World happiness Report 2019

 1. संयुक्त राष्ट्रसंघाकडून ‘जागतिक आनंद अहवाल 2019’ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 2. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, देशाचे उच्च सकल स्थानिक उत्पन्न (GDP) असले तरी आणि दरडोई उत्पन्न जास्त असले तरीही ते सर्वाधिक आनंदी देश नाहीत. लोकांचा आनंदीपणा देशातले कायदे आणि नियमांशी निगडीत आहे.
 3. ठळक मुद्दे:-
  1. सलग दुसर्‍यांदा फिनलँड हा जगातला सर्वाधिक आनंदी देश घोषित करण्यात आला आहे.
  2. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भारत सात स्थानांनी खाली घसरत 140 व्या क्रमांकावर आहे.
  3. सुदान देशाचे लोक त्यांच्या जीवनमानाशी नाखुश आहेत.
  4. या जागतिक सर्वेक्षणात 156 देशांच्या नागरिकांना सामील करण्यात आले होते. हे सर्वेक्षण संयुक्त राष्ट्रसंघाच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्यूशन्स नेटवर्कद्वारे केले गेले.
  5. 14 परिमाणांच्या आधारावर हे सर्वेक्षण केले गेले, ज्यात व्यवसाय व आर्थिक, नागरी प्रतिबद्धता, संपर्क आणि तंत्रज्ञान, विविधता (सामाजिक), शिक्षण व कुटुंब, भावना (कल्याण), पर्यावरण व ऊर्जा, अन्न व निवारा, सरकार व राजकारण, कायदा व सुव्यवस्था (सुरक्षा), आरोग्य, धर्म व नैतिकता, परिवहन आणि कार्य यांचा समावेश आहे.


NurSulatan: The new name of the capital of Kazakhstan

 1. कझाकीस्तानचे राजधानी शहर असलेल्या ‘अस्ताना’ याचे नाव बदलून ‘नुरसुलतान’ असे नामकरण करण्यात आले आहे.
 2. ‘नुरसुलतान’ या शब्दाचा अर्थ कझाक भाषेत "प्रकाशाचा राजा" असा होतो.
 3. अंतरिम राष्ट्रपती कासीम-जोमर्त तोकाएव्ह यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी संसदेत मांडलेल्या प्रस्तावाला काही तासाभरातच मंजूर करण्यात आले.
 4. कझाकीस्तान हा एक मध्य आशियाई देश आणि माजी सोवियत प्रजासत्ताक आहे.
 5. या देशाची राजधानी नुरसुलतान (पूर्वीचे अस्ताना) हे शहर आहे आणि कझाकस्तानी टेंगे हे चलन आहे.


In space NASA discovered the fast pulsar

 1. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अमेरिकेच्या अंतराळ संस्थेच्या खगोलशास्त्रज्ञांनी ‘पल्सर’ ही अंतराळातली अद्भुत घटना शोधून काढली आहे.
 2. अलीकडेच झालेल्या सुपरनोव्हाच्या विस्फोटानंतर ‘PSR J0002+6216 (J0002)’ नावाचा गतिमान पल्सर दिसून आला.
 3. 2017 साली शोधला गेलेला हा पल्सर तासाला सुमारे चार दशलक्ष किलोमीटर एवढ्या अत्याधिक वेगाने मार्गक्रम करीत आहे.
 4. याचा वेग एवढा आहे की तो केवळ सहा मिनिटांमध्ये पृथ्वी आणि चंद्र यांच्या दरम्यानचे अंतर कापू शकतो.
 5. पल्सर म्हणजे काय?
  1. पल्सर हा अंतरळातला एक प्रकाशमान घटक आहे.
  2. हा घटक अत्याधिक केंद्रीत विद्युत चुम्बकीय विकिरणे उत्सर्जित करतो आणि अत्याधिक घनता असलेल्या या घटकाचे गुरुत्वाकर्षण अधिक असते.
   1. मोठ्या तार्‍याच्या विस्फोटानंतर अत्यंत गतिमान असे स्वताःभोवती फिरणारे न्यूट्रॉन तारे मागे सोडतात.
  3. त्यांना पल्सर म्हणून ओळखले जाते. याला ब्रह्मांडाचे प्रकाशस्थान असेही म्हटले जाते.


Spring Equinox 2019

 1. 20 मार्च 2019 हा उत्तर गोलार्धामध्ये वसंत ऋतूचा प्रथम अधिकृत दिवस आहे, ज्याला ‘वसंत विषुववृत्त’ (Spring Equinox) म्हणून ओळखले जाते.
 2. ही एक खगोलीय घटना आहे.
 3. हा दिन भारतात वसंत ऋतूच्या अंतिम दिनाच्या रूपात साजरा केला जातो.
 4. या दिनी पृथ्वीची भू-मध्य रेखा सूर्याच्या मध्यातून जाते, ज्यामुळे या दिवशी दिवस आणि रात्री याचा कालावधी समान असतो.
 5. ही घटना दरवर्षी 20 मार्च आणि 23 सप्टेंबर असे दोनदा घडते आणि त्यांना वसंत विषुववृत्त आणि शीतकालीन विषुववृत्ताच्या रूपात ओळखले जाते.
 6. या दिनापासून सूर्य हळूहळू उत्तर गोलार्धाकडे झुकतो, ज्यामुळे दिवसाचा काळ मोठा आणि रात्रीचा काळ छोटा होत असतो आणि तापमान वाढू लागते.


Top