1. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात इंटर-एजन्सी ग्रुप फॉर चाइल्ड मॉर्ट्यालिटी एस्टिमेशन (IGME) ने बालमृत्यू संदर्भात ‘लेव्हल्स अँड ट्रेंड्स इन चाइल्ड मॉर्ट्यालिटी 2017’ हा नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 2.  नव्या अहवालानुसार, जगभरात पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूदरात कमतरता आलेलू असूनही नवजात बालकांच्या मृत्यूची संख्येत कमतरता आलेली नाही, असे दिसून आले आहे.
 3. जगभरात पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूची संख्या वर्ष 2000 मधील जवळपास  99 लाखच्या तुलनेत वर्ष 2016 मध्ये 56 लाख इतक्या आतापर्यंतच्या निच्चांकावर आलेली आहे. या काळात नवजात बालकांचा मृत्यूदर 41% वरून वाढून तो 46%, म्हणजेच दर दिवशी 7,000 नवजात इतका झाला आहे.
 4. 2000 सालापासून पाच वर्षांखालील 50 दशलक्ष बालकांना जीवनदान लाभलेले आहे. विशेषत: दक्षिण आशिया उप-सहारन आफ्रिकेतील प्रदेश आणि देशांमध्ये प्रगती असूनही, मुलाला जगण्यात मोठ्या तफावत अजूनही दिसून येत आहे.
 5. वर्ष 2017 पासून ते वर्ष 2030 या काळात जन्माच्या 28 दिवसांच्या आत मृत्यूमुखी पडणार्‍या नवजात बालकांची संख्या तीन कोटी होणार. सार्वभौमिक आरोग्य सुविधा प्राप्त करण्यासाठी उपाय योजना केल्या जाव्या आणि हे सुनिश्चित करावे की अधिकाधिक नवजात बालके जगावेत. प्रसव काळात आणि त्यानंतर दिल्या जाणार्‍या सेवांच्या गुणवत्तेत सुधार आणणे आणि वेळेवर निगराणीला प्राथमिकता दिली गेली पाहिजे, असा सल्ला देखील संस्थेकडून देण्यात आला आहे.


 1. ‘लॅन्सेट’ नियतकालिकाने प्रदूषणामुळे जगभरात होणार्‍या मृत्यूंचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार, भारतातील जल आणि वायू प्रदूषणाची स्थिती चिंताजनक असून प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्यूच्या संख्येत  भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
 2. अभ्यासात जगभरातील देशांमधील प्रदूषण, त्याचा लोकांवर होणारा परिणाम आणि त्यामुळे होणारे मृत्यू या घटकांचा समावेश केला. यामध्ये देशातील हवा आणि पाणी यांच्या प्रदूषणाचे प्रमाण यासंबंधी आढावा घेण्यात आला.   अहवालात प्रदूषणामुळे झालेली मृत्यूसंख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 3. 2015 साली जगभरात प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे  90 लाख लोकांचा मृत्यू झाला. यातील 28% भारतीय होते. 2015 साली प्रत्येक 6 व्यक्तींमध्ये एकाचा मृत्यू प्रदूषणामुळे झाला.
 4. 2015 साली भारतात प्रदूषणामुळे तब्बल 25 लाख लोकांचा मृत्यू झाला. जल आणि वायू प्रदूषणामुळे अकाली मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. 2015 साली भारतात वायू प्रदूषणामुळे 18 लाखांहून अधिक जणांनी जीव गमावला, तर जल प्रदूषणामुळे जवळपास 6 लाख लोकांचा मृत्यू झाला.
 5. भारतानंतर या यादीत चीनचा क्रमांक लागतो. चीनमध्ये प्रदूषणासंबंधित  मृत्यूसंख्या 18 लाख इतकी आहे. हृदया संबंधित आजार, फुफ्फुसांचा कर्करोग यासारख्या आजारामुळे मृत्यू झाल्याचे कारण आहे. त्यानंतर  पाकिस्तान (2.2 लाख), बांग्लादेश (2.1 लाख) आणि  रशिया (1.4 लाख) यांचा क्रमांक लागतो.
 6. 2015 साली जगभरात वायू प्रदूषणामुळे 65 लाख लोकांचा मृत्यू झाला, तर जल प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या  18 लाख एवढी आहे. तसेच कामाच्या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणामुळे या काळात 8 लाख लोकांचा मृत्यू झाला.
 7. जल प्रदूषणासंबंधित मृत्यूसंख्येच्या या यादीत,  भारतानंतर नायजेरिया (1.6 लाख) आणि पाकिस्तान (74 हजार) यांचा क्रमांक लागतो.
 8. भारत आणि चीन या देशांमधील अनेक शहरांमध्ये PM2.5 आकाराच्या कणांचे सरासरी वार्षिक प्रमाण  100 μg/m³ पेक्षा अधिक नोंदवले गेले आहे. तसेच 2015 साली वायू प्रदूषणामुळे झालेल्या जागतिक मृत्युंमध्ये 50% हून अधिक मृत्यू भारत आणि चीनमध्ये झाल्याचे आढळून आले आहे.
 9. मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्रदूषणासंबंधित कारणांमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. औद्योगिकरणामुळे भारत, पाकिस्तान, चीन, बांग्लादेश, मादागास्कर, केनिया यासारख्या देशांमध्ये प्रदूषणाची समस्या झपाट्याने वाढत आहे.
 10. सोडियमचे उच्च प्रमाण असलेला आहार (4.1 दशलक्ष), लठ्ठपणा (4 दशलक्ष), दारू (2.3 दशलक्ष), रस्ते अपघात (1.4 दशलक्ष) किंवा माता व बालकामधील कुपोषण (1.4 दशलक्ष) यापेक्षा अधिक मृत्युसाठी प्रदूषण जबाबदार आहे. तसेच एड्स, क्षयरोग आणि मलेरिया या तीनमुळे होणार्‍या मृत्यूच्या प्रमाणापेक्षा अधिक मृत्यूंसाठी प्रदूषण जबाबदार आहे.


Top