MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारताच्या मनु भाकरने पुटियान (चीन) येथे सुरु असलेल्या वर्ल्ड कप फायनल मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात आज सुवर्णपदक मिळवून इतिहास रचला आहे.

2. आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशनच्या (आयएसएसएफ) प्रतिष्ठेच्या हंगामात १७ वर्षीय मनू भाकरने २४४. गुणांची नोंद केली. तिचा प्रतिस्पर्धी यशस्विनीसिंग देसवालने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहावे स्थान मिळविले.

3. सर्बियाच्या झोराना अरुणोविकने २४१.९ ने रौप्यपदक जिंकले, तर चीनच्या क्वान वांगने २२१.८ गुणांसह कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अभिषेक वर्मा आणि सौरभ चौधरी यांनी अंतिम फेरीसाठी पात्रता दर्शविली. वर्माने ५८८ गुणांसह प्रथम स्थान पटकाविला तर चौधरी ५८१ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1.सूर्यमालेमधील गुरु हा आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे. या ग्रहाचा चंद्र “युरोपा’ म्हणून ओळखला जातो. या युरोपा ग्रहावर पाण्याचे बाष्प आढळल्याची माहिती अमेरिकी अंतरिक्ष संस्था “नासा’कडून देण्यात आली आहे.

2. गुरुच्या चंद्रावर पाणी आढळल्याने या उपग्रहावर मोठा समुद्र अस्तित्वात असल्याची शक्‍यता वैज्ञानिकांकडून दर्शवली जात आहे. गुरुच्या चंद्रावर पाणी असल्याची माहिती प्रथम नेचर ऍस्ट्रोनॉमी या जर्नलमध्ये प्रकाशित झाली.

3. अमेरिकेतील हवाई या शहरातील डब्ल्यू. एम. केक या वेधशाळेच्या मदतीने युरोपावरील पाण्याच्या बाष्पाचा अंदाज घेण्यात आला. युरोपा या उपग्रहावर पृष्ठभागावर हा बर्फ साचला असून कधीकधी फवाऱ्यांसारखं यातून पाणी बाहेर येते याचे पुरावे संशोधकांकडे असल्याची माहिती आहे. मात्र पाण्याचे मॉलेक्‍युल्स मोजले नसल्याने गुरुच्या चंद्रावर खरंच पाणी आहे का याची खात्री देणे शक्‍य होत नव्हते.
मात्र नुकत्याच नासाने केलेल्या संशोधनामुळे गुरुच्या आतील रचनेचा अभ्यास करणे आणखी सोपे होणार असल्याचे नासाने म्हटले आहे. जीवसृष्टीसाठी लागणारे आवश्‍यक घटक गुरुच्या चंद्रावर उपलब्ध असल्याची शक्‍यता नासाच्या संशोधकांनी वर्तवली आहे. त्यामुळे युरोपा हा नासाच्या संशोधकांसाठी जीवसृष्टीच्या आणि पर्यायाने पाण्याच्या संशोधनकार्यात महत्वाचा ग्रह ठरला आहे.
दरम्यान, पृथ्वी व्यतिरिक्त इतर ग्रहांवर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासा प्रयत्नशील आहे. मात्र, अशी जीवसृष्टी अस्तित्वात येण्यासाठी तिथे पृथ्वीप्रमाणे पाणी असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे असे पाण्याचे अस्तित्व शोधण्याच्या दृष्टीने वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरु आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

 1. ‘शांती, निशस्त्रीकरण आणि विकासासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार’ इंदिरा गांधी मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने दिला जातो.

2.  निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी सातत्याने झटणाऱ्या जगातल्या निवडक व्यक्तित्वांपैकी डेव्हिड अॅटनबोरफ एक आहेत. निसर्गातल्या जैवविविधतेच्या रक्षणासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

इंदिरा गांधी शांती पुरस्कार

–पहिल्या महिला पंतप्रधान आणि आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी यांची १०२ वी जयंती.
– या दिनी 
इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट दरवर्षी शांती, समाजसेवा, निरस्त्रीकरण आणि विकास आदी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना पुरस्कराने गौरविण्यात येते.
– यदाचा इंदिरा गांधी शांती पुरस्कारासाठी
 डेव्हिड एटनबरो यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
– या पुरस्करामध्ये 
२५ लाख रोख रक्कम, एक ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येईल.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारतीय क्रिकेटमध्ये अखेर शुक्रवारी ‘गुलाबी क्रांती’ला प्रारंभ होणार आहे. सुरुवातीला अनिच्छा प्रकट करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी सांभाळल्यानंतर प्रकाशझोतातील पहिला कसोटी सामना ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवणार जात आहे.

2. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्रकाशझोतातील कसोटी सामन्याला मान्यता दिल्यानंतर सात वर्षांनी गांगुलीच्या प्रयत्नांनी भारतात ‘गुलाबी क्रांती’ अवतरणार आहे. गांगुलीनेच हे शिवधनुष्य पेलताना बांगलादेश क्रिकेट मंडळाला प्रकाशझोतातील कसोटीसाठी राजी केले. अ‍ॅडलेड येथे चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्याने प्रकाशझोतातील गुलाबी पर्वाला प्रारंभ झाला. त्यानंतर आतापर्यंत ११ प्रकाशझोतातील सामने झाले आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. श्रीलंकेचे अध्यक्ष म्हणून गोताबाया राजपक्ष यांची निवड झाल्यानंतर गुरुवारी त्यांचे ज्येष्ठ बंधू महिंदा राजपक्ष यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यामुळे श्रीलंकेतील राजकीय क्षेत्रावर शक्तिशाली आणि वादग्रस्त राजपक्षे घराण्याने वर्चस्व प्रस्थापित केल्याचे बोलले जात आहे.

2. महिंदा राजपक्ष यांना गोतबाया यांनी अध्यक्षीय सचिवालयात पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. ऑगस्ट २०२० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत महिंदा राजपक्ष काळजीवाहू मंत्रिमंडळाचे पंतप्रधान म्हणून काम पाहणार आहेत.

3. नव्या सरकारसोबत घनिष्ठतेने काम करण्याची भारताची इच्छा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी अधोरेखित केली.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांची फॉर्च्यूनच्या बिझनेस पर्सन ऑफ द इयर २०१९ साठी निवड केली आहे. या यादीत जगातील २० अशा सीईओची निवड केली आहे, ज्यांनी कठीण उद्दिष्ट साध्य केले, अशक्य संधी कॅश केल्या आणि सृजनशील पद्धतीने उपाय शोधला त्यामध्ये नाडेला प्रथम क्रमांकावर राहिले.

2. यादीत नाडेला यांच्याशिवाय भारतीय वंशाचे अजय बंगा आणि जयश्री उलाल यांना स्थान मिळाले आहे. मास्टर कार्डचे सीईओ बंगा ८ वे आणि अरिस्ताच्या प्रमुख उलाल १८ व्या क्रमांकावर आहेत. फॉर्च्यूनने मंगळवारी ही यादी प्रसिद्ध केली. सत्या नाडेला २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ झाले. त्यांच्या नेतृत्वात कंपनीचा महसूल सतत वाढत आहे.

3. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये मायक्रोसॉफ्टचा नफा ३९ अब्ज डॉलर आणि महसूल १२६ अब्ज डॉलर राहिला. कंपनीचा तीन वर्षांचा एकत्रित वार्षिक महसूल वृद्धी दर ११% आणि नफा वाढ २४% आहे. एप्रिलमध्ये मायक्रोसॉफ्ट प्रथमच १ ट्रिलियन डॉलरच्या बाजार भांडवलावर पोहोचली होती.

4. अॅपलसह जगातील ४ कंपन्याच इथपर्यंत पोहोचू शकल्या आहेत. यादीत फॉर्च्यूनकडून जारी केलेल्या निवेदनात नमूद केले की, उद्योग जगतात शांत स्वभावाच्या नेतृत्वाने आपली पकड निर्माण केली आहे. परिणाम आणि टीम आधारित लीडरशिप देण्यात बिझनेसपर्सन ऑफ द इयर सत्या नाडेलापेक्षा जास्त प्रभावित अन्य कुणी केले नाही.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. 21 नोव्हेंबर – जागतिक टेलीव्हिजन दिन

2. 21 नोव्हेंबर 1877 मध्ये थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.

3. 21 नोव्हेंबर 1955 मध्ये संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.

4. दक्षिण कोरियाने 21 नोव्हेंबर 1972 मध्ये नवीन संविधान अंगीकारले.


Top

Whoops, looks like something went wrong.