1. किशोर धनकुडे याने जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्टवर (८८४८ मीटर) शनिवारी सकाळी तिरंगा फडकविला. ४२ वर्षीय किशोरने २०१४मध्ये चीनच्या बाजूने एव्हरेस्ट सर केला होता. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण बाजूने एव्हरेस्ट सर करणारा तो महाराष्ट्राचा पहिला गिर्यारोहक ठरला आहे.
  2. किशोर १० एप्रिलला बेस कँपला पोहोचला होता. यानंतर तेथील वातावरणाशी जुळवून घेत त्याने १५ मे रोजी एव्हरेस्ट समिटच्या दिशेने कूच केली. १९ मे रोजीच किशोरचे समीट झाले असते. पण खराब वातावरणामुळे त्याने कँप-४लाच राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर १९ मे रोजी सायंकाळी किशोरसह त्याच्या टीमने आगेकूच केली. यानंतर शनिवारी सकाळी त्याने एव्हरेस्टवर तिरंगा फडकविला.
  3. किशोर हा नेपाळमधील सातोरी अॅडव्हेंचर कंपनी सोबत या मोहिमेसाठी गेला होता. त्यांच्या प्रमुखाने ही माहिती दिली. त्याच्यासोबत मिंगमा तेन्झी शेर्पाही होता. किशोरसह ऑस्ट्रेलियाचा सॅम्युएल सीलेय, मुंबईचा ब्रीज शर्मा, इटलीचे अँजेलो, डेव्हिड हे गिर्यारोहकही होते.
  4. किशोर कँप-४ला परतला असून, तो येथेच मुक्काम करील. रविवारी तो कँप-२ ला पोहोचणार आणि सोमवारी (२२ मे) बेस कँपला पोहोचणार आहे. एव्हरेस्टच्या प्रवासात त्याला अनेक आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागला. खराब वातावरणामुळे क्षणाक्षणाला तेथील परिस्थिती बदलत होती. मात्र, किशोरने धैर्याने साऱ्या परिस्थितीचा सामना केला आणि मोहीम यशस्वी करून दाखवली.


  1. आतापर्यंत सलग १७ सामने जिंकत नदालने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली होती. पण ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमने नदालला पराभूत करीत त्याच्या विजयी घोडदौडीला लगाम लावला.
  2. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत डॉमिनिकने नदालला ६-४, ६-३ असे सरळ सेट्समध्ये पराभूत करीत साऱ्यांनाच धक्का दिला. दुखापतीनंतर नदाल मैदानात परतल्यावर एकामागून एक विजय मिळवत होता.
  3. पण या सामन्यात नदालला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पहिल्या आणि दुसऱ्याही सेटमध्ये डॉमिनिकने नदालवर वर्चस्व गाजवले. आता यापुढे सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि अर्जेटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रो यांच्यातील विजेत्याशी डॉमिनिकला सामना करावा लागणार आहे.


Top