MPSC chalu ghadamodi, current affairs

1. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनाच्या दृष्टीने यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं. या दोन्ही क्षेत्रात भारताने महत्वपूर्ण यश मिळवलं. चांद्रयान-2 मध्ये विक्रम लँडरचा अपवाद वगळता ही मोहिम यशस्वी ठरली.

2. तर ‘मिशन शक्तीद्वारे भारताने आपली क्षमता जगाला दाखवून दिली. मिशन शक्तीच्या यशानंतर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाहिनीवर येऊन या मोहिमेचं महत्व विषद केलं.

3. ‘मिशन शक्ती’मुळे भारत मोजक्या देशांच्या पंक्तीत स्थान मिळवणारा चौथा देश ठरला. यापूर्वी असे तंत्रज्ञान \ अमेरिका, रशिया आणि चीनने विकसित केलं आहे.

4. तसेच बालकोट एअर स्ट्राइकनंतर बरोबर एक महिन्याने 27 मार्च 2019 रोजी भारताने डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम बेटावरुन उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. भारताने ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये भ्रमण करणारा आपला उपग्रह A-Sat क्षेपणास्त्राद्वारे पाडला. पृथ्वीपासून 2 हजार किलोमीटरपर्यंतची कक्षा ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये येते.

5. तर अवकाशात पृथ्वीपासून 300 किलोमीटरच्या कक्षेत भ्रमण करणारा आपलाच उपग्रह भारताने क्षेपणास्त्राद्वारे पाडला. डीआरडीओच्या नेृत्वाखाली ही संपूर्ण मोहिम पार पडली.

6. उच्च तंत्रज्ञान क्षमता आणि अचूकता या चाचणीसाठी अत्यंत आवश्यक असते. या चाचणीद्वारे भारताने अवकाश क्षेत्रातील अत्यंत कठीण समजले जाणारे तंत्रज्ञान आत्मसात केले.

7. ‘मिशन शक्ती’द्वारे भारताने आपण जमीन, पाणी, हवेतच नव्हे तर अवकाशतही युद्ध लढण्यास समर्थ आहोत हे दाखवून दिले आहे. डीआरडीओने या चाचणीसाठी बॅलेस्टिक मिसाइल डिफेन्स प्रोग्रॅममधील इंटरसेप्टर क्षेपणास्त्राचा वापर केला.

8. तसेच उपग्रहविरोधी तंत्रज्ञानामध्ये जॅमिंगचाही एक पर्याय असतो. पण भारताने उपग्रह पाडण्याचा पर्याय निवडला. लो अर्थ ऑर्बिटमधील उपग्रहांचा हेरगिरीसाठी आणि लष्करी कारवाईसाठी उपयोग केला जातो. A-Sat दोन मार्गांनी तैनात करता येऊ शकते. अवकाशातून अवकाशात आणि जमिनीवरुन अवकाशाच्या दिशेने A-Sat चा वापर करता येऊ शकतो.

9. 1985 साली अमेरिकन हवाई दलाने एफ-15 विमानातून A-Sat क्षेपणास्त्र डागून P78-1 हा संशोधन उपग्रह पाडला होता. पृथ्वीपासून हा उपग्रह 555 किलोमीटर अंतरावर होता. 2007 साली चीनने आपणही या तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याचे जगाला दाखवून दिले. चीनने SC-19 A-SAT क्षेपणास्त्राने निरुपयोगी बनलेला FY-1C उपग्रह पाडला.

10. A-SAT क्षेपणास्त्राची ठराविक टप्प्यापर्यंत मारक क्षमता आहे. 20 हजार किलोमीटरच्या पुढे असलेले उपग्रह A-SAT च्या टप्प्यामध्ये येत नाहीत. यामध्ये कम्युनिकेश आणि जीपीएस उपग्रहांचा समावेश होतो. पृथ्वीपासून काहीशे किलोमीटर अंतरावर असणारे उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये मोडतात. भारताचे शेजारी असलेल्या चीन आणि रशियाकडे A-SAT अस्त्र आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा 1 एप्रिल 2020 पासून आपल्या पदावरुन पायउतार होणार आहेत. त्यानंतर ते गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील.

2. तसेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असलेले पवन गोयंका यांची पद्दोन्नती होणार असून 1 एप्रिल 2020 पासून ते व्यवस्थापकीय संचालक (एमडी) – मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून पदभार स्विकारतील. गोयंका 11 नोव्हेंबर 2020 पर्यंत आपल्या पदावर कायम राहतील.

3. कंपनीच्या गव्हर्नन्स नॉमिनेशन अॅण्ड रेम्युनरेशन कमिटीच्या (जीएनआरसी) शिफारसींनुसार, संचालक मंडळाने या बदलाला मंजुरी दिली.

4. तसेच ग्रुप प्रेसिडंट असलेले अनिष शाह 1 एप्रिल 2020 पासून मुख्य फायनान्शिअल अधिकारी (सीएफओ) हे पद सांभाळतील. सध्याचे सीएफओ व्ही. एस. पार्थसारथी 1 एप्रिल 2020 रोजी आपल्या पदावरुन निवृत्त होतील.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मागील काही दिवसांपासून आंदोलने सुरु आहेत. रविवारी विद्यापीठांसह शिक्षण संस्थांच्या आवारामधून सुरु झालेल्या आंदोलनाची धग गुरुवारी देशभर पसरली आणि दिल्लीसह मुंबई, बंगळूरु, लखनौ आदी शहरांबरोबरच विविध राज्यांत लोक रस्त्यावर उतरले. याच पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांनी
सोशल नेटवर्किंगवरुन या कायद्याविरोधात आपले मत नोंदवले आहे.

2. मात्र थेटपणे या कायद्याला विरोध करणे अभिनेत्री परिणिती चोप्राला महागात पडले आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या हरयाणा सरकारच्या अभियानाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर (सदिच्छा दूत) असणाऱ्या परिणितीला हटवण्यात आलं आहे.

3. तसेच काही दिवसांपूर्वीच या कायद्याला विरोध करणारा अभिनेता सुशांत सिंहला ‘सावधान इंडिया’ कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आलं आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.