International Human Integration Day - 20th December

 1. दरवर्षी 20 डिसेंबरला देशादेशात आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस (International Human Solidarity Day) साजरा करतात.  
 2. आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस साजरा करण्यामागचा उद्देश्य हा आहे की, लोकांच्या विविधतेमधील एकताचे महत्त्व स्पष्ट करत जागरूकता फैलावने.
 3. ‘हेल्प 4 ह्यूमेन रिसर्च अँड डेवलपमेंट’ या संस्थेने भारतीयांना एकताच्या सूत्रात बांधण्याचा पुढाकार घेतला आहे.

 

पार्श्वभूमी
 1. 22 डिसेंबर 2005 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने मानव एकता संदर्भात एक निर्णय घेत दरवर्षी 20 डिसेंबरला ‘आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस’ घोषित करण्याचा निर्णय घेतला.  
 2. फेब्रुवारी 2002 मध्ये दारिद्र्य निर्मूलनासाठी UNDP चा ‘जागतिक एकता कोष’ स्थापन करण्यात आला आहे.
 3. नवीन शाश्वत विकास उद्दीष्टे (SDG) पुर्णपणे लोक आणि ग्रहावर केंद्रित आहे, ज्यात मानवाधिकारांना पाठबळ दिले जात आहे आणि दारिद्र्य, उपासमार आणि रोगराई यामधून लोकांना बाहेर काढण्यासाठीच्या निर्धारासाठी वैश्विक भागीदारीने  समर्थित आहे. त्यादृष्टीने जागतिक सहकार्य आणि एकात्मतेची पायाभरणी केली जात आहे.
 4. त्याचाच एक भाग म्हणून जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस’ साजरा करतात.


Central Government approves 42 mega food parks in the country

 1. अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने देशात एकूण 42 मेगा फूड पार्क उभारण्यास मंजुरी दिली आहे.
 2. आतापर्यंत नऊ मेगा फूड पार्क कार्यान्वित झाले आहेत.
 3. या आर्थिक वर्षात आणखी सहा चालू करण्याचे लक्ष्य आहे.
 4. पुढील आर्थिक वर्षापर्यंत ही संख्या 12 वर आणण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

 

मेगा फूड पार्क योजना
 1. भारत सरकारच्या मेगा फूड पार्क योजनेअंतर्गत प्रत्येक मेगा फूड पार्क प्रकल्पाला 50 कोटी रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे. 
 2. मेगा फूड पार्क ही योजना "क्लस्टर" पध्दतीवर आधारित आहे. 
 3. पार्कमध्ये विशेषत: पुरवठा साखळीसाठी पायाभूत सुविधा, ज्यामध्ये संकलन केंद्रे, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, केंद्रीय प्रक्रिया केंद्रे, शीतसाखळी आणि उद्योजकांसाठी 30-35 पूर्ण विकसित भूखंडासकट अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याची सोय असते.
 4. मेगा फूड पार्क प्रकल्प स्पेशल पर्पज व्हेकल (SPV) द्वारे चालवले जातात, जे कंपनी कायदा अंतर्गत नोंदणीकृत बॉडी कॉर्पोरेट आहे. 

 


The Union Cabinet has approved the special proposal for employment generation in the leather and footwear sector.

 1. केंद्रीय मंत्रिमंडळाने चर्म व पादत्राणे क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.
 2. या प्रस्तावामध्ये वर्ष 2017-18 आणि वर्ष 2019-20 या कालावधीत 2600 कोटी रुपयांच्या मंजुरीत खर्चासह ‘भारतीय पादत्राणे, चर्म व सहायक सामान विकास कार्यक्रम’ याची अंमलबजावणी समाविष्ट आहे.
 3. या कार्यक्रमामधून दोन लाख रोजगारांची निर्मिती होण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमामध्ये समाविष्ट उप-योजना:- 

 1. मनुष्यबळ विकास (HRD) उप-योजना - 
  1. 15,000 रुपये प्रति व्यक्ती या दराने बेरोजगार व्यक्तींच्या निवड-नियुक्ती संबंधी कौशल्य विकास प्रशिक्षण, 5000 रुपये प्रति कर्मचारी या दराने कार्यरत कामगारांना कौशल्य सुधार प्रशिक्षण आणि प्रति व्यक्ती 2 लाख रुपये या दराने प्रशिक्षकांना प्रशिक्षणासाठी मदत देण्याचा प्रस्‍ताव आहे.
 2. चर्म क्षेत्राचा एकात्मिक विकास (IDLS) उप-योजना –
  1. वर्तमान केंद्रांचे आधुनिकीकरण/तांत्रिक सुधारणासाठी सोबतच नव्या केंद्रांच्या स्‍थापनेसाठी सूक्ष्‍म, लघु व मध्यम उद्योग (MSME) ला नवी उपकरणे व यंत्रांवरील खर्चासाठी अनुदान दिले जाणार आहे.
 3. संस्थात्मक सुविधांची स्‍थापना उप-योजना –
  1. निर्दिष्ट तीन वर्षांमध्ये 147 कोटी रुपयांसह फुटवियर डिजाइन अँड डेवलपमेंट इंस्टीट्यूट (FDDI) च्या काही परीसरांना ‘उत्‍कृष्‍टता केंद्रात’ रूपांतरित करणे.
 4. मेगा चर्म, पादत्राणे व सहायक सामान समूह (MLFAC) उप-योजना.
 5. चर्म तंत्रज्ञान, अभिनवता आणि पर्यावरणासंबंधी मुद्दे उप-योजना
 6. चर्म, पादत्राणे व सहायक सामान क्षेत्रात भारतीय ब्रॅंडला प्रोत्‍साहन देण्याची उप-योजना
 7. चर्म, पादत्राणे व सहायक सामान क्षेत्रासाठी अतिरिक्‍त रोजगार प्रोत्‍साहन उप-योजना


NITI commission to set up methanol economy fund

 1. बदलत्या भारताची राष्ट्रीय संस्था (NITI) आयोग स्वच्छ इंधनाच्या उत्पादनास आणि वापरास प्रोत्साहन देण्यासाठी 4000-5000 कोटी रुपये किमतीचे ‘मिथेनॉल इकॉनमी कोष’ उभारण्याची योजना तयार करीत आहे.
 2. योजनेंतर्गत उच्च-राख प्रमाण असणार्‍या कोळश्याला मिथेनॉलमध्ये रुपांतरित करुन इंधन तयार करण्याची योजना आहे.
 3. त्यासाठी निर्मिती प्रकल्प कोल इंडियामार्फत उभारले जाण्याचे अपेक्षित आहे.

 

मिथेनॉल इंधन आणि त्याचे महत्त्व
 1. मिथेनॉल इंधन स्वस्त, सुरक्षित आणि प्रदूषण मुक्त असते. मिथेनॉलचा वापर केल्यास CNG च्या तुलनेत वाहनांमध्ये कमीतकमी बदल करण्याची आवश्यकता भासणार आहे.
 2. मिथेनॉलचा वापर ऊर्जा निर्मिती इंधन, वाहतूक इंधन आणि स्वयंपाकाच्या इंधनासाठी केला जाऊ शकतो.
 3.  ज्यामुळे पुढील काही वर्षांमध्ये भारताचे तेलाच्या आयातीवरील बिल अंदाजे 20% नी कमी केले जाऊ शकते.
 4. भारतामध्ये मिथेनॉल एका लिटरमागे 16-21 रुपयांच्या खर्चाने उत्पादीत करता येते.
 5. पुढील दोन-चार वर्षांत दोन योजना सुरू करण्याची अपेक्षा आहे.
 6. चीन हा मिथेनॉलचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे.

 


Top