’ पडदा विकसित केला आहे.
 2. जरी कॉपर ऑक्साईड एक उत्कृष्ट जिवाणू-प्रतिरोधी असले तरीही, पाण्यामध्ये तांब्याचे प्रमाण 1.3 ppm (WHO मानक) पेक्षा जास्त असल्यास ते विषारी ठरू शकते.
 3. त्यामुळे तांब्यांच्या विद्युतभारित कणांना नियंत्रितपणे पाण्यात सोडण्यासाठी संशोधकांनी कॉपर ऑक्साईडवर जैविकदृष्ट्या सहाय्यक अश्या पॉलिमरचा (पॉलीफोस्फॉस्टर किंवा PPE/ स्टेराइन मेलीक अनहायड्रीड किंवा SMA) लेप चढवण्यात आला आहे. या पॉलिमरमध्ये दूषित होण्याविरोधी गुणधर्म आहेत.

संशोधनाची पार्श्वभूमी:-

 1. तांबेच्या भांड्याच्या जिवाणूविरोधी गूणधर्मांचा वैज्ञानिक पुरावा मार्च 2012 मध्ये ‘जर्नल ऑफ हेल्थ, पॉप्युलेशन अॅंड न्यूट्रिशन’ मध्ये प्रकाशित करण्यात आला.
 2. या शोधानुसार, 16 तासांसाठी तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी इ.कोली व कॉलरासाठी कारणीभूत व्हिब्रियो कोलेरे O1 आणि साल्मोनेला यासारख्या रोगकारक जीवाणूंना ठार करते, असे सिद्ध झाले.


NASA ने बोईंग-निर्मित TDRS-M उपग्रह अवकाशात सोडले

 1. अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन (NASA) ने 18 ऑगस्ट 2017 रोजी ‘ट्रॅकिंग अँड डेटा रिले सॅटेलाइट-एम (TDRS-M)’ या नावाचे त्यांच्या मालिकेतील नवे उपग्रह एटलस-V या प्रक्षेपकाच्या सहाय्याने अवकाशात सोडले आहे.  
 2. हा उपग्रह अमेरिकेच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) येथे कार्यरत अंतराळवीरांचा पृथ्वीसह संपर्क साधण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेला आहे.

ट्रॅकिंग अँड डेटा रिले सॅटेलाइट-एम(TDRS-M):-

 1. USD 408 दशलक्ष खर्चून बोईंग कंपनीद्वारे तयार करण्यात आलेला TDRS-M हा 2020 सालापर्यंत आपले कार्य सुरू करू शकणार.
 2. हा उपग्रह NASA च्या पृथ्वीच्या खालच्या परिभ्रमण कक्षेसाठी अंतराळ ते भुपृष्ठ संपर्क साधण्यासाठी सुविधा देईल.
 3. TDRS-M हा या ISS मोहिमेतील शेवटचा म्हणजे 13 वा उपग्रह आहे, जे 1983 सालापासून सुरु करण्यात आले आहे.

यासंबंधी इतिहास:-

 1. ट्रॅकिंग अँड डेटा रिले सॅटेलाइट या मालिकेला 1983 सालापासून सुरुवात करण्यात आले आहे. योजनेनुसार आजगातय सर्व 13 उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत.
 2. या मोहिमेचे पहिले सात उपग्रह TRW कॉर्पोरेशनद्वारे तयार केले गेले होते.
 3. TDRS-A हे या मालिकेतील पहिले उपग्रह होते. या उपग्रहांना पुढीलप्रमाणे वर्गीकृत केले गेले आहे.
 4. फर्स्ट जनरेशन TDRS: मॉडेल A ते G
 5. सेकंड जनरेशन TDRS: मॉडेल H ते J
 6. थर्ड जनरेशन TDRS: मॉडेल K ते M


अमेरिकेकडून हिज्बुल दहशतवादी संघटना घोषित

 1. काश्मीरमध्ये सातत्याने भारतविरोधी कारवाया करणारी दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनचा समावेश अमेरिकेने आपल्या परदेशी दहशतवादी संघटनांच्या यादीत केला आहे.
 2. त्याबरोबरच या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करत अमेरिकेने तिच्यावर बंदी घातली आहे.
 3. दहशतवादी संघटनांच्या मदतीने काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना या कारवाईमुळे धक्का बसला आहे.  
 4. अमेरिकेने हिज्बुल मुजाहिद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित केल्यामुळे अमेरिकेतील संघटनेच्या सर्व संपत्तीवर टाच येणार आहे.
 5. तसेच या दहशतवादी संघटनेसोबत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यात येऊ नयेत, असे निर्देश अमेरिकी नागरिकांना देण्यात येतील.
 6. त्यामुळे हिज्बुलच्या सर्व हालचालींवर आता निर्बंध येणार आहेत. याशिवाय या दहशतवादी संघटनेत कोणालाही सामीलदेखील होता येणार नाही.
 7. यापूर्वी अमेरिकेने हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते.
 8. १९८९मध्ये स्थापन झालेली हिज्बुल मुजाहिद्दीनचा ही दहशतवादी संघटना अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करते आहे.
 9. या संघटनेने एप्रिल २०१४मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले केले होते. या हल्ल्यात १७ लोक जखमी झाले होते.


एमा स्टोन जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री

 1. सहा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा सिनेमा 'ला ला लॅंड'ची प्रमुख अभिनेत्री एमा स्टोन जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री असल्याचे फोर्ब्स मॅगझिनने घोषीत केले आहे.
 2. एमा स्टोन या २८ वर्षीय अभिनेत्रीने गेल्या वर्षभरात २.६ कोटी डॉलर म्हणजेच जवळपास १६६.४ कोटी रूपये कमावले आहेत. 
 3. 'ला ला लॅंड' या सिनेमात केलेल्या तगड्या अभिनयाचे बक्षीस म्हणून तिला ऑस्करकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.
 4. लिंग समानतेसाठीही तिने आवाज उठवला होता. पुरूष आणि स्त्री कलाकारांना समान मानधन मिळावे अशी मागणी तिने केली होती.
 5. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री जेनिफर एनिस्टन हिचा नंबर लागतो. जेनिफर एनिस्टनने गेल्या वर्षात २.५५ कोटी डॉलरची कमाई केली आहे.
 6. प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही सिरीज फ्रेन्ड्समध्ये झळकणारी अभिनेत्री म्हणून जेनिफर एनिस्टनची ओळख आहे. ती अमिरात एअरलाइन्सची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर आहे.
 7. गेल्या दोन वर्षांपासून या यादीत प्रथम स्थानी असलेली जेनिफर लॉरेन्स यावर्षी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना कृषी नेतृत्व पुरस्कार

 1. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची वैश्विक कृषी नेतृत्व पुरस्कार 2017 साठी निवड करण्यात आली आहे.
 2. नवी दिल्लीत 5 सप्टेंबर 2017 रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय कृषि परिषदेत एका समारंभात हा पुरस्कार दिला जाणार आहे.

पुरस्कारासंबंधी:-

 1. वैश्विक कृषी नेतृत्व पुरस्कार (Global Agriculture Leadership Award) हा भारतीय अन्न व कृषी परिषदेतर्फे दिला जातो.
 2. प्रदेशामधील कृषि क्षेत्राच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तिला हा पुरस्कार दिला जातो.


Top

Whoops, looks like something went wrong.