mpsc current affairs

देशभरात तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौमधील रमाबाई मैदानातील योग कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. ‘प्रत्येक व्यक्तीने योग केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. त्यामुळे प्रत्येकाने योग करायला हवा,’ असे पंतप्रधान मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

‘तंदुरुस्तीसोबतच निरोगी राहणेदेखील गरजेचे आहे. योग केल्याने शरीर निरोगी राहते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात योगाला स्थान द्यायला हवे,’ असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित आहेत.

‘योग केल्यामुळे जग जवळ आले आहे. योग दररोज केल्यास प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहील. आंतरराष्ट्रीय योग दिनात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो,’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

देशासह जगभरात योग करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ‘गेल्या काही वर्षांमध्ये योग शिक्षकांची संख्या वाढली आहे. योग शिक्षकांना मोठी मागणी आहे. अनेकांनी योग शिक्षण हा व्यवसाय म्हणून स्वीकारला आहे.

देशच नव्हे, तर जगभरात योग ही नवी बाजारपेठ होऊ पाहते आहे,’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

लखनौमध्ये पंतप्रधान मोदी योग कार्यक्रमासाठी दाखल झाले असताना पावसाला सुरुवात झाली. मात्र पाऊस येऊनही योग दिनासाठी उपस्थित असलेल्या लोकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. उपस्थितांच्या या उत्साहाचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आहे. ‘पाऊस झाल्यावर योग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मॅटचा छत्री म्हणून वापर होतो आहे,’ असेदेखील मोदी गमतीने म्हटले.

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा संयुक्त राष्ट्राकडून करण्यात आली आहे. यानंतर २०१५ पासून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यंदा जगभरात तिसऱ्या योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरात ५ हजार ठिकाणी योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच ७४ शहरांमध्ये केंद्र सरकारचे ७४ मंत्री योग करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी लखनौमध्ये ५५ हजार लोकांसह योग केला आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईकदेखील उपस्थित होते.


  1. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) ब्रॅंड अँबेसिडर म्हणून काम पाहणार आहेत. जीएसटीच्या प्रबोधनात्मक प्रचार करण्याची जबाबदारी बच्चन यांच्यावर सोपविली आहे. केंद्रीय उत्पादनशुल्क व सीमा शुल्क (सीबीडीटी) विभागाने याबाबत माहिती दिली.
  2. बच्चन यांच्यासोबत 40 सेकंदांची जाहिरातीचे याआधीच चित्रीकरण करण्यात आले आहे. तसेच या आधी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू जीएसटीची ब्रॅंड अँबेसिडर होती.


Top

Whoops, looks like something went wrong.